Maharashtra Jalna Accident Update: जालन्यातील (Jalna News) महिलेचा कारमध्ये होरपळून मृत्यू झाल्या प्रकरणी आता एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. मृत महिलेच्या पतीला मंठा पोलिसांकडून (Mantha Police) अटक करण्यात आली आहे. महिलेचा मृत्यू अपघाती (Accident News) नसून पतीनंच तिच्या हत्येचा कट रचल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यामुळेच पोलिसांनी पतीला अटक केली आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी जालन्यात एका विचित्र अपघाताची चर्चा चांगलीच रंगली होती. गाडीला मागून धडक दिल्यामुळे पती वाद घालण्यासाठी गाडीतून खाली उतरला आणि तेवढ्यात गाडीनं पेट घेतला होता. त्यामध्ये पत्नीचा गाडीत होरपळून मृत्यू झाला होता. 


काही दिवसांपूर्वी जालन्यात एका महिलेचा कारमध्ये जळून मृत्यू झाला होता. याप्रकरणी मंठा पोलिसांनी पतीला अटक केली आहे. टेम्पोनं कारला धडक दिल्याचा कट पतीनं रचल्याचा आरोप केला जात आहे. ही घटना 23 जून रोजी घडली होती. सविता सोळुंके या महिलेचा मृत्यू झाला होता, तर पती सुखरुप बचावला होता. 


काय घडलं होतं नेमकं त्या दिवशी? 


जालना जिल्ह्यातील तळणी फाटा येथे एका गाडीचा भीषण अपघात झाला. अपघातानंतर कारनं पेट घेतल्यानं एका 33 वर्षीय महिलेचा जळून अक्षरशः कोळसा झाल्याची घटना घडली होती. पहाटे 4 च्या सुमारास पती-पत्नी दर्शनासाठी शेगाव येथून गावाकडे परत येत होते. तेवढ्यात रस्त्यातच स्विफ्ट कारला मागून एका पीकअपनं धडक दिली. पिकअप वाल्याशी भांडायला पती रागातच गाडीतून उतरला आणि तेवढ्यात गाडीनं पेट घेतला असल्याची माहिती मिळाली होती. अपघातानंतर पती गाडीतून खाली उतरताच कारनं अचानक पेट घेतला. क्षणार्धातच आगीनं संपूर्ण कार जळाली. आग लागली तेव्हा पत्नी गाडीत होती, वेळत आगीवर नियंत्रण मिळवता न आल्यानं स्थानिक पोलिसांना बोलवण्यात आलं.


पोलिसांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत कारमधील सविता सोळुंके या 33 वर्षीय महिलेचा होरपळून मृत्यू झाला होता. सदर घटनेची माहिती मयत महिलेच्या पतीच्या भावानं पोलिसांना दिली होती. या प्रकरणी पोलीस वेगवेगळ्या अँगलनं तपास करत होते. पोलीस तपासात अपघात झाला नसून पतीनंच पत्नीच्या हत्येचा कट रचल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यामुळे पोलिसांनी पतीला अटक केली आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Jalna Accident: गाडीला पिकअपची धडक, पती भांडण्यासाठी खाली उतरताच कारनं घेतला पेट; पत्नीचा होरपळून मृत्यू