एक्स्प्लोर

गावबंदीचं पोस्टर फाडल्याने वाद, दोन गटात तुंबळ हाणामारी; मनोज जरांगेंकडून कारवाईची मागणी

Maratha Reservation : या घटनेत सात तरुण जखमी झाले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे.

जालना: मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा तापला असतानाच, जालना (Jalna) जिल्ह्यात गावबंदीचा पोस्टर फाडल्याने दोन गटात वाद झाल्याची घटना समोर येत आहे. गावात नेत्यांना गावबंदी करण्यात आलेले पोस्टर लावण्यात आले होते. मात्र, दुसऱ्या गटाने हे पोस्टर फाडल्याने दोन्ही गटात वाद झाला. ज्यातून थेट हाणामारीचा प्रकार समोर आला आहे.  जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील बोरगाव जहागीर गावात ही घटना घडली आहे. या घटनेत सात तरुण जखमी झाले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. तसेच, सहा जणांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तर, पोस्टर फाडणाऱ्या आणि मारहाण करणाऱ्या लोकांवर गंभीर कारवाई करण्याची मागणी मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी केली आहे. 

काय आहे प्रकरण? 

मराठा आरक्षण जोपर्यंत मिळत नाही, तोपर्यंत गावागावात राजकीय नेत्यांना गावबंदी करणारे पोस्टर लावण्याचे आवाहन मनोज जरांगे यांनी केले होते. त्यानुसार, जालन्यातील भोकर तालुक्यातील बोरगाव जहागीर गावात देखील राजकीय नेत्यांना गावबंदी करणारे बॅनर लावण्यात आले. मात्र हे बॅनर गावातील इतर लोकांनी फाडले असल्याचा आरोप मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. त्यानुसार, सीसीटीव्हीची पाहणी केली असता त्यात हा प्रकार कैद झाला होता. त्यामुळे बॅनर का फाडले याबाबत गावातील एका गटाच्या पुढार्‍याला जाब विचारण्यात आला. त्यानंतर दोन गटात तुंबळ हाणामारीचा प्रकार समोर आला. विशेष म्हणजे, या हाणामारीत मध्यस्थी करण्यासाठी गेलेले काही मराठा तरुण आणि सरपंच गंभीर जखमी झाले असल्याचं बोललं जात आहे. त्यांच्यावर छत्रपती संभाजी नगरच्या घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहे. दरम्यान, याची माहिती मिळताच पोलीस गावात दाखल झाले आहे.

मनोज जरांगेंकडून कारवाईची मागणी...

भोकरदन येथील घटनेची मनोज जरांगे यांनी देखील दखल घेतली आहे. मराठा तरुणांना मारहाण करत असाल तर आम्ही देखील शांत बसणार नाही. आम्ही देखील शांततेच्या मार्गाने आंदोलन करू, त्यामुळे जालना पोलीस अधीक्षक यांनी तातडीने कारवाई केली पाहिजे. जे कोणी मारहाण करणारे गावगुंड असतील त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे. गावगुंडची भाषा आम्हाला शिकवू नयेत. मारहाण करणाऱ्यांसोबतच त्यांच्या नेत्यांना देखील आतमध्ये टाका. गोरगरिबांवर झालेला अन्याय मराठे खपून घेणार नाही. या लोकांना अटक करून आतमध्ये टाकलं नाही, तर आम्ही राज्यभरात आंदोलन करू असा इशारा जरांगे यांनी दिला आहे. सोबतच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेची तात्काळ दखल घेऊन कारवाईचे आदेश देण्याची मागणी देखील जरांगे यांनी केली आहे.

इतर महत्वाच्या बातम्या: 

Manoj Jarange : 'समाजाच्या अपेक्षांवर नांगर, यंदा दिवाळी साजरी करणार नाही', रुग्णालयाच्या डिस्चार्जनंतर मनोज जरांगेंचा निर्धार 

महत्त्वाच्या बातम्या

हे खूप मोठं नेटवर्क, माझ्या घरावरती हल्ला करू शकतेत; 500 कोटींच्या ऑडिओ क्लिपनंतर जरांगे पाटलांनी व्यक्त केली भीती
हे खूप मोठं नेटवर्क, माझ्या घरावरती हल्ला करू शकतेत; 500 कोटींच्या ऑडिओ क्लिपनंतर जरांगे पाटलांनी व्यक्त केली भीती
रेकॉर्डिंगमधून खूप शहाणा झालो! आता आंदोलन चार दिवस उशिरा, पण कट्टर मराठा सेवकांची फळी तयार करणार, जरांगे पाटलांचा मोठा निर्णय
रेकॉर्डिंगमधून खूप शहाणा झालो! आता आंदोलन चार दिवस उशिरा, पण कट्टर मराठा सेवकांची फळी तयार करणार, जरांगे पाटलांचा मोठा निर्णय
Manoj Jarange Audio Clip: मनोज जरांगे डुप्लिकेट मराठा, सुपारी घेऊन शिंदेंच्या विरोधात बोलतात, तोंडाला काळं फासणार..., जरांगेंचा एकेरी उल्लेख करत शिवसेना उपजिल्हाप्रमुखांचा इशारा
मनोज जरांगे डुप्लिकेट मराठा, सुपारी घेऊन शिंदेंच्या विरोधात बोलतात, तोंडाला काळं फासणार..., जरांगेंचा एकेरी उल्लेख करत शिवसेना उपजिल्हाप्रमुखांचा इशारा
Manoj Jarange Patil and Ramdas Kadam: माझ्या पत्रकारपरिषदेपूर्वीच ऑडिओ क्लीपविषयीची 'ती' गोष्ट रामदास कदमांना कशी समजली? मनोज जरांगेंचा सवाल
माझ्या पत्रकारपरिषदेपूर्वीच ऑडिओ क्लीपविषयीची 'ती' गोष्ट रामदास कदमांना कशी समजली? मनोज जरांगेंचा सवाल

व्हिडीओ

Mann Suddha Tujha Season 3 : गवताची पेंढी | मन सुद्ध तुझं | Episode 4 | ABP Majha
Cordelia Cruise Arrives in Mumbai : पंचतारांकीत जहाज, सफर खास! | Special Report ABP Majha
KBC Farmers Kailas Kuntewad : केबीसीत जिंकले... पण दुष्काळासमोर हरले | Special Report ABP Majha
Sanjay Raut Mumbai : या नाटकात फडणवीस, शिंदे अन् जरांगे मुख्य पात्रे; बाकी सगळे एक्स्ट्रा- संजय राऊत
Manoj Jarange PC : मला का संपवायचंय? आता त्यांना सोडत नाही : मनोज जरांगे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Crime News: पोलिसांना टीप मिळाली; रिसॉर्टवर बनावट गिऱ्हाईक पाठवलं अन्....; भोरमध्ये रिसॉर्टमधून 13 मुलींची केली सुटका, हजार रूपयांसाठी नको ते करायला लावलं
पोलिसांना टीप मिळाली; रिसॉर्टवर बनावट गिऱ्हाईक पाठवलं अन्....; भोरमध्ये रिसॉर्टमधून 13 मुलींची केली सुटका, हजार रूपयांसाठी नको ते करायला लावलं
जर फडणवीस साहेब त्यांना वाचवत असतील, तर फडणवीस साहेबच हे करत होते का? सत्तेत राहायचं म्हणून एकमेकांना वाचवत आहात का? मनोज जरांगे पाटलांची विचारणा
जर फडणवीस साहेब त्यांना वाचवत असतील, तर फडणवीस साहेबच हे करत होते का? सत्तेत राहायचं म्हणून एकमेकांना वाचवत आहात का? मनोज जरांगे पाटलांची विचारणा
Rahul Gandhi: 'चलो दिल्ली, आमची मतं चोरताहेत, आम्ही मुकाट्याने सहन करणार नाही..' राहुल गांधींनी रामलीला मैदानातील रॅलीचा हुंकार भरला, पण भाजपचे मनःपूर्वक आभार का मानले?
'चलो दिल्ली, आमची मतं चोरताहेत, आम्ही मुकाट्याने सहन करणार नाही..' राहुल गांधींनी रामलीला मैदानातील रॅलीचा हुंकार भरला, पण भाजपचे मनःपूर्वक आभार का मानले?
NCP PC On Finance Ministry : अर्थखातं मिळणार? मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत काय घडलं? भुजबळांनी थेट सांगितलं, म्हणाले 'आम्हाला अर्थ खातंचं पाहिजे, इतर कुठेलेही खातं....'
अर्थखातं मिळणार? मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत काय घडलं? भुजबळांनी थेट सांगितलं, म्हणाले 'आम्हाला अर्थ खातंचं पाहिजे, इतर कुठेलेही खातं....'
Satej Patil: 'माझी पलीकडील 12 लोकांना विनंती आहे, सहकारात आदर्श ठेवायचा असेल तर..' गोकुळच्या अध्यक्ष निवडीवर सतेज पाटलांचे सूचक भाष्य; हसन मुश्रीफ, विनय कोरेंचं नाव घेत म्हणाले...
'माझी पलीकडील 12 लोकांना विनंती आहे, सहकारात आदर्श ठेवायचा असेल तर..' गोकुळच्या अध्यक्ष निवडीवर सतेज पाटलांचे सूचक भाष्य; हसन मुश्रीफ, विनय कोरेंचं नाव घेत म्हणाले...
Raj Thackeray : राज ठाकरेंकडून ती डाॅक्युमेंट्री डिलीट, पण 'लाव रे तो व्हिडिओ' मालिकेतील जुना व्हिडिओ पुन्हा शेअर करत काय म्हणाले?
राज ठाकरेंकडून ती डाॅक्युमेंट्री डिलीट, पण 'लाव रे तो व्हिडिओ' मालिकेतील जुना व्हिडिओ पुन्हा शेअर करत काय म्हणाले?
Govinda On Extra Marital Affair: 'आम्ही हिंदू, आमच्यात 'घटस्फोट' हा शब्दच अस्तित्वात नाही...'; विवाहबाह्य संबंधांच्या चर्चांवर गोविंदाचं स्पष्ट मत, पत्नी सुनीता अहुजाबाबत म्हणाला...
'आम्ही हिंदू, आमच्यात 'घटस्फोट' हा शब्दच अस्तित्वात नाही...'; विवाहबाह्य संबंधांच्या चर्चांवर गोविंदाचं स्पष्ट मत, पत्नी सुनीता अहुजाबाबत म्हणाला...
Raj Thackeray: राज ठाकरेंकडून ती डॉक्युमेंट्री डिलीट; म्हणाले, 'मुंबई पोलिसांच्या प्रमुखांनी केलेल्या विनंतीचा मान राखतोय, डॉक्युमेंट्री शेअर केल्यावर तिला इतका प्रचंड प्रतिसाद आला की..'
राज ठाकरेंकडून ती डॉक्युमेंट्री डिलीट; म्हणाले, 'मुंबई पोलिसांच्या प्रमुखांनी केलेल्या विनंतीचा मान राखतोय, डॉक्युमेंट्री शेअर केल्यावर तिला इतका प्रचंड प्रतिसाद आला की..'
Embed widget