Jalgaon Milk Sangh Elections : जळगाव दूध संघाची निवडणूक पुढे ढकलण्या आली आहे. यामुळे येथील राजकीय नेते नाराज असल्याचं चित्र आहे. यावरच राष्ट्रवादी नेते रवींद्र भैया पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. जळगाव दूध संघाची निवडणूक तहकूब करण्या मागे राजकारण असल्याचं ते म्हणाले आहेत. येत्या दहा डिसेंबर रोजी जळगाव दूध संघाची निवडणूक होऊ घातली असताना,राज्य सरकारने ग्राम पंच्यायात निवडणुकीचे कारण देत ही निवडणूक वीस तारखे पर्यंत पुढे ढकलली असली तरी पुढील तारीख मात्र अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.


कधी नव्हेते पहिल्यांदा जळगाव दूध संघाच्या निवडणुकीमध्ये एकनाथ खडसे यांच्या नेतृत्वात असलेल्या महाविकास आघाडीच्या विरोधात मंत्री गुलाबराव पाटील, मंत्री गिरीश महाजन यांच्यासह पाच आमदार मैदानात उतरले असल्याने ही निवडणूक चांगलीच चुरशीची बनली होती. या निवडणुकीत प्रचाराचा धुराळा उठला असताना दोन्ही बाजूने आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत असल्याचं पाहायला मिळत होते. दोन्ही बाजूने विजय आपलाच होणार असल्याचे दावे ही अतिशय आत्मविश्वासाने केले जात होते. मोठा उत्साह दोन्ही बाजूने पाहायला मिळत असताना मंगळवारी सायंकाळच्या सुमारास अचानक राज्य सरकारने ग्राम पंचायत निवडणुकीचे कारण देत ही निवडणूक तात्पुरत्या स्वरूपात पुढे ढकलण्यात येत असल्याचे जाहीर केले. यामुळे दोन्ही बाजूला उमेदवार आणि कार्यकर्त्यांच्या मध्ये नाराजीचा सुर पाहायला मिळाला होता.


या विषयावर खडसे गटातील महाविकास आघाडीचे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र भैया पाटील यांना प्रतिक्रया विचारली असताना त्यांनी म्हटलं आहे की, या निवडणुकीत आम्हाला विजयाची पूर्ण खात्री होती. त्यामुळे राज्य सरकारच्या या निर्णयाने आम्ही नाराज झालो आहोत. आजपर्यंत एकदा जाहीर झालेली निवडणूक कधीही तहकूब केल्याचे पाहायला मिळाले नव्हते. हे पहिल्यांदा घडत आहे. निवडणूक पुढे धकलण्या मागे आम्हाला राजकारणाचा वास येत असल्याचं रवींद्र पाटील यांनी म्हटलं आहे. राज्य सरकारचे या निर्णयविरोधात न्यायालयात जायचे किंवा नाही, हे आमचे वरिष्ठ नेते निर्णय घेतली. मात्र या निर्णयाने नाराजीच वातावरण निर्माण झाल्याचं पाटील यांनी म्हटलं आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: