Jalgaon Dudh Sangh: जळगाव जिल्ह्यात जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीवरून चांगलाच राजकीय वातावरण तापला असतानाच आता या निवडणुकीला स्थगिती मिळाली आहे. राज्य शासनाने ग्रामपंचायतीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणूकांचा कार्यक्रम 20 डिसेंबर पर्यंत स्थगित केला आहे. त्यामुळे जिल्हा दुध संघाच्या निवडणूकीत मतदानाची प्रक्रिया तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. याबाबत आता निवडणूकीचा पुढील निर्णय 20 डिसेंबरनंतर घेण्यात येणार आहे, असे आदेश राज्य शासनाने नुकतेच काढले आहेत.


जिल्हा दुध संघाच्या निवडणूकीच्या प्रक्रियेला वेग आला होता. मंगळवारी अंतिम उमेदवारी यादी आणि निवडणूक चिन्ह वाटप करण्यात आले. तर दुसरीकडे राज्य शासनाच्या अचानकच्या आदेशामुळे उमेदवारांसह नेत्यांमधून नाराजीचा सूर निघत आहे.


जळगाव जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीसाठी एकनाथ खडसे व गिरीश महाजन यांचे प्रतिष्ठापनाला लागली आहे. मात्र आता उमेदवार ठरलेले असताना, दोन्ही बाजूने नेत्याकडून निवडणुकीची तयारी सुरू असताना मतदानापूर्वीच या निवडणुकीला स्थगितीचे आदेश मिळाल्यामुळे राज्य शासनाच्या या आदेशावर राजकीय गोटातून नाराजी व्यक्त केली जात. 


काय आहेत शासनाचे आदेश


राज्यात होऊ घातलेल्या 7 हजार 751  ग्रामपंचायतच्या निवडणुकीचा कार्यक्रम सुरू करण्यात आलेला आहे. या कालावधीमध्ये मतदारांनी निवडणुकीत सहभाग जास्तीत जास्त नोंदविण्यात यावा, यासाठी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 73 क मधील तरतुदीनुसार शासनास प्राप्त झालेल्या अधिकारात वर्ग "क" वर्ग "ड" तसेच वर्ग "ई" प्रकारच्या सहकारी संस्था त्याचप्रमाणे ज्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या निवडणूक घेण्याचे प्रादेशिक केलेले आहे, अशा सहकारी संस्था वगळून राज्यातील "अ" व "ब" वर्गातील सहकारी संस्थांच्या निवडणुका या आदेशाच्या दिनांकापासून ज्या टप्प्यावर असतील, त्या टप्प्यावर 20 डिसेंबर 2022 पर्यंत पुढे ढकलण्यात येत आहे, असे राज्य शासनाचे आदेश काढले आहे. 


या आदेशानुसार सहकारी संस्थांच्या निवडणुकांमध्ये जळगाव जिल्हा दूध संघाचा देखील समावेश आहे. आता पुढची मतदानाची प्रक्रिया ही 20 डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे जळगाव जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीसाठी 10 डिसेंबर रोजी मतदान होणार होते. राज्य शासनाच्या आदेशामुळे आता निवडणूक प्रक्रिया 20 डिसेंबरनंतर घेण्यात येणार आहे, असे आदेश विशेष कार्य अधिकारी व सहनिबंधक सहकारी संस्थेचे श्रीकृष्ण वाडेकर यांनी काढले आहे.


इतर महत्वाच्या बातम्या: 


Swabhimani Shetkari sanghatana : सोयाबीनसह कापूस, संत्रा उत्पादकांच्या मागण्यांसाठी स्वाभिमानी आक्रमक, रविकांत तुपकरांच्या नेतृत्वात मोर्शीत आक्रोश मोर्चा