Raver Lok Sabha Constituency : रावेर लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाकडून (BJP) पुन्हा एकदा रक्षा खडसे (Raksha Khadse) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यांच्या विरोधात शरद पवार गटाकडून एकनाथ खडसे (Eknath Khadse) किंवा रोहिणी खडसे (Rohini Khadse) लढणार, अशी चर्चा अनेक दिवस रंगली होती. मात्र एकनाथ खडसे आणि रोहिणी खडसे यांनी लोकसभेतून माघार घेतली. त्यानंतर रावेरसाठी शरद पवार गटाकडून उद्योजक श्रीराम पाटील (Shriram Patil) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. यावरून माजी मंत्री सतीश पाटील (Satish Patil) यांनी रोहिणी खडसेंना टोला लगावला आहे. 


आज रावेर लोकसभा मतदारसंघात (Raver Lok Sabha Constituency) शरद पवार गटाचा (NCP Sharad Pawar Faction) कार्यकर्ता संवाद मेळावा पार पडला. या मेळाव्यात माजी मंत्री सतीश पाटील हे भाषण करत असताना त्यांनी शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे (Rohini Khadse) या माघार घेतल्याबाबत भाष्य केले.  


...तर तुम्हाला खऱ्या अर्थाने शरद पवारांचे निष्ठावान कार्यकर्ते समजू


सतीश पाटील म्हणाले की, आम्ही तर शरद पवारांना सांगितले होते की, रावेरमध्ये नणंद भावजयी अशी लढाई होवू द्या, पण रोहिणी खडसेंनीच नकार दिला. ते जावू द्या पण आता तुम्हाला मुक्ताईनगरची जबाबदारी दिली आहे. तुम्ही आपल्या उमेदवाराला अधिक लीड मुक्ताईनगरमधून मिळवून द्या. म्हणजे तुम्हाला खऱ्या अर्थाने  शरद पवारांचे निष्ठावान कार्यकर्ते समजू, असे त्यांनी म्हटले आहे. 


नणंद-भावजयमध्ये रंगला होता कलगीतुरा


दरम्यान, एकनाथ खडसे (Eknath Khadse) भाजपमध्ये येत आहेत. रोहिणी खडसेंनीही (Rohini Khadse) भाजपमध्ये येण्यासाठी आम्ही प्रयत्न करू, असे रक्षा खडसे (Raksha Khadse) यांनी म्हटले होते. यावरून रक्षा खडसे आणि रोहिणी खडसे या नणंद भावजयमध्ये कलगीतुरा रंगल्याचे पाहायला मिळत आले होते.  रक्षा खडसे यांना भाजपमध्ये कोणाला घ्यायचे आणि कोणाला नाही, याचा अधिकार नाही. मी शरद पवार (Sharad Pawar) यांच्या नेतृत्वात काम करत राहणार, असे रोहिणी खडसे यांनी रक्षा खडसे यांना प्रत्युत्तर दिले होते.   


इतर महत्वाच्या बातम्या


Rohini Khadse: बापाला लागले स्वगृही परतीचे वेध, पण लेकीनं निर्धाराची तुतारी वाजवली! खडसेंच्या लेकीचा मोठा निर्णय!


Rohini Khadse : 'अजितदादा मनुवादी विचार आत्मसात करतील अशी अपेक्षा नव्हती', रोहिणी खडसेंची बोचरी टीका