Raksha Khadse vs Rohini Khadse जळगाव : एकनाथ खडसे (Eknath Khadse) भाजपमध्ये येताय, रोहिणी खडसेंनी (Rohini Khadse) भाजपमध्ये येण्यासाठी आम्ही प्रयत्न करू, असे भाजपच्या रावेर मतदारसंघाच्या उमेदवार रक्षा खडसे (Raksha Khadse) यांनी म्हटले होते. यावरून आता कोणी कोणत्या पक्षात जावे या विषयावर रक्षा खडसे आणि रोहिणी खडसे या नणंद भावजयमध्ये कलगीतुरा रंगल्याचे पाहायला मिळत आहे.
एबीपी माझाशी बोलताना रक्षा खडसे यांनी रोहिणी खडसे या आज राष्ट्रवादी पक्षात (NCP) असल्या तरी त्या भाजपमध्ये (BJP) येण्यासाठी आम्ही प्रयत्न करू, असे वक्तव्य केले होते. त्यावर रोहिणी खडसे यांनी त्याना उत्तर देताना म्हटले आहे की, रक्षा खडसे यांना भाजपमध्ये कोणाला घ्यायचे आणि कोणाला नाही, याचा अधिकार नाही. तो पक्षाचे वरिष्ठ नेते घेत असतात.
शरद पवारांच्या पक्षातून विधानसभा निवडणूक लढवणार - रोहिणी खडसे
मी राष्ट्रवादी शरद पवार गटात (NCP Sharad Pawar Group) महिला प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करत आहे. पुढेही याच पक्षात शरद पवार यांच्या नेतृत्वात मी काम करत राहणार आहे. आगामी काळात आपण याच पक्षातून मुक्ताईनगर विधानसभा निवडणूक लढविणार आहे. भाजपमध्ये जाण्याचा कोणताही प्रश्न नाही. उलट रक्षा खडसे यांच्यावर राष्ट्रवादी पक्षात येण्याची वेळ यायला नको, असे रोहिणी खडसे यांनी म्हटले आहे.
मला राष्ट्रवादीमध्ये जाण्यात कोणताही इंटरेस्ट नाही - रक्षा खडसे
त्यावर रक्षा खडसे यांनीही उतर दिले आहे. रक्षा खडसे म्हणाल्या की, आपण पक्षात येण्याची त्यांना विनंती केलेली नाही. राष्ट्रवादीमध्ये जाण्याची वेळ माझ्यावर कधीही येणार नाही. जायचंच असते तर दोन वर्षापूर्वीच मी गेले असते. मला राष्ट्रवादीमध्ये जाण्यात कोणताही इंटरेस्ट नाही. मी भाजपची सक्षम कार्यकर्ता आहे. मी भाजपचे काम सक्षमपणाने करणार आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
एकनाथ खडसेंना जीवे मारण्याची धमकी
काही दिवसांपूर्वी एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांना यांना जीवे मारण्याची धमकी (Death Threat) आली होती. त्यांना धमकीचे चार ते पाच फोन आलेत. वेगवेगळ्या नंबरवरुन खडसेंना धमकीचे फोन आलेत. विविध देशातून फोन येत असल्याची एकनाथ खडसे यांनी एबीपी माझाला माहिती दिली. याबाबत त्यांनी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
आणखी वाचा