Unmesh Patil on Girish Mahajan : जळगाव लोकसभा मतदारसंघात (Jalgaon Lok Sabha Constituency) उन्मेष पाटील (Unmesh Patil) यांचा पत्ता कट करत भाजपकडून स्मिता वाघ (Smita Wagh) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. यामुळे उन्मेष पाटील हे नाराज होते. त्यांनी भाजपची साथ सोडत शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. यावरून मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी उन्मेष पाटलांवर जोरदार टीका केली होती. आता उमेश पाटील यांनीदेखील गिरीश महाजनांवर निशाणा साधला आहे. 


उन्मेष पाटील म्हणाले की, शेतकऱ्यांच्या विमाबाबत ते बोलत नाही. दूध उत्पादक शेतकऱ्यांना भाव देण्याबाबत बोलत नाही. शेतकऱ्यांबाबत जर यांची इतकी गेंड्याची कातडी असेल तर यांना जनाची नाही तर मनाची तरी लाज वाटायला पाहिजे, अशा टीका त्यांनी गिरीश महाजनांवर केली आहे.  


...तर मंत्री गिरीश महाजनांना मत मागण्याचा अधिकार नाही


ते पुढे म्हणाले की, दूध उत्पादक शेतकऱ्याला अनुदान नाही. लिंबू उत्पादक शेतकऱ्याला अनुदान नाही. कापसाला अनुदान नाही. त्यामुळे कॅबिनेट मंत्री असून जर तुम्ही काहीही करत नसाल तर मंत्री गिरीश महाजन यांना मत मागण्याचा अधिकार नाही. संवेदनशिलता यांच्यामध्ये असायला हवी. मात्र ती दिसत नाही फक्त सत्ता आणि पैसा असच दिसत आहे. म्हणून मी म्हणतो यांना जनाची नाही तर मनाची लाज असायला हवी. 


गिरीश महाजन यांनी पाप पुण्याबाबत बोलू नये


ते अबकी बार पाच लाख पार म्हणत आहेत. आम्ही अबकी बार करण पवार (Karan Pawar) म्हणत आहोत. भाजपा डोके मोजते आहे. आम्ही डोक्यातील मनाचा विचार करत आहोत. आमचं हे जन आंदोलन झाले आहे. तुम्हाला लोकांनी संकटमोचक म्हटलं असलं तरी तुम्हाला देव म्हटलेले नाही. त्यामुळे गिरीश महाजन यांनी पाप पुण्याबाबत बोलू नये तो हिशेब जनता करेल, अशा शब्दात उन्मेष पाटील यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर टीका केली आहे. 


काय म्हणाले होते गिरीश महाजन? 


उन्मेश पाटील यांना पक्षाने संसदीय मंडळाच्या निकषांत न बसल्यामुळे उमेदवारी नाकारली. त्यांनी पक्षाशी एकनिष्ठतेचा दाखला दिला असतानाही ठाकरे गटात प्रवेश केला. त्यांनी आणखी थोडी वाट बघायला हवी होती. आपण किती मोठी चूक केली, हे आगामी काळात त्यांना कळेल. पक्षात आल्यानंतर दोनच महिन्यांत उन्मेष पाटील यांना आमदारकी मिळाली. त्यानंतर खासदारकी मिळाली. आता पक्ष सोडला म्हणून ते काहीही बोलू शकतात. केंद्रीय नेतृत्वाने उमेदवारी का नाकारली, याची कारणे उन्मेष पाटील यांना माहिती आहेत. आपले काय चुकले, याचे पाटील यांनी आधी आत्मपरीक्षण केले पाहिजे, असे गिरीश महाजनांनी म्हटले होते. 


आणखी वाचा 


दाऊद अन् छोटा शकील बेरोजगार झाल्याने एकनाथ खडसेंना धमक्या देताहेत, त्यांना झेड सिक्युरिटी द्या; नाथाभाऊंना चंद्रकांत पाटलांचा टोमणा