एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source:  ECI | ABP NEWS)

Eknath Khadse : मंत्री गुलाबराव पाटील यांच्यानंतर एकनाथ खडसेंना पाचशे रुपयांचा दंड, नेमकं प्रकरण काय? 

Eknath Khadse : मंत्री गुलाबराव पाटील, एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांना न्यायालयाने (Court) पाचशे रुपयांचा दंड ठोठावला आहे.

Eknath Khadse : सुनावणी दरम्यान गैरहजर राहिल्या प्रकरणी काल मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांना जळगाव न्यायालयाने पाचशे रुपये दंड केला होता. आज एकनाथ खडसे (Eknath Khadse) हे देखील सुनावणी दरम्यान गैरहजर राहिल्याने त्यांनाही न्यायालयाने (Court) पाचशे रुपयांचा दंड ठोठावला आहे. दोघेही सुनावणीला एकापाठोपाठ गैरहजर राहिल्याने न्यायालयाने पाचशे रुपयांचा दंड ठोठावला आहे. त्यामुळे न्यायालयाचा निर्णय राजकीय क्षेत्रात चर्चेचा विषय बनला आहे. 
   
विद्यमान मंत्री गुलाबराव पाटील यांनी 2016 एकनाथ खडसे मंत्री असताना त्यांच्यावर विविध भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. त्यात कोणतेही तथ्य नसताना आपल्यावर गुलाबराव पाटील यांनी केलेल्या आरोपामुळे आपली समाजात प्रतिमा मलिन झाली, बदनामी झाली असल्याचं सांगत एकनाथ खडसे यांनी जळगाव न्यायालयात गुलाबराव पाटील यांच्याविरोधात पाच कोटी रुपयांचा अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला होता. या दाव्याची काल झालेल्या सुनावणी दरम्यान मंत्री गुलाबराव पाटील हे गैरहजर राहिल्याने त्यांना न्यायालयाने पाचशे रुपये दंड केला होता. तर आजच्या सुनावणीत मंत्री गुलाबराव पाटील आणि खडसे दोन्ही गैरहजर असले तरी खडसे यांनी उलट तपासणीसाठी न्यायालयात हजर असणे आवश्यक होते. 

मात्र वैद्यकीय कारणास्तव खडसे हे आज सुनावणी दरम्यान न्यायालयात हजर न राहता वकिलाच्या मार्फत त्यांनी पुढील तारीख मिळण्यासाठी कोर्टाकडे विनंती अर्ज केला. या अर्जाला मंत्री गुलाबराव पाटील यांच्या वकिलांनी ही कोणतीही हरकत घेतली नाही. न्यायालयानेही अर्ज मंजूर करत पुढील सुनावणीची तारीख 27 जून ठेवली असली तरी आज गैरहजर राहिल्याबद्दल एकनाथ खडसे यांना पाचशे रुपये दंड आकारला आहे. काल मंत्री गुलाबराव पाटील यांच्यानंतर आज एकनाथ खडसे यांना ही पाचशे रुपये दंड न्यायालयाने केल्याने राजकीय क्षेत्रामध्ये चर्चेचा विषय बनला आहे. 

काय आहे प्रकरण? 

एकनाथ खडसे यांनी 2016 मध्ये मंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर अब्रूनुकसानीचा दावा दाखल केलेला होता. या प्रकरणी सोमवारी आणि मंगळवारी कामकाज झाले. यावेळी न्यायालयात एकनाथ खडसे आणि गुलाबराव पाटील हे दोन्ही नेते हजर झाले नाहीत. आज पुन्हा कामकाज सुरु झाल्यानंतर एकनाथ खडसे हे देखील वैद्यकीय कारणास्तव गैरहजर राहिले. त्यामुळे खडसे यांना देखील गैरहजेरीचा खर्च म्हणून 500 रुपयांचा दंड न्यायालयाने केला आहे. ज्या प्रकारे मंगळवारी गुलाबराव पाटलांनी आपल्या वकिलामार्फत सुनावणीला गैरहजर राहण्याची परवानगी मिळावी, म्हणून अर्ज दाखल केला. त्याचप्रकारे एकनाथ खडसे यांनी देखील वकिलामार्फत सुनावणीला गैरहजर राहण्याची परवानगी मिळावी, म्हणून अर्ज दाखल केला. मात्र गैरहजर राहण्याची परवानगी तर मिळाली, मात्र दोघांनाही पाचशे रुपयांचा दंड न्यायालयाने ठोठावला आहे. 

हेही वाचा

Gulabrao Patil on Thackeray Group : फुटायचे असते तर राणे आणि राज ठाकरे यांच्यासोबतच गेलो असतो, तेव्हाही ऑफर होती : गुलाबराव पाटील

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune Crime: पुण्यातील पेशवेकालीन मंदिरात चोरी; मंदिरातील दानपेटी फोडून रोकड चोरी, सीसीटीव्हीवरून तपास सुरू
पुण्यातील पेशवेकालीन मंदिरात चोरी; मंदिरातील दानपेटी फोडून रोकड चोरी, सीसीटीव्हीवरून तपास सुरू
Maharashtra Assembly Election 2024 : 'आम्ही भाजपच्या दावणीला बांधलेलो नाही'; नागपुरात भाजप-अजितदादांच्या राष्ट्रवादीत वादाची ठिणगी, नेमकं काय घडलं?
'आम्ही भाजपच्या दावणीला बांधलेलो नाही'; नागपुरात भाजप-अजितदादांच्या राष्ट्रवादीत वादाची ठिणगी, नेमकं काय घडलं?
Haryana Elections Results 2024: काँग्रेसने फटाक्यांची वात काढण्यापूर्वीच हरियाणात गेम फिरला, भाजपची जोरदार मुसंडी, तिसऱ्यांदा सरकार स्थापन करणार?
काँग्रेसने फटाक्यांची वात काढण्यापूर्वीच हरियाणात गेम फिरला, भाजपची जोरदार मुसंडी, तिसऱ्यांदा सरकार स्थापन करणार?
Haryana Vidhan Sabha Election Result 2024: हरियाणात काँग्रेसची मुसंडी, एकहाती सत्ता स्थापन करणार का? भाजपची स्थिती काय?
हरियाणात काँग्रेसची मुसंडी, एकहाती सत्ता स्थापन करणार का? भाजपची स्थिती काय?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Haryana  Assembly Election Result : हरियाणात अटीतटीची लढत, हरियाणात काँग्रेस 10 जागांवर आघाडीवरABP Majha  Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स :  Marathi News Headlines : 9 AM 08 October 2024Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा :  08 October 2024 : ABP MajhaABP Majha  Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स :  Marathi News Headlines : 7 AM 08 October 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Crime: पुण्यातील पेशवेकालीन मंदिरात चोरी; मंदिरातील दानपेटी फोडून रोकड चोरी, सीसीटीव्हीवरून तपास सुरू
पुण्यातील पेशवेकालीन मंदिरात चोरी; मंदिरातील दानपेटी फोडून रोकड चोरी, सीसीटीव्हीवरून तपास सुरू
Maharashtra Assembly Election 2024 : 'आम्ही भाजपच्या दावणीला बांधलेलो नाही'; नागपुरात भाजप-अजितदादांच्या राष्ट्रवादीत वादाची ठिणगी, नेमकं काय घडलं?
'आम्ही भाजपच्या दावणीला बांधलेलो नाही'; नागपुरात भाजप-अजितदादांच्या राष्ट्रवादीत वादाची ठिणगी, नेमकं काय घडलं?
Haryana Elections Results 2024: काँग्रेसने फटाक्यांची वात काढण्यापूर्वीच हरियाणात गेम फिरला, भाजपची जोरदार मुसंडी, तिसऱ्यांदा सरकार स्थापन करणार?
काँग्रेसने फटाक्यांची वात काढण्यापूर्वीच हरियाणात गेम फिरला, भाजपची जोरदार मुसंडी, तिसऱ्यांदा सरकार स्थापन करणार?
Haryana Vidhan Sabha Election Result 2024: हरियाणात काँग्रेसची मुसंडी, एकहाती सत्ता स्थापन करणार का? भाजपची स्थिती काय?
हरियाणात काँग्रेसची मुसंडी, एकहाती सत्ता स्थापन करणार का? भाजपची स्थिती काय?
Astrology : आज सौभाग्य योगाच्या निर्मितीमुळे 5 राशींचं नशीब फळफळणार; धन-संपत्तीत होणार वाढ, घराचं स्वप्नही होणार पूर्ण
आज सौभाग्य योगाच्या निर्मितीमुळे 5 राशींचं नशीब फळफळणार; धन-संपत्तीत होणार वाढ, घराचं स्वप्नही होणार पूर्ण
Laxman Hake : शरद पवार, एकनाथ शिंदेंच्या सांगण्यावरून जरांगे स्वतःची गादी निर्माण करताय, लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
शरद पवार, एकनाथ शिंदेंच्या सांगण्यावरून जरांगे स्वतःची गादी निर्माण करताय, लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
Pune Crime News: पिंपरी-चिंचवडमध्ये 12 वर्षीय मुलीने जीवन संपवलं; वडिलांनी केला प्रकरणाचा तपास, खिश्यात मिळाली चिठ्ठी अन् कारण आलं समोर
पिंपरी-चिंचवडमध्ये 12 वर्षीय मुलीने जीवन संपवलं; वडिलांनी केला प्रकरणाचा तपास, खिश्यात मिळाली चिठ्ठी अन् कारण आलं समोर
Shani 2024 : दिवाळीनंतर शनीची सरळ चाल; 'या' 5 राशींना येणार सोन्याचे दिवस, नवीन नोकरीसह धनात होणार अपार वाढ
दिवाळीनंतर शनीची सरळ चाल; 'या' 5 राशींना येणार सोन्याचे दिवस, नवीन नोकरीसह धनात होणार अपार वाढ
Embed widget