एक्स्प्लोर

विधानसभेचे अध्यक्ष म्हणजे हेडमास्तर! पण हेडमास्तरांनाच पुन्हा शाळेत घालण्याची वेळ आलीय,  रोहिणी खडसेंचा टोला

विधानसभेचे अध्यक्ष म्हणजे हेडमास्तर, पण हेडमास्तरांनाच पुन्हा शाळेत घालण्याची वेळ आली आहे असा टोला शरद पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसेंनी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरांना लगावला

मुंबई: विधानसभेचे अध्यक्ष म्हणजे हेडमास्तर, पण हेडमास्तरांनाच पुन्हा शाळेत घालण्याची वेळ आली आहे असा टोला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना लगावला आहे. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले यांचा शोक प्रस्ताव विधानसभेत मांडण्यात आला. हा शोक प्रस्ताव वाचताना अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडून अनेक चुका झाल्या. यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्यावर खरमरीत पत्र लिहित टीका केली. त्यानंतर मोठा वाद उभा झाला आहे. आता या वादात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी देखील उडी घेतली आहे. 

रोहिणी खडसेंनी नार्वेकरांचा व्हिडिओ केला पोस्ट 

रोहिणी खडसे यांनी आपल्या सोशल मीडिया हँडलवरून नार्वेकर यांचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यावर त्या म्हणाल्या आहेत की, मनसे पक्षप्रमुख श्री. राज ठाकरे यांची फेसबुक पोस्ट वाचली आणि विधानसभेचे अध्यक्ष राहुलजी नार्वेकर यांचे कालचे आशा दिदींच्या शोक प्रस्तावाचे भाषण ऐकले. 'आपुल्याच घरात हाल सोसते मराठी' असं का म्हटलं जातं यांचं जळजळीत वास्तवच अक्षरशः समोर आलं.  विधानसभेचे अध्यक्ष म्हणजे हेडमास्तर,  पण श्री. नार्वेकरांचे भाषण ऐकून हेडमास्तरांना पुन्हा शाळेत घालण्याची वेळ आलीये असं म्हटलं तर ते चुकीचे ठरणार नाही असा टोलाही त्यांनी लगावला आहे. 

 

मनसेप्रमुख राज ठाकरेंनींही व्यक्त केला संताप

मनसेप्रमुख राज ठाकरेंनी चांगलाच संताप व्यक्त केला आहे. पद्मविभूषण आशाताई भोसलेंच्या निधनाचा शोकप्रस्ताव मांडताना, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul narvekar) यांनी ज्या पद्धतीने मराठी भाषेची चिरफाड केली आणि कागदावर लिहून दिलेलं मराठी पण त्यांना वाचता येत नाही हे पाहून संताप, उद्वेग दोन्ही दाटून आला. वाचण्या आधी त्या कागदातून भेळ खाल्ली होती का यांनी? अशा शब्दात राज ठाकरेंनी (Raj Thackeray) संतप्त भावना बोलून दाखवल्या.  

आशाताईंच्या निधनाचा हा प्रस्ताव राहुल नार्वेकरांनी स्वाहिली अथवा हिब्रू भाषेत मांडला असता तरी चाललं असतं, कारण त्यांचं मराठी पण कळलं नाही आणि स्वाहिली, हिब्रू तसं पण कोणालाच कळत नाही.  बरं अजून एक शोकांतिका म्हणजे नार्वेकर, दीनानाथ मंगेशकरांचा उल्लेख दीनदयाल मंगेशकर करत होते आणि वाट्टेल तसं मराठी वाचून दाखवत होते त्यावेळेस सभागृहात उपस्थित एकाही आमदाराला आक्षेप नोंदवावासा वाटला नाही. नार्वेकरांना ना दीनानाथ मंगेशकर माहित आहेत ना दीनदयाळ उपाध्याय माहित आहेत. भाजपने जी काही खोगीरभरती सुरु केली आहे त्यात त्यांची अवस्था तेलही गेलं, तूपही गेलं, हाती आलं धुपाटणे अशी झाली आहे, असे म्हणत राज ठाकरेंनी भाजपलाही टोला लगावला. 

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jalgaon Crime News: ग्रामसभेत राडा, शिवीगाळ अन् पाठलाग; तणावातून ग्रामसेवकाला हृदयविकाराचा झटका, उपचारादरम्यान मृत्यू, जळगावात खळबळ
ग्रामसभेत राडा, शिवीगाळ अन् पाठलाग; तणावातून ग्रामसेवकाला हृदयविकाराचा झटका, उपचारादरम्यान मृत्यू, जळगावात खळबळ
Abhijit Dipke and Gulabrao Patil: अभिजीत दिपकेंचा सरकारी शाळांवरुन सरकारवर निशाणा, गुलाबराव पाटील म्हणाले, 'कुठेही राजकारण आणू नका'
अभिजीत दिपकेंचा सरकारी शाळांवरुन सरकारवर निशाणा, गुलाबराव पाटील म्हणाले, 'कुठेही राजकारण आणू नका'
Nashik Crime News: कुंभमेळ्याच्या बनावट वर्कऑर्डर प्रकरणात मोठी कारवाई; जामनेरमधून आणखी तिघे पोलिसांच्या ताब्यात, नेमकं प्रकरण काय?
कुंभमेळ्याच्या बनावट वर्कऑर्डर प्रकरणात मोठी कारवाई; जामनेरमधून आणखी तिघे पोलिसांच्या ताब्यात, नेमकं प्रकरण काय?
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
Advertisement

व्हिडीओ

Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Embed widget