एक्स्प्लोर

Jalgaon News : माझ्या विरुद्ध कितीही चौकशा लावा, कितीही खोदा, काहीच मिळणार नाही; एकनाथ खडसे  

Jalgaon News Update : माझ्या विरुद्ध कितीही चौकशा लावा आणि कितीही खोदा काहीच मिळणार नाही, असा टोला राष्ट्रवादीचे (NCP)  नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी भाजपला लगावला आहे.   

जळगाव : 'मी जेलमध्ये जाणार असल्याच्या तारखा दिल्या जात आहेत. पण माझ्या विरुद्ध कितीही चौकशा लावा आणि कितीही खोदा काहीच मिळणार नाही, असा टोला राष्ट्रवादीचे (NCP)  नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी भाजपला लगावला आहे.   

जळगाव (Jalgaon News Update) येथील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक पार पडली. या बैठकीत बोलताना एकनाथ खडसे यांनी भाजपवर निशाणा साधला. ते म्हणाले, " कितीही खोदा, मात्र काही मिळणार नाही, सरळ लढू शकत नाही, त्यामुळे अशा पध्दतीने बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातोय. मी जेलमध्ये जाणार असल्याच्या तारखा दिल्या जात आहेत. आता सीबीआय चौकशी सुरू केली आहे. सगळ्या चौकशा लावल्या आहेत, जर काही केले नसेल तर घाबरण्याचं कारण नाही. मी एक रुपयाचा देखील भ्रष्टाचार केला नाही, केवळ बदनाम करण्याचा प्रयत्न आहे.   

एकनाथ खडसे म्हणाले, "कार्यकर्ते आणि नेते जोपर्यंत एकत्र येत नाहीत तोपर्यंत संघटना मजबूत होत नाही. पाया मजबूत झाला तर निवडणुकांमध्ये यश मिळेल. यावेळी एकनाथ खडसे यांनी त्यांच्या कन्या रोहिणी खडसे यांच्या संवाद यात्रेचा उद्देश देखील स्पष्ट केला. तसेच गटबाजीवरही खडसेंनी भाष्य करत जिल्हाध्यक्ष बदलावा किंवा नाही यावर मी बोलणार नाही, असे सांगितले.  

सर्वांचं समाधान करणारा माणूस जन्माला आलेला नाही असे म्हणत खडसे यांनी माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. सरकार असताना अनेकदा त्यांची भेट घेतली मात्र न्याय मिळाला नाही असेही खडसे यावेळी म्हणाले. 

"माणसं खोक्यावर निवडून येतात यावर विश्वास नाही. तसेच विकासकामांवर निवडून येतात यावरही माझा विश्वास नाही. मी निवडून आलो का?  असा प्रश्न उपस्थित करत परत मला उभ राहायचं आहे असं नाही असा भावना खडेसे यांनी यावेळी व्यक्त केल्या.  

मला पक्षाचा आढावा घेण्याचे अधिकार पक्षाने द्यावे, असे म्हणत एकनाथ खडसे यांनी जे काम करत नसतील त्यांना काढून टाकले पाहिजे असेही स्पष्ट केलं. किती दिवस शरद पवार यांच्या नावावर निवडून येणारं आणि जिंकणार या शब्दात खडसेंनी उपस्थितांचे कान टोचले. विकास कामाची स्पर्धा असावी, असे सांगत मंत्री असताना अल्पसंख्यांक विभागासाठी मोठं काम केलं असल्याचंही यावेळी खडसे म्हणाले.   

महत्त्वाच्या बातम्या

जळगावमध्ये 2000 महिलांनी नाकारली लाडकी बहीण योजना; महिला बालकल्याण अधिकाऱ्यांकडे अर्ज
जळगावमध्ये 2000 महिलांनी नाकारली लाडकी बहीण योजना; महिला बालकल्याण अधिकाऱ्यांकडे अर्ज
Jalgaon Crime News: ना सरकारी नोकरी, ना स्वतःचे घर, म्हातारे वडिलही सोबत राहणार...; लग्नासाठी लागोपाठ मिळालेल्या नकाराने खचलेल्या तरूणाचं टोकाचं पाऊल, जळगावातील घटना
ना सरकारी नोकरी, ना स्वतःचे घर, म्हातारे वडिलही सोबत राहणार...; लग्नासाठी लागोपाठ मिळालेल्या नकाराने खचलेल्या तरूणाचं टोकाचं पाऊल, जळगावातील घटना
Girish Mahajan: 'वयाचा विचार करता आम्ही आता किती दिवस काम करणार...'; गिरीश महाजनांचे निवृत्तीचे संकेत? 'त्या' विधानाची जोरदार चर्चा
'वयाचा विचार करता आम्ही आता किती दिवस काम करणार...'; गिरीश महाजनांचे निवृत्तीचे संकेत? 'त्या' विधानाची जोरदार चर्चा
Jalgaon Crime News: सहा महिन्यांत 400 हून अधिक स्त्री-पुरुषांनी जगाचा निरोप घेतला, लग्न जुळत नसल्याने 29 तरुणांचा टोकाचा निर्णय; जळगावातील हादरवणारी आकडेवारी
सहा महिन्यांत 400 हून अधिक स्त्री-पुरुषांनी जगाचा निरोप घेतला, लग्न जुळत नसल्याने 29 तरुणांचा टोकाचा निर्णय; जळगावातील हादरवणारी आकडेवारी

व्हिडीओ

Rahul Gandhi Vs Amit Shah : विधेयकाची नौका पार, 'पॅलेट'वरुन 'गोळीबार' | Special Report ABP Majha
Pune University Scam | बाजार डीग्रीचा, शिक्षणाचा बट्ट्याबोळ | Special Report ABP Majha
Maratha Reservation | जरांगेंचा पुन्हा एल्गार, सरकारपुढे नवं आव्हान | Special Report ABP Majha
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
Manoj Jarange Patil Protest Maratha Reservation: कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
E20: ई20 च्या मुद्यावर वाहन कंपन्यांवर केंद्र सरकारचा दबाव, अरविंद केजरीवाल यांचा आरोप, राष्ट्रीय टाऊन हॉल कार्यक्रमावर ठाम
अधिकारी फोनवर बोलतात पण सरकारचा वाहन उत्पादक कंपन्यांवर ई 20 वरुन दबाव : अरविंद केजरीवाल
State Excise Exam Leak : राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक परीक्षा पेपर फुटीचा आरोप, वाद हायकोर्टात; एमपीएससीला उत्तर सादर करण्याचे आदेश
राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक परीक्षा पेपर फुटीचा आरोप, वाद हायकोर्टात; एमपीएससीला उत्तर सादर करण्याचे आदेश
Koyna Dam : कोयना धरणाच्या 'शिवाजी सागर' जलाशयाचं नाव बदललं, सरकारचा मोठा निर्णय 
Koyna Dam : कोयना धरणाच्या 'शिवाजी सागर' जलाशयाचं नाव बदललं, सरकारचा मोठा निर्णय 
HSRP Number Plate : एचएसआरपी नंबर प्लेटबाबत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे स्पष्ट आवाहन; 31 डिसेंबरनंतर सर्वांवर समान कारवाईचा इशारा
एचएसआरपी नंबर प्लेटबाबत परिवहन मंत्र्यांचे स्पष्ट आवाहन; 31 डिसेंबरनंतर सर्वांवर समान कारवाईचा इशारा
पार्थ पवार अन् कायनात दारांचा साखरपुडा; एकनाथ शिंदेंसह दिग्गजांची उपस्थिती, नव दाम्पत्यास शुभेच्छा देण्यास गर्दी
पार्थ पवार अन् कायनात दारांचा साखरपुडा; एकनाथ शिंदेंसह दिग्गजांची उपस्थिती, नव दाम्पत्यास शुभेच्छा देण्यास गर्दी
Karj Mafi NPA OTS : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीत NPA खात्यांसाठी वन टाईम सेटलमेंटचा पर्याय, सहकार विभागानं haircut योजनेबाबत सगळं समजावून सांगितलं... 
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीत NPA खात्यांसाठी वन टाईम सेटलमेंटचा पर्याय, सहकार विभागानं haircut चे टप्पे समजावून सांगितले
लोको पायलटला ट्रेनसमोर दिसला 'टायगर'; प्रसंगावधानतेमुळे वाचले प्राण, हॉर्न ऐकताच वाघोबाने जंगलात ठोकली धूम
लोको पायलटला ट्रेनसमोर दिसला 'टायगर'; प्रसंगावधानतेमुळे वाचले प्राण, हॉर्न ऐकताच वाघोबाने जंगलात ठोकली धूम
Rahul Gandhi : गृहमंत्र्यांच्या परवानगीशिवाय पेलेट गन वापर शक्य नाही, अमित शाहांनी विद्यार्थ्यांना चिरडलं; राहुल गांधींचा आरोप
गृहमंत्र्यांच्या परवानगीशिवाय पेलेट गन वापर शक्य नाही, अमित शाहांनी विद्यार्थ्यांना चिरडलं; राहुल गांधींचा आरोप
Embed widget