जळगाव : जळगाव जिल्ह्यात (Jalgaon) कृत्रिम पाऊस (Artificial rain) पडण्यासंदर्भात शासनाकडे पाठपुरावा करण्यात येत असून पोषक वातावरण असल्यावर कृत्रिम पावसाबाबतचा शास्रज्ञांशी चर्चा सुरु असून त्यानंतर अंतिम निर्णय घेण्यात येईल, अशी महत्वपूर्ण माहिती मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे. कृत्रिम पाऊस पडताना पोषक वातावरण असावे लागते. टेक्निकल अडचण येऊ नये, म्हणून पोषक वातावरण असल्यावर कृत्रिम पाऊस पडण्याबाबतचा शासनाच्या चर्चेतील निर्णय घेतला जाईल, अशी ही माहिती मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी यावेळी दिली.


दरम्यान राज्यात अनेक भागात पावसाने (Maharashtra Rain) ओढ दिल्याने शेतकरी चिंतेत असून अनेक पिकांना धोका पोहोचण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर गुलाबराव पाटील म्हणाले की, जळगाव जिल्ह्यात कृत्रिम पाऊस पडण्यासंदर्भात शासनाकडे पाठपुरावा करण्यात येत असून पोषक वातावरण असल्यावर कृत्रिम पावसाबाबतचा शास्रज्ञांशी चर्चा सुरु असून त्यानंतर अंतिम निर्णय घेण्यात येईल, असे गुलाबराव पाटील म्हणाले आहेत. तसेच जळगाव जिल्ह्यात पाऊस जामनेर पडल्यामुळे काही गावांमध्ये पाणीटंचाई सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. काही ठिकाणी टँकरही (Water Tanker) सुरु करण्यात आलेले आहे तर भविष्यातले परिस्थिती लक्षात घेता विहिरी अधिकृत करण्यासह विविध उपाययोजना सुद्धा करण्यात येत आहे. 


तसेच अनेक पाऊस नसल्याने दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून 'पाऊस पडावा, यासाठी आपण देवाला प्रार्थना करु.. तसेच गेल्या दीड ते दोन महिन्यापूर्वी मी स्वतः कॅबिनेटच्या बैठकीमध्ये (Cabinet Mieeting) कृत्रिम पाऊस पडण्याबाबत प्रश्न मांडला आहे. कृत्रिम पाऊस पडताना पोषक वातावरण असावे लागते. टेक्निकल अडचण येऊ नये, म्हणून पोषक वातावरण नसल्यावर कृत्रिम पाऊस पडण्याबाबतचा शासनाच्या चर्चेतील निर्णय घेतला जाईल, अशीही माहिती मंत्री गुलाबराव पाटील यांनी यावेळी दिली. तसेच संजय राऊत यांच्या टीकेला उत्तर देताना पाटील म्हणाले की, "ज्यांचे स्वतःचेच कपडे ठिकाणावर नाही, त्यांनी राज्य सरकारच्या कपड्यांकडे बघू नये. संजय राऊत यांनी आधी पहिले स्वतः आपल्या कपड्याकडे बघावं,  असा सल्ला देत मंत्री गुलाबराव पाटील यांनी खासदार संजय राऊत (Sanjay raut) यांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. खासदार संजय राऊत यांनी सरकार केलेल्या टीकेला गुलाबराव पाटील पाटील यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. 


संजय राऊतांचा समाचार 


शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गट या नेत्यांमध्ये अनेक वेळा खडाजंगी झाल्याचे पाहायला मिळाले. त्यातही मंत्री गुलाबराव पाटील आणि खासदार संजय राऊत यांच्यात अनेकदा वाद रंगल्याचे देखील दिसून आले. आता खासदार संजय राऊत यांनी सरकारच्या कपड्यांवरुन केलेल्या वक्तव्याचा मंत्री गुलाबराव पाटील यांनी समाचार घेतला आहे. गुलाबराव पाटील म्हणाले की, "ज्यांचे स्वतःचेच कपडे ठिकाणावर नाही त्यांनी राज्य सरकारच्या कपड्यांकडे बघू नये. आधी स्वतः आपल्या कपड्याकडे बघावं." "संजय राऊत यांनी माझ्या नांदी लागू नका, नाही तर तुमच्या सर्वांचे कपडे फाडेल," असा सज्जड दमही गुलाबराव पाटील यांनी दिला आहे. 



इतर महत्वाची बातमी : 


Gulabrao Patil : आधी 50 खोके एकदम ओके म्हणून टीका आता बोलती बंद, गुलाबराव पाटील यांचा देवकरांसह राष्ट्रवादीवर हल्लाबोल