Jalgaon : मनीष जैन आणि ईश्वर जैन यांच्या राजमल लखीचंद ज्वेलर्सवर ईडीची कारवाई, सुवर्ण नगरीत खळबळ
Jalgaon News : राजमल लखीचंद ज्वेलर्सवर ईडीच्या (ED) पथकानं कारवाई करत चौकशी सुरु केली आहे. यामुळं जळगावच्या सुवर्ण नगरीत मोठी खळबळ उडाली आहे.
Jalgaon News : माजी आमदार मनीष जैन ( Manish Jain) आणि माजी खासदार ईश्वर जैन (Ishwar Jain ) यांच्या मालकीच्या असलेल्या राजमल लखीचंद ज्वेलर्सवर (Rajmal Lakhichand Jewelers) ईडीच्या (ED) पथकानं कारवाई करत चौकशी सुरु केली आहे. यामुळं जळगावच्या (Jalgaon) सुवर्ण नगरीत मोठी खळबळ उडाली आहे. स्टेट बँकेकडून (SBI) घेतलेल्या आणि थकीत कर्जाच्या संदर्बात ईडीच्या पथकाने कारवाई करत चौकशी सुरु केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
एकाच वेळी सहा फर्मवर छापेमारी
ईडीच्या पथकाने जळगावमधील राजमल लखीचंद ज्वेलर्सचे चौकशी सुरु केली आहे. त्यामुळं जळगाव जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. गुरुवारी (17 ऑगस्ट) सकाळी सात वाजल्याासून मुंबई, नागपूर, औरंगाबादसह विविध जिल्ह्यातून ईडी पथकाच्या 10 गाड्या एकाच वेळी जळगाव जिल्ह्यात दाखल झाल्या होत्या. माजी आमदार मनीष जैन आणि माजी खासदार ईश्वर जैन यांच्या मालकीच्या जळगावसह नाशिकमधील एकूण सहा फर्मवर त्यांनी एकाच वेळी छापेमारी केली. ईडीकडून सर्व ठिकाणाच्या फर्मवर असलेल्या मालमत्ता आणि कागदपत्रांची तपासणी सुरु केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
कारवाईमध्ये ईडीचे एकूण 60 कर्मचारी आणि अधिकारी सहभागी
या कारवाईमध्ये ईडीचे एकूण 60 कर्मचारी आणि अधिकारी सहभागी असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. जळगावच्या सुवर्ण नगरीत पहिल्यांदाचं ईडीचे पथक दाखल झाल्यानं सुवर्ण नगरीसह संपूर्ण जळगाव शहरात या कारवाईची चर्चा सुरु झाली आहे. स्टेट बँकेकडून घेतलेल्या सहाशे कोटी रुपयांच्या थकीत कर्ज विषयक ही कारवाई असल्याचं सांगितलं जातं आहे. मागील वर्षीसुद्धा सीबीआयने राजमल लखीचंद ज्वेलर्सचे चौकशी केली होती. दरम्यान, सध्या सुरु असलेल्या चौकशीबाबत कोणत्याही प्रकारची अधिकृत माहिती उपलब्ध होऊ शकलेली नाही.
महत्त्वाच्या बातम्या: