जळगाव: गेल्या 15 दिवसांपासून सोन्याच्या दरात सुरू असलेल्या घसरणीला (Gold Price Today) आता ब्रेक लागला आहे. सुवर्णनगरी जळगावमध्ये एकाच दिवशी सोन्याच्या किमतीमध्ये एक हजारांची वाढ झाल्याचं दिसून आलं. गेल्या 15 दिवसामध्ये सोन्याच्या दरात जवळपास 2 हजारांची घसरण झाली. आता ऐन पितृपक्षात एकाच दिवसात त्यामध्ये हजारांची वाढ झाली.


मागील पंधरवड्यापासून सोन्याच्या दरात घसरण (Gold Price Today) होत होती. दहा दिवसात दोन हजार रुपयांची घसरण झाल्याचं पाहायला मिळत असल्याने ऐन पितृपक्षात ही सोन्याच्या  खरेदीसाठी ग्राहकांनी गर्दी केली असल्याचं दिसून आले होते. मात्र गेल्या चोवीस तासांपासून पऍलेस्टाईन आणि इस्त्राईल (Israel Palestine Conflict) या दोन देशांमध्ये सुरू असलेल्या भीषण युद्धाचा परिणाम म्हणून सोन्याच्या किमतीत वाढ झाली. एकाच रात्रीत गुंतवणूकदारानी सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे आपला मोर्चा वळवला. त्यामुळे सोन्याच्या दरात एक हजार रुपयांची वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे.


ग्राहकांची वेट अँड वॉचची भूमिका 


सोन्याच्या दरात वाढ झाल्याने ग्राहकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली असून अनेक ग्राहकांनी सोने खरेदी बाबत वेट अँड वॉचची भूमिका घेतल्याचं जळगावच्या सुवर्णनगरीत पाहायला मिळत आहे.
परवा पर्यंत सोन्याचे दर कमी असल्याने सोन्याच्या दुकानात असलेली गर्दी आज मात्र काही प्रमाणात कमी झाली असल्याचं दिसून येत आहे.


सोन्याच्या या वाढलेले दरामुळे आता बजेट बिघडले असल्याने, काही प्रमाणात कमी खरेदी करावी लागणार असल्याची प्रतिक्रिया ग्राहकांनी दिली आहे. 


इस्त्रायल-पॅलेस्टाईन युद्ध  (Israel Palestine Conflict) 


इस्रायलमधील युद्धानंतर सोन्या-चांदीची मागणी झपाट्याने वाढत आहे. दुसरीकडे, भारतात आता सणासुदीला सुरुवात होणार आहे. अशा स्थितीत भारतातही सोन्या चांदीच्या मागणीत झपाट्यानं वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळं सोन्या-चांदीच्या दरातही मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. अलीकडच्या काही दिवसात सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली होती. तसेच चांदीच्या दरातही चांगली घसरण झाली होती. त्यामुळं अनेक दुकानदार आणि गुंतवणूकदारांनी सोन्या-चांदीच्या खरेदीवर अधिक लक्ष केंद्रित केलं आहे. दुसरीकडं सोन्याची मागणी लक्षात घेता डीलर्स सध्या सोने-चांदीची विक्री करू इच्छित नाहीत.


पुढील महिन्यापासून लग्नसराईचा हंगाम सुरू होणार आहे. सणासुदीच्या काळात किंवा लग्न सोहळ्याच्या निमित्ताने सोन्याचे दागिने खरेदी करण्याच्या तयारीत असलेल्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे.


ही बातमी वाचा: