जळगाव : आगामी निवडणुकांच्या (Elections) दृष्टीने सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी करण्यास सुरवात केली आहे. स्थानिक पातळीपासून ते राज्यपातळीपर्यंत कार्यकर्त्यांच्या घरोघरी जात आडाखे बांधले जात आहेत. अशातच 'जळगाव ग्रामीण मतदारसंघात 32 पैकी 25 ग्रामपंचायतीवर भगवा फडकवा, तुम्ही हरले तर त्याची पावती माझ्या नावावर फाटेल, मात्र त्यानंतरच्या निवडणुकीत जर मी हरलो तर मात्र फटाके तुमच्या घराजवळ फुटतील' या शब्दात मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी कार्यकर्त्यांना कानपिचक्या दिल्या. 


जळगाव (Jalgaon) शहरात शिवसेना शिंदे गटाची बैठक पार पडली. या बैठकीत मंत्री गुलाबराव पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना कार्यकर्त्यांचे चांगलेच कान टोचले. जिल्हा परिषद, पंचायत समिती (Panchayat samiti) सुद्धा ताकदीने लढू असे सांगत मंत्री गुलाबराव पाटील यांनी कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना कामाला लागण्याच्या सूचनाही दिल्या. ते म्हणाले की, तुम्ही हरले तर पावती माझ्या नावावर फाटेल, मात्र मी हरलो तर फटाके तुमच्या घराजवळ फुटतील. 


मराठा आरक्षणाबाबत आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj jarange) यांचा सध्या महाराष्ट्र दौरा सुरू आहे. त्यावर भाष्य करताना गुलाबराव पाटील म्हणाले, मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) काम करत आहेत. तेच त्यावर निर्णय घेतील. त्यावर आपण बोलणं उचित ठरणार नाही, असे ते म्हणाले. तर संजय राऊत यांच्यावर बोलताना ते म्हणाले की, संजय राऊत म्हणजे घिसीपीटी कॅसेट आहे, तिला महत्व देत नाही. राऊत यांच्या म्हणण्याला मी फार महत्त्व देत नाही, असं सांगत पाटील यांनी राऊत यांच्या टीकेवर अधिक प्रतिक्रिया देणं टाळलं. राऊत यांनी फडणवीस यांचा उल्लेख मदारी असा केला होता. त्यावर गुलाबराव पाटील यांनी थोडक्यात प्रतिक्रिया दिली. 


मी हरलो तर फटाके तुमच्या घराजवळ फुटतील... 


तसेच आगामी निवडणुकांच्या दृष्टीने जिल्हा परिषद, पंचायत समिती सुद्धा ताकदीने लढू असे सांगत मंत्री गुलाबराव पाटील यांच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना कामाला लागण्याच्या सूचना दिल्या. आगामी निवडणुकांच्या दृष्टीने जळगावमध्ये गुलाबराव पाटील यांनी कार्यकर्त्यांच्या बैठक घेण्यास सुरवात केली आहे. याबरोबरच जळगाव शहरासह जिल्ह्यातून नवीन कार्यकर्त्यांना संधी देण्याचे कामही पक्षाकडून केले जात असल्याचे पाटील म्हणाले. 



इतर महत्वाची बातमी : 


Chhagan Bhujbal : शासनाच्या जीआरच काय झालं? साईटवरून जीआर गायब? अंजली दमानियांची हायकोर्टात धाव, छगन भुजबळ पुन्हा अडचणीत?