एक्स्प्लोर

पुतण्याच्या लग्नात बेधुंद नाचताना काकाचा मृत्यू, चाळीसगावातील घटना

Jalgaon Latest News Update : पुतण्याच्या लग्नात बेधुंद होऊन नाचताना हृदयविकाराचा झटक्याने काकाचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना उघडकीस आली आहे.

पुतण्याच्या लग्नात बेधुंद नाचताना काकाचा मृत्यू, चाळीसगावातील घटना

Jalgaon Latest News Update : पुतण्याच्या लग्नात बेधुंद होऊन नाचताना हृदयविकाराचा झटक्याने काकाचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना उघडकीस आली आहे. चाळीसगाव तालुक्यातील आडगाव या गावात ही घटना रविवारी रात्री घडली आहे.  दिनकर मोहन मिस्तरी (वय ४५ रा. सुरत) असे मयत काकाचे नाव आहे.  काकाचा मृत्यू झाल्यामुळे लगीनघरी शोककळा पसरली. 

सुरत येथील रहिवासी दिनकर मिस्तरी यांचा चाळीसगाव तालुक्यातील आडगाव येथील पुतण्या भूषण मिस्तरी याचा 27 फेब्रुवारी रोजी विवाह निश्चित झाला होता. या विवाहासाठी दिनकर मिस्तरी व त्यांचा भाऊ सुरेश हे दोघेही आपल्या परिवारासह आठवडाभरापूर्वीच सुरत येथून आडगावात आले होते. 26 रोजी सायंकाळी पुतण्या भुषणला हळद लागली. रात्री अंगणात मोठा मंडप टाकला होता.  रात्री पाहुण्यांचे जेवण वगैरे झाल्यानंतर लग्नाच्या विधी सुरु झाला. या कार्यक्रमात वधू व वर अशा दोन्हीकडील मंडळी उपस्थित होती. यावेळी भूषण याचे काका दिनकर हे अगदी साडी नेसून सर्वांना लाजवेल असे नाचत आनंद लुटत होते. मात्र नाचत असतांना दिनकर मिस्तरी यांना अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी धावाधाव सुरु झाली. पण त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे लगीनघरी शोककळा पसरली. त्यामुळे दुसऱ्या दिवशी आडगावनजीक असलेल्या उंबरखेड या गावानजीक सोमवारी सकाळी 9 वाजता कानुबाई मातेच्या साक्षीने साध्या पध्दतीने भूषणचा विवाह पार पडला. त्यानंतर दुपारी दोन वाजता भूषणचे काका दिनकर यांच्यावर अत्यसंस्कार करण्यात आले. दिनकर यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, एक मुलगा असा परिवार आहे.

 दिनकर मिस्तरी मूळचे चाळीसगाव तालुक्यातील आडगाव येथील रहिवासी आहेत. दिनकर मिस्तरी व त्यांचा भाऊ सुरेश हे दोघेही काही वर्षापूर्वी व्यवसायानिमित्ताने सुरत येथे परिवारासह स्थायिक झाले आहेत. तर त्यांचे इतर दोन भाऊ अरुण व संजय हे आडगावातच राहत होते, या दोघांचे निधन झाले आहे. दिनकर यांचे भाऊ संजय यांचेच कुटुंबिय आडगावात वास्तव्यास आहे. चार वर्षापूर्वी संजय मिस्तरी यांच्या मुलीचं लग्न निश्चित झाले होते. घरातील पहिलेच लग्न असल्याने कुटुंबात मोठे आनंदाचे वातावरण होते. मात्र यावेळी नियतीला काही औरच मान्य होते. मुलीचा लग्नाच्या संजय यांनी स्वत:च लग्नपत्रिका वाटल्या, अवघ्या पाच दिवसांवर लग्न सोहळा असतांना, सकाळी अंघोळ करत असतांना संजय यांना हृदयविकाराचा झटका आला होता व त्यांचा मृत्यू झाला होता. तर 26 रोजी संजय यांचा मुलगा भूषण याचा विवाह होता. पुतण्याचे लग्न अगदी धुमधडाक्यात करू म्हणून दिनकर व त्यांचा भाऊ सुरेश या दोघे काकांनी सुनियोजन केले. मात्र यावेळी नियतीने डाव साधला. यावेळी पूतण्यावर अक्षदा टाकण्यापूर्वीच काळाने हदयविकाराच्या झटक्याच्या रुपात दिनकर यांच्यावर झडप टाकली. मुलीच्या लग्नाच्या बापाचे अन् मुलाच्या लग्नावेळी काकाचे निधन झाल्याच्या या विचित्र आणि दुर्देवी योगाने सर्व आडगाव गाव सुन्न झाले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Eknath khadse: 'होय, मी दिल्लीला गेलो होतो, अमित शाहांनीच मला फोन करून बोलावलेलं'; भाजप प्रवेशाच्या चर्चेवर एकनाथ खडसेंचा खळबळजनक गौप्यस्फोट
'होय, मी दिल्लीला गेलो होतो, अमित शाहांनीच मला फोन करून बोलावलेलं'; भाजप प्रवेशाच्या चर्चेवर एकनाथ खडसेंचा खळबळजनक गौप्यस्फोट
जळगाव पोलिसांची सिनेस्टाईल कारवाई, 56.29 ग्रॅम मेफेड्रोनसह दोघांना बेड्या; इंदापुरात 2 गावठी कट्टे, 4 काडतुसं जप्त
जळगाव पोलिसांची सिनेस्टाईल कारवाई, 56.29 ग्रॅम मेफेड्रोनसह दोघांना बेड्या; इंदापुरात 2 गावठी कट्टे, 4 काडतुसं जप्त
Jalgaon Crime: लाचखोरीत अडकलेल्या मुद्रांक जिल्हाधिकाऱ्यानेच मेव्हण्याच्या मदतीने स्वतःच्याच घरात घरफोडीचा कट रचला! जळगाव पोलिसांनी बेड्या ठोकल्याने एकच खळबळ
लाचखोरीत अडकलेल्या मुद्रांक जिल्हाधिकाऱ्यानेच मेव्हण्याच्या मदतीने स्वतःच्याच घरात घरफोडीचा कट रचला! जळगाव पोलिसांनी बेड्या ठोकल्याने एकच खळबळ
ह्रदयद्रावक... सेल्फी घेताना मित्र खदानीत पडला, मित्राला वाचवताना दोघेही बुडाले; तिघांचा मृत्यू, गावावर शोककळा
ह्रदयद्रावक... सेल्फी घेताना मित्र खदानीत पडला, मित्राला वाचवताना दोघेही बुडाले; तिघांचा मृत्यू, गावावर शोककळा

व्हिडीओ

Girija Raut PC : मारहाण, फसवणूक, अघोरी कृत्य ते राजकीय दबाव, विनायक राऊतांच्या सुनेचे खळबळजनक आरोप
Vinayak raut PC : मुलावर सुनेचे गंभीर आरोप, विनायक राऊत काय म्हणाले?
Eknath Khadse on BJP : एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशावरून गुलाबराव पाटलांचा खोचक टोला
Supriya Sule Nashik Speech : पांडुरंग म्हणतो माझे दर्शन घ्यायला येऊ नका, सेवा केली तर मी दर्शन द्यायला येईल
Sanjay Raut Vs Devendra Fadnavis Special Report : राऊतांनी डिवचलं, बावनकुळे, फडणवीसांना शुभेच्छा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंबईत अवघ्या सात वर्षाच्या चिमुरडीवर सुरक्षारक्षकाचा वॉशरूममध्ये घुसून अत्याचार; मुलगी वॉशरूमला गेली असता बदमाशाचे हैवानी कृत्य, संतप्त नागरिकांचा पोलिस स्टेशनला घेराव, राहुल नार्वेकरही पोहोचले
मुंबईत अवघ्या सात वर्षाच्या चिमुरडीवर सुरक्षारक्षकाचा वॉशरूममध्ये घुसून अत्याचार; मुलगी वॉशरूमला गेली असता बदमाशाचे हैवानी कृत्य, संतप्त नागरिकांचा पोलिस स्टेशनला घेराव, राहुल नार्वेकरही पोहोचले
खरे हिंदूद्रोही, देशद्रोही भाजपवालेच, सीसीटीव्हीला धोतर लावून राम मंदिरात दानपेटीतून चोरी, सीबीआय, आयटी भाजपचे पोपट, ईडीला चंपत राय दिसत नाही, आता शेखर सुमन दिसतील; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
खरे हिंदूद्रोही, देशद्रोही भाजपवालेच, सीसीटीव्हीला धोतर लावून राम मंदिरात दानपेटीतून चोरी, सीबीआय, आयटी भाजपचे पोपट, ईडीला चंपत राय दिसत नाही, आता शेखर सुमन दिसतील; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
पहलगाममध्ये ढगफुटीने थरकाप, शेती, रस्ते वाहून गेले, उत्तराखंडमध्ये जलविद्युत प्रकल्पाजवळ भूस्खलन; देशाच्या सुमारे 70 टक्के भागातून मान्सूनचे ढग गायब
पहलगाममध्ये ढगफुटीने थरकाप, शेती, रस्ते वाहून गेले, उत्तराखंडमध्ये जलविद्युत प्रकल्पाजवळ भूस्खलन; देशाच्या सुमारे 70 टक्के भागातून मान्सूनचे ढग गायब
Dhanashree Verma: 'लग्नाच्या अवघ्या दुसऱ्याच महिन्यात...', घटस्फोटीत पत्नी धनश्री वर्माचे युझवेंद्र चहलवर गंभीर आरोप
'लग्नाच्या अवघ्या दुसऱ्याच महिन्यात...', घटस्फोटीत पत्नी धनश्री वर्माचे युझवेंद्र चहलवर गंभीर आरोप
'सध्या राम मंदिर आरएसएस-भाजपचं कार्यालय झालंय, ट्रस्ट सरकारनेच केला, SIT त्यांनीच केली, चोर पण तेच आणि पोलिस सुद्धा तेच असल्याने काय निर्णय होणार? शंकराचार्यांचा हल्लाबोल
'सध्या राम मंदिर आरएसएस-भाजपचं कार्यालय झालंय, ट्रस्ट सरकारनेच केला, SIT त्यांनीच केली, चोर पण तेच आणि पोलिस सुद्धा तेच असल्याने काय निर्णय होणार? शंकराचार्यांचा हल्लाबोल
Goa Fort Ratnagiri: संवर्धनाच्या नावावर कोट्यवधींचा खर्च, अन् एका पावसात शिवरायांच्या किल्ल्याची तटबंदी पुन्हा ढासळली, कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न
संवर्धनासाठी कोट्यवधींचा खर्च, अन् एका पावसात शिवरायांच्या किल्ल्याची तटबंदी पुन्हा ढासळली, कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न
Pune News: पुणेकरांना मोठा दिलासा! तूर्त पाणीकपात नाही, धरण साखळीत समाधानकारक साठा; पुढील आठवड्यात होणार अंतिम निर्णय
पुणेकरांना मोठा दिलासा! तूर्त पाणीकपात नाही, धरण साखळीत समाधानकारक साठा; पुढील आठवड्यात होणार अंतिम निर्णय
Beed Crime News: दुचाकीवरून जाताना अडवलं, काही समजायच्या आतच हल्लेखोरांनी 23 वर्षीय तरुणाला भररस्त्यात संपवलं; घटनेनं बीडमध्ये खळबळ
दुचाकीवरून जाताना अडवलं, काही समजायच्या आतच हल्लेखोरांनी 23 वर्षीय तरुणाला भररस्त्यात संपवलं; घटनेनं बीडमध्ये खळबळ
Embed widget