Yogi Govt Renames Jhansi Railway Station : उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री  योगी आदित्यनाथ पदावर आल्यापासून शहरांची नावे बदलण्याचा सपाटा सुरू केला आहे. यामध्ये अलहाबादचे नाव प्रयागराज, फैजाबाद जिल्ह्याचे नाव अयोद्धा, मुगलसरायचे नाव दीन दयाल उपाध्ययनगर केले आहे. आता त्यामध्ये आणखी एका नावाची भर पडली असून योगी सरकारने झाशी रेल्वेस्थानकाचे नाव वीरंगणा लक्ष्मीबाई रेल्वे स्थानक करण्यात आले आहे, 


उत्तरप्रदेश सरकारने झाशी रेल्वे स्थानकाचे नाव वीरांगणा लक्ष्मीबाई रेल्वे स्थानकाचे नाव बदलण्याचा प्रस्तावाला केंद्र सरकारने मंजुरी दिल्यानंतर शासन आदेश जारी करण्यात आला आहे. रेल्वे स्थानकाचे कोड देखील आता बदलण्यात येणार आहे. रेल्वे स्थानकाचे नाव बदलल्यामुळे पर्यटनाला चालना मिळेल, असा सरकारने दावा केा आहे. बुंदेलखंडला देखील त्याच्या नावमुळे पर्यटनात वाढ झाली आहे. 


सरकारने या अगोदर स्पष्ट केले आहे की, गरज  वाटल्यास नाव बदलण्यात येतील. या अगोदर योगी सरकारने अलहाबादचे नाव प्रयागराज, फैजाबाद जिल्ह्याचे नाव अयोद्धा, मुगलसरायचे नाव दीन दयाल उपाध्ययनगर केले आहे. या वेळी फरक फक्त एवढाच आहे की, पहिल्यांदाच एखाद्या रेल्वे स्थानकाचे नाव बदलण्यात आलेले आहे. निवडणुकीच्या तोंडावर योगी सरकारने घेतलेला हा निर्णय महत्त्वपूर्ण मानला जातो.





 


दरम्यान उत्तरप्रदेशात शिक्षण विभागाने अनेक प्रसिद्ध शायरांचे नाव बदलून प्रयगाराजच्या नावावरून नवीन नाव ठेवण्यात आली.  उत्तरप्रदेशच्या शिक्षण विभागाने आपल्या अनेक वेबसाईटवरील प्रसिद्ध शायर अकबर इलाहाबादी यांचे नाव हटवले आहे. त्याऐवजी अकबर प्रयागराजी  असे नाव ठेवले आहे. तसेत इलाहाबादीचे नामकरण तेग प्रयागराज आणि राशिद इलाबाबादीचे राशिद प्रयागराज करण्यात आले आहे. जेव्हा नामकरणावरून वाद झाला तेव्हा आयोगाने त्यांची वेबसाईट हॅक झाल्याचे सांगितले होते.


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha



महत्त्वाच्या बातम्या :