Xi Jinping : मध्य पूर्वेतील युद्धानं लोकांचं नुकसान, यु्द्ध सर्वांच्या हिताविरोधात, चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग ब्रिक्स समिटमध्ये काय म्हणाले?
Xi Jinping : चीनचे अध्यक्ष शी जिनपिगं यांनी ब्रिक्स समिटमध्ये बोलताना सध्या सुरु असलेल्या युद्धामुळं तिथल्या लोकांचं गंभीर नुकसान होत असल्याचं म्हटलं.

नवी दिल्ली : ब्रिक्सच्या 18 व्या समिटचं भारतानं यशस्वी आयोजन केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्ली डिक्लेरेशन सर्वांच्या सहमतीनं मंजूर झाल्याची घोषणा केली. ब्रिक्सच्या 18 व्या समिटला रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग उपस्थित राहिले. या समिटमध्ये बोलताना शी जिनपिंग यांनी पुढील वर्षी ब्रिक्सच्या 19 व्या समिटचं आयोजन चीन करणार असल्याची घोषणा केली. जिनपिंग यांनी विविध मुद्यांवर भाष्य केलं.
चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी मध्य पूर्वेत सुरु असलेल्या युद्धावर महत्त्वाचं वक्तव्य केलं. मध्यपूर्वेतील आणि आखातातील युद्धामुळं त्या भागातील लोकांचं मोठं नुकसान झालं आहे. हे युद्ध आंतरराष्ट्रीय समुहाच्या हिताचं नाही, असं जिनपिंग म्हणाले.
2027 मध्ये चीन ब्रिक्सचं अध्यक्षपद स्वीकारेल आणि 19 व्या ब्रिक्स समिटचं आयोजन चीन करेल, असंही जिनपिंग यांनी म्हटलं. ब्रिक्स देशांनी इतिहासातील योग्य बाजू जी असेल त्या बाजूनं उभं राहावं असं म्हटलं. सध्या जगात जी स्थिती निर्माण झाली आहे, त्या काळात ब्रिक्स देशांची भूमिका महत्त्वाची आहे. आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि जागतिक मुद्यांवर ब्रिक्सची एकत्रित भूमिका भक्कम करण्याची गरज असल्याचं जिनपिंग म्हणाले.
मध्य पूर्वेत आणि आखातामध्ये सुरु असलेल्या युद्धापासून वाचलं पाहिजे, असं जिनपिंग यांनी म्हटलं. आखाती देशांमध्ये सुरु असलेल्या संघर्षाच्या आणि अस्थिरतेच्या वातावरणात शांतता आणि सुरक्षा कायम ठेवण्यावर जोर दिला पाहिजे, असं जिनपिंग म्हणाले.
शी जिनपिंग यांनी ब्रिक्स देशाच्या सदस्यांसोबत मध्य पूर्व आणि आखातामध्ये शांतता आणि स्थिरता कायम राहावी यासाठी चीन महत्त्वाची भूमिका बजावेल, असं म्हटलं. सध्या सुरु असलेल्या युद्धामुळं त्या भागातील लोकांचं गंभीर नुकसान झालं आहे, असंही जिनपिंग म्हणाले.
जागतिक शांतता आणि स्थिरतेसाठी ब्रिक्सनं महत्त्वाची भूमिका बजावली पाहिजे, असं शी जिनपिंग यांनी म्हटलं. शी जिनपिंग यांनी ब्रिक्स सदस्य देशांमध्ये सहकार्य वाढवलं पाहिजे, असं म्हटलं. जागतिक शांततेच्या मुद्यावर आणि सुरक्षेच्या मुद्यावर ब्रिक्स सदस्य देशांमध्ये अधिक सहकार्य अपेक्षित आहे, असं म्हटलं.
ब्रिक्समध्ये कोणत्या देशांचा समावेश?
ब्रिक्स या नावात ब्राझील, रशिया, भारत, चीन, दक्षिण आफ्रिका या देशांच्या नावाच्या पहिल्या अक्षरांचा समावेश होतो. याची सुरुवात 2006 मध्ये झाली, मात्र पहिली शिखर परिषद 16 जून 2009 मध्ये पार पडलं. या देशांशिवाय इजिप्त, इथिओपिया, इंडोनेशिया, इराण, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरात हे ब्रिक्सचे सदस्य देश आहेत.
बेलारुस, बोलीव्हिया, कझाकिस्तान, क्यूबा, मलेशिया, नायजेरिया, थायलँड, युगांडा, उझबेकिस्तान, आणि व्हिएतनाम हे भागीदार देश आहेत.
Before You Go
Sanjay Raut Mumbai : नागपूरचं नामांतर दीक्षाभूमी करा, आम्ही सरकारच्या बाजूने; संजय राऊतांची मागणी






















