Coronavirus Cases Today in India : देशात हळूहळू कोरोना रुग्णांच्या संख्यात घट होताना दिसत आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत असल्यामुळे अनेक राज्यांमध्ये निर्बंध देखील शिथील करण्यात येत आहेत. दरम्यान, गेल्या 24 तासात देशात 67 हजार 84 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर मागील 24 तासात देशात 1 हजार 241 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या देशातील पॉझिटीव्हीटी रेट हा 4 टक्के असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. कालच्या दिवसाचा विचार केला तर 6 टक्के कोरोना रुग्णांची संख्या कमी नोंदवण्यात आली आहे. काल देशात 71 हजार 365 नवीन रुग्णांची नोंद झाली होती, तर 1 हजार 217 जणांचा मृत्यू झाला होता. 


सक्रिय रुग्णांची संख्या 7 लाख 90 हजार 789 


केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, सध्या देशातील सक्रिय रुग्णांची संख्या ही 7 लाख 90 हजार 789 वर गेली आहे. त्याचबरोबर या कोरोनामुळे आत्तापरर्यंत जीव गमावणाऱ्यांची संख्या ही 5 लाख 6 हजार 520 झाली आहे. आकडेवारीनुसार, आतापर्यंत देशात 4 कोटी 11 लाख 80 हजार 751 लोक कोरोनातून बरे झाले आहेत. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने दिलेल्या माहितीनुसार काल देशभरात 15 लाख 11 हजार 321 जणांचे नमुने तपासणीसाठी घेतले आहेत.





 





दरम्यान, देशात लसीकरण देखील वेगाने सुरू आहे. आत्तापर्यंत देशात 171 कोटी लसीकरणाचे डोस देण्यात आले आहेत. 15 ते 18 वयोगटातील मुलांना देखील लसीकरण वगाने देण्याची प्रक्रिया देशात सुरू आहे. काल दिवसभरात देशात 46 लाख 44 हजार 382 लसीचे डोस देण्यात आले आहेत. त्यामुळे आत्तापर्यंत देशात 171 कोटी 28 लाख 19 हजार 947 डोस देण्यात आले आहेत.  


महत्त्वाच्या बातम्या: