Covid 19 Travel Guidelines : देशात हळूहळू कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. रुग्णांची संख्या कमी झाल्यामुळे निर्बंध देखील शिथील केले जात आहेत. अशातच आता  केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी सुधारीत मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. येत्या 14 फेब्रुवारीपासून नवी नियमावली जारी होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार,  प्रवास करण्यापूर्वी प्रवाशांनी 72 तास आधी कोरोना चाचणी  निगेटीव्ह आल्याचे प्रमाणपत्र अपलोड करणे गरजेचे आहे. तसेच लसीकरणाचे दोन्ही डोस पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र देखील गरजेचे असणार आहे. तसेच आता 7 दिवस होम क्वारंटाईन होण्याची आवश्यकता नसणार आहे. 


प्रवाशांना भारताचा दौरा करण्यापूर्वी त्यांचा मागील 14 दिवसांचा प्रवास व भारतातील पूर्ण प्रवासाबद्दल महिती देणे गरजेचे आहे. प्रवाशांना आता कोविडचे नमुने देऊन अहवाल येईपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार नाही. सरकारने भारतात आल्यावर 14 दिवसांचे स्व-निरीक्षण करण्याची शिफारस केली आहे. आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, भारतात आल्यानंतर आठव्या दिवशी RT-PCR चाचणी घेण्याची आणि तो रिपोर्ट अपलोड करण्याची आता गरज नसेल. भारतात आगमन झाल्यावर, एकूण प्रवाशांपैकी फक्त 2 टक्के प्रवाशांचे नमुने घेतले जातील. यावेळी प्रवासी त्यांचे नमुने देऊन विमानतळावर जाऊ शकतात. जगभरातील कोरोना लक्षात घेऊन प्रवासाबाबत नियम बनवण्यात आले आहेत. 


 





अनेक देशांमध्ये, केवळ पूर्ण लसीकरण झालेल्या लोकांनाच प्रवास करण्याची परवानगी आहे. त्याचबरोबर अनेक ठिकाणी लसीकरणाशिवाय प्रवेश दिला जात नाही. सरकारनं जोखमीचे आणि विना जोखमीचे देशांचे गट रद्दबातल केले आहेत. तसेच बंदरावर उतरणाऱ्या प्रवाशांना चाचणी करुन निकालाची वाट पाहण्याची गरज नसणार आहे. प्रवाशांनी एक हमीपत्र दिले पाहिजे. आगमनानंतरच्‍या कोणत्याही आवश्‍यकतेचा सामना करण्‍यासाठी ते उचित सरकारी प्राधिकरणाच्या निर्णयाचे पालन करतील. प्रवासादरम्यान जर कोणत्याही प्रवाशाला कोविड-19 ची लक्षणे आढळली त्याला प्रोटोकॉलनुसार वेगळे केले जाईल. प्रवासादरम्यान सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालक करावे. विमानतळावर उपस्थित आरोग्य अधिकार्‍यांकडून सर्व प्रवाशांचे थर्मल स्क्रीनिंग केले जाईल. ऑनलाइन भरलेलाफॉर्म विमानतळ आरोग्य कर्मचाऱ्यांना दाखवला जाईल. स्क्रिनिंग दरम्यान लक्षणे आढळून आलेल्या प्रवाशांना ताबडतोब वेगळे केले जाईल आणि आरोग्य प्रोटोकॉलनुसार वैद्यकीय सुविधेत नेले जाईल. 


महत्त्वाच्या बातम्या: