Farmers Suicide : सध्या सुरू असलेल्या संसदेच्या अधिवेशनात विरोधक विविध मुद्यावरुन सरकारला धारेवर धरत आहेत. बेरोजगारीच्या मुद्यावरुन विरोधी पक्षांनी भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. मागील तीन वर्षात म्हणजे 2018 ते 2020 या काळात बेरोगारीमुळे 9 हजाराहून अधिक लोकांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. ही सगळी आकडेवारी नॅशनल क्राईम रेकॉर्डस ब्युरोच्या (National Crime Records Bureau) हवाल्याने देण्यात आली आहे. तर याच तीन वर्षाच्या काळात देशभरात तब्बल 17 हजार 199 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. राज्यसभेत बोलताना केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी ही माहिती दिली आहे.

  


नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोच्या आकडेवारीचा हवाला देत केंद्रीय गृह मंत्रालयाने बुधवारी राज्यसभेत लेखी उत्तर दिले. 2018, 2019 आणि 2020 मध्ये बेरोजगारीमुळे एकूण 9 हजार 140 लोकांनी आत्महत्या केल्या आहेत. एवढेच नाही तर कर्जबाजारीपणामुळे तीन वर्षांत एकूण 16 हजार 91 जणांनी आत्महत्या केल्याचेही सांगण्यात आले. सरकारने दिलेल्या या आकडेवारीमध्ये मार्च 2020 मध्ये कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊननंतर उद्भवलेल्या परिस्थितीची केवळ सुरुवातीची आकडेवारीच समाविष्ट करण्यात आली आहे. देशात लॉकाडाऊन केल्यामुळे त्याचा रोजगाराच्या स्थितीवर वाईट परिणाम झाला आहे. रोजगार, उद्योग बंद पडल्याने अनेकांनी आत्महत्या केल्या आहेत. तसेच या काळात अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या देखील केल्या आहेत. ही आकडेवारी चिंताजनक आहे. 2018, 2019 आणि 2020 मध्ये देशभरात अनुक्रमे 5 हजार 763, 5 हजार 957 आणि 5 हाजर 579 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. एकूण ही संख्या 17 हजार 199 आहे.


दरम्यान, गेल्या तीन वर्षांमध्ये, खासकरून कोरोना काळात बेरोजगारीमुळे किंवा कर्जबाजारीपणाला कंटाळून 25 हजारांपेक्षा जास्त लोकांनी आत्महत्या केल्याची माहिती केंद्र सरकारनं दिली आहे. राज्यसभेत बोलताना केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी ही माहिती दिली. सन 2018 ते 2020 या काळात बेरोजगारीमुळे देशातील 9,140 जणांनी तर कर्जबाजारीपणाला कंटाळून तब्बल 16 हजार 91 जणांनी आपलं आयुष्य संपवलं असल्याची माहिती संसदेत देण्यात आली आहे. ज्या काळात कोरोनाच्या लाटेनं कहर केला होता, त्या 2020 या वर्षात बेरोजगारीमुळे सर्वाधिक म्हणजे 3 हजार 548 जणांनी मृत्यूला कवटाळलं आहे. 


महत्त्वाच्या बातम्या: