World Cancer Day 2023 : जगभरात दरवर्षी 4 फेब्रुवारी रोजी 'जागतिक कर्करोग दिन' (World Cancer Day 2023) साजरा केला जातो. जागतिक कर्करोग दिनापूर्वी 'केअर गॅप बंद' करण्याच्या चळवळीला पाठिंबा देत टाटा ट्रस्ट्सने आपली नवीन मोहीम “कैसे का कॅन्सर”(Kaise Ka Cancer) सुरू केली आहे. या मोहीमे अंतर्गत कर्करोगाचे रुग्ण विशेषत: लहान शहरे आणि खेड्यांमधील जीवनावर लक्ष केंद्रीत करण्यात आलं आहे. ही मोहीम भारतातील कर्करोगाच्या चार प्रमुख स्तंभांभोवती म्हणजेच जागरूकता, उपलब्धता, दर्जेदार सोय आणि परवडणारी आरोग्य सुविधा यावर लक्ष केंद्रीत करण्यात आलं आहे.
टाटा ट्रस्टने या संदर्भात एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून तुम्हाला सुरुवातीला कॅन्सरग्रस्त व्यक्तीचं वैवाहिक आयुष्य, जडलेला कॅन्सर आजार, कौटुंबिक परिस्थिती, न परवडणारी ट्रीटमेंट आणि भविष्यातील अनिश्चिततेबद्दल सांगतो. पण, टाटा ट्रस्टच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या कॅन्सर हॉस्पिटलच्या सहकार्याने हे शक्य होणार आहे. या ठिकाणी आधुनिक तंत्रज्ञान आणि उपकरणांच्या माध्यमातून कॅन्सरची चाचणी आणि उपचारांची सुविधा देण्यात येणार आहे. ती सुद्धा कमीत कमी पैशांमध्ये. तसेच, अनुभवी डॉक्टरांचं योग्य मार्गदर्शनही तुम्हाला मिळेल असं सांगण्यात आलं आहे.
या संदर्भात, टाटा ट्रस्टचे मुख्य कार्यकारी, कॅन्सर केअर प्रोग्राम डॉ. संजीव चोप्रा (Dr. Sanjeev Chopra) म्हणाले, “टाटा ट्रस्ट नेहमीच कर्करोगग्रस्त रूग्णांची काळजी घेण्यास सक्षम आणि वचनबद्ध आहे. आम्ही देशभरात कर्करोग जागरुकता मॉडेल कार्यान्वित करण्यासाठी अथक प्रयत्न करत आहोत, ज्याचा उद्देश आहे. स्क्रीनिंग, एकसमान उच्च-गुणवत्तेची काळजी, परवडणारे उपचार देणे.
आज, भारतात नोंदवलेल्या कर्करोगाच्या एकूण घटना 15 लाखांहून अधिक आहेत. वास्तविक घटना नोंदविलेल्या प्रकरणांपेक्षा 1.5 ते 3 पटपेक्षा जास्त आहेत. त्याच वेळी, जागतिक स्तरावर कर्करोगाच्या रुग्णांपैकी तब्बल 30% रुग्णांना नंतरच्या टप्प्यावर निदान झाल्यामुळे आपला जीव गमवावा लागतो आणि जागरुकतेमुळे 70% जीव वाचवले जातात ज्यामुळे लवकर निदान होते. Tata Trusts ची 'कैसे का कॅन्सर' मोहीम, जी 1941 पासून भारतातील कर्करोगाचा भार कमी करण्यात मदत करण्यासाठी प्रयत्न करत आहे. जे कर्करोग रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांच्या जीवनाची गुणवत्ता सुधारून भारतातील कर्करोग काळजी बदलण्यासाठी आवश्यक असलेले आणखी एक पाऊल आहे.
महत्त्वाच्या बातम्या :