News
News
टीव्हीabp shortsABP शॉर्ट्सव्हिडीओ पॉडकास्ट
X

म्हणून ड्रायव्हरलेस गाड्यांना परवानगी देणार नाही : गडकरी

तंत्रज्ञानामुळे जर अनेकांवर बेरोजगारी ओढवणार असेल, तर भारतात ड्रायव्हरलेस गाड्यांना परवानगी देणार नाही, अशी भूमिका नितीन गडकरी यांनी घेतली आहे.

FOLLOW US: 
Share:
नवी दिल्ली : भारतात ड्रायव्हरलेस गाड्यांना परवानगी देणार नसल्याचं केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी स्पष्ट केलं. तंत्रज्ञानामुळे जर अनेकांचे रोजगार हिरावले जाणार असतील, तर त्याला कधीच संमती मिळणार नसल्याचं गडकरींनी सांगितलं. एकीकडे गुगल, मर्सिडीजसारख्या टेक जायंट्सनी ड्रायव्हरलेस कार आणून क्रांती घडवण्याचे प्रयत्न केले आहेत. मात्र नितीन गडकरींनी आपण भारतात ड्रायव्हरलेस गाड्यांना परवानगी न देण्याबाबत आपल्या मतांवर ठाम असल्याचं सांगितलं आहे. 'तंत्रज्ञानामुळे जर अनेकांवर बेरोजगारी ओढवणार असेल, तर ते मला मान्य नाही. देशात बेरोजगारी ही मोठी समस्या असताना टेक्नॉलॉजीमुळे अनेकांचे रोजगार हिरावलं जाणं परवडणारं नाही' असं गडकरी म्हणाले. भारतात आजच्या घडीला 22 लाख व्यावसायिक चालकांची गरज आहे. सरकार देशभरात 100 चालक प्रशिक्षण संस्था सुरु करण्याच्या विचारात आहे. पुढच्या पाच वर्षात पाच लाख जणांना नोकरी मिळेल, असा दावाही गडकरींनी केला. प्रस्तावित मोटर वाहन (सुधारणा) बिल 2017 मध्ये अशाप्रकारे नव्या तंत्रज्ञानाची चाचणी घेण्याची तरतूद आहे. हे विधेयक राज्यसभेत प्रलंबित आहे.
Published at : 25 Jul 2017 10:21 AM (IST) Tags: रोजगार Nitin Gadkari नितीन गडकरी job नोकरी

आणखी महत्वाच्या बातम्या

फक्त 150 रुपयांची बचत करा, 26 लाख रुपये कमवा, 'ही' आहे LIC ची जबरदस्त योजना, जाणून घ्या सविस्तर माहिती

भाजप आणि शिंदे गटाचे 69 उमेदवार बिनविरोध, आपली निवडणूक व्यवस्था संकटात, पैशाची ताकद आणि राजकीय दबावावर निकाल ठरतोय; कपिल सिब्बलांचा प्रहार

Baba Ram Rahim: भर निवडणुकीत पॅरोल दिल्यानंतर बलात्कारी बाबा राम रहिमला नवर्षाचं 'स्पेशल गिफ्ट; पुन्हा 40 दिवसांचा पॅरोल मंजूर

मोदीजी तुमची 56 इंच छाती आहे तर दहशतवाद्यांना उचलून भारतात आणा; ट्रम्पनं करून दाखवलं, तर तुम्हाला का जमत नाही? खासदार ओवेसींनी मुंबईत थेट ललकारलं

शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! कृषी योजनांचा निधी मार्च अखेरपर्यंत खर्च करा, केंद्रीय कृषिमंत्र्यांचे राज्यांना निर्देश 

टॉप न्यूज़

बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का?  BCCI ला धक्का बसणार की दिलासा मिळणार ?

Uddhav Thackeray VIDEO : तेजस्वी घोसाळकरच्या विरोधात नाही तर भाजपची प्रवृत्ती ठेचायला आलोय; सासऱ्यांसमोर उद्धव ठाकरेंचं भाषण

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही : निलेश लंके

नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार