मुंबई : सेक्स पार्टनर्सचा विचार करता भारतीय महिला पुरुषांच्या तुलनेक काही मागे राहिल्या नाहीत. भारतातील काही भागांमध्ये महिलांच्या जीवनात पुरुषांच्या तुलनेत सेक्स पार्टनर्सची संख्या अधिक असल्याचं समोर आलं आहे. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्व्हेक्षणाच्या एका आकडेवारीतून हे स्पष्ट झालं आहे. यासंबंधी 1.1 लाख भारतीय महिला आणि 1 लाख भारतीय पुरुषांचा अभ्यास करण्यात आला. 


शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात अधिक सेक्स पार्टनर्स
राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्व्हेक्षणाच्या अहवालानुसार, शहरी महिलांच्या आयुष्यात सरासरी 1.5 पुरुष सेक्स पार्टनर्स आले आहेत. त्याचवेळी पुरुषांच्या आयुष्यात सरासरी 1.7 महिला सेक्स पार्टनर्स आले आहेत. ग्रामीण भागाचा विचार करायचा झाल्यास महिलांच्या आयुष्यात 1.8 पुरुष सेक्स पार्टनर्स तर पुरुषांच्या आयुष्यात 2.3 महिला सेक्स पार्टनर्स आले आहेत. 


राजस्थानमधील महिलांच्या आयुष्यात सरासरी 3.1 पुरुष सेक्स पार्टनर्स म्हणून आले आहेत. पुरुषांच्या आयुष्यात तुलनेत 1.8 महिला सेक्स पार्टनर्स म्हणून आल्या आहेत.


भारतातील असे अनेक राज्यं आहेत ज्यामध्ये पुरुषांच्या तुलनेत महिलांच्या आयुष्यात सेक्स पार्टनर्स अधिक संख्येने आले आहेत. त्यामध्ये राजस्थान, हरयाना, चंदीगड, जम्मू आणि काश्मीर, मध्य प्रदेश, आसाम, लक्ष्यद्विप, पद्दुचेरी आणि तामिळनाडू राज्यांमध्ये ही संख्या अधिक आहे. 


वर्षभरामध्ये भारतातील 4 टक्के पुरुषांनी अशा महिलांसोबत सेक्स केला आहे ज्यांच्यासोबत ते कधीही राहत नाहीत आणि त्या त्यांच्या जोडीदारही नाहीत. महिलांची संख्या या बाबतीत कमी असून ती 0.5 टक्के इतकी आहे.


ज्या महिला वा पुरुषांनी एकाहून अधिक व्यक्तींसोबत सेक्स केला आहे त्यांना एचआयव्ही होण्याची शक्यत असल्याचं राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्व्हेक्षणाच्या अहवालात स्पष्ट केलं आहे. 


महत्त्वाच्या बातम्या: