Kabaddi player  Death: तामिळनाडूच्या (Tamil Nadu) तिरुवन्नमलाई (Thiruvannamalai) जिल्ह्यातील मरियममन मंदिरात (Mariyamman Temple Festival) आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात एक दुर्देवी घटना घडली. या कार्यक्रमात कोलांटी उडी मारून भाविकांचं मनोरंजन करणाऱ्या कबड्डीपटूचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आलीय. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ माजलीय. सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, विनोद कुमार (वय, 34) असं मृत्यू झालेल्या कबड्डीपटूचं नाव आहे. मरियममन मंदिराच्या एका कार्यक्रमात विनोद कुमार हा कोलांटी उडी मारून तेथील भाविकांचं मनोरंजन करत होता. परंतु, कोलांटी उडी मारताना त्याच्या मानेला इजा झाली आणि तो जोरात जमीनीवर कोसळला. त्यानंतर तो उठलाच नाही. हे पाहून त्याठिकाणी उपस्थित असलेले लोक त्याच्याजवळ गेले. दरम्यान, विनोदच्या मानेला गंभीर दुखापत झाल्याचं समजताच नागरिकांना त्याला जवळच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. परंतु, उपचारदरम्यान त्याचा मृत्यू झाला. विनोदच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. विनोद कुमारचा मृत्यू कसा झाला? ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 


व्हिडिओ- 



कबड्डी सामन्यादरम्यान तामिळनाडूच्या खेळाडूचा मृत्यू
यापूर्वी तामिळनाडूच्या पाणरुती शहराजवळील मनादिकुप्पम गावात कबड्डी सामन्यादरम्यान एका खेळाडूचा मृत्यू झाला होता. या सामन्यात संबंधित खेळाडू जेव्हा विरोधी संघाच्या कोर्टवर जातो तेव्हा विरोधी संघातील खेळाडू त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान विरोधी खेळाडूंनी विमलला घेरले आणि त्याला खाली पाडले. एका खेळाडूचा पाय विमलच्या छातीवर गेला, पण त्याने त्याचे 2 गुण घेतले. मात्र, त्यानंतर तो उठू शकला नाही. त्याला रुग्णालयात घेऊन गेले असता त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केलं. हा आस्कमित मृत्यू आहे की, त्याची हत्या झाली? याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. या घटनेनंतर संबंधित खेळाडूच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला होता. 


हे देखील वाचा-