एक्स्प्लोर

पैसे काढण्याची मर्यादा कायम ठेवा : बँका

मुंबई: सध्या बँकेतून आणि एटीएममधून नोटा काढण्यासाठी असलेली मर्यादा यापुढेही सुरू ठेवावी अशी शिफारस देशभरातील बँकांनी अर्थ मंत्रालयाला केली आहे. जोपर्यंत रिझर्व बँक बँकांना पुरेशी रोकड पुरवत नाही, तोपर्यंत हे निर्बंध कायम ठेवावेत अशी शिफारसही बँकांनी केली आहे. "नोटबंदीनंतर पहिले 50 दिवस ग्राहकांना बँकेतून पैसे काढण्यावर निर्बंध असतील, त्यानंतर परिस्थिती सुधारेल" असं पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेकांनी वारंवार सांगितलं होतं. आजच नोटाबंदीला 50 दिवस पूर्ण होत आहेत. तर रद्द करण्यात आलेल्या हजार-पाचशेच्या जुन्या नोटा बँकेत जमा करण्यासाठी आणखी दोन दिवसांचा अवधी आहे. त्यानंतर केंद्र सरकार बँकेतून पैसे काढण्याची मर्यादा शिथील करण्याची शक्यता आहे. मात्र सरकारने बँकांशी चर्चा न करता असा निर्णय घेऊ नये, असंही बँकांनी सुचवलं आहे. 30 डिसेंबरनंतर बँका तसंच एटीएममधून पैसे काढण्याची मर्यादा शिथील केली तर लोक मोठ्या प्रमाणावर पैसे काढण्यासाठी बँकात गर्दी करतील आणि त्यामुळे बँकाचं दैनंदिन व्यवस्थापन कोलमडून पडेल अशी भितीही व्यक्त करण्यात आली आहे. 30 डिसेंबरनंतर बँका आणि एटीएममधून पैसे काढण्याचे निर्बंध शिथील करण्याविषयी सर्व बँकाचं काय मत आहे, याविषयी केंद्र सरकारने अभिप्राय मागवला होता. त्यावर बँकांनी एवढ्यात ही मर्यादा शिथील करू नये असं स्पष्ट केलं आहे. सर्व बँकाचं प्रतिनिधीत्व करणाऱ्या इंडियन बँक्स असोसिएशन या संघटनेने ही शिफारस सरकारला केली असली, तरी आयबीए म्हणजेच इंडियन बँक्स असोसिएशनचे अध्यक्ष आणि सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे चेअरमन आणि एमडी राजीव ऋषी यांनी मात्र आयबीएने सरकारला अशी कोणतीही शिफारस अधिकृतपणे केली नसल्याचं स्पष्ट केलं. बँकेतून पैसे काढण्यावर सध्या असलेल्या निर्बंध शिथील करायचे की कायम ठेवायचे याचा निर्णय केंद्र सरकार आणि रिझर्व बँकेनेच घ्यायचा आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं. सध्याची मर्यादा सध्या बँकेतून आठवड्याला रू. 24 हजार आणि एटीएममधून दररोज रू. 2500 अशी मर्यादा आहे. नोटाबंदीनंतर म्हणजे 9 नोव्हेंबरपासून ते 19 डिसेंबरपर्यंत रिझर्व बँकेने सिस्टीममध्ये 5.92 लाख कोटी रूपये टाकले आहेत. रद्द करण्यात आलेल्या नोटांच्या म्हणजे 15.44 लाख कोटी रूपयांच्या प्रमाणात ही रिझर्व बँकेने सिस्टीममध्ये टाकलेली रक्कम ही फक्त 38.3 टक्के आहे. मधल्या काळात सरकारने रोकड विरहित व्यवहारासाठी अनेक उपाययोजना अवलंबल्या आहेत. बँकाच्या मते सध्या पाचशे रूपयांच्या नव्या नोटांचा तुटवडा आणि बँक ग्राहकांचं नव्या नोटा बँकेत जमा न करता स्वतःकडे साठवून ठेवणं हे प्रमुख प्रश्न आहेत. पैसे काढण्यावर सध्या असलेल्या निर्बंधामुळे अनेक व्यापारी त्यांच्याकडे येणारी वैध रोकड बँकेत जमा करत नाहीत. त्यामुळेच सध्या असलेली मर्यादा कायम ठेवावी असं बँकांना वाटतं.

महत्त्वाच्या बातम्या

बांधकाम सुरु असलेल्या बोगद्यात अचानक शिरलं पाणी आणि मलबा, ढिगाऱ्याखाली 18 कामगार अडकले, बाचवकार्य सुरु
बांधकाम सुरु असलेल्या बोगद्यात अचानक शिरलं पाणी आणि मलबा, ढिगाऱ्याखाली 18 कामगार अडकले, बाचवकार्य सुरु
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
Shiv Sena Name & Symbol Dispute: 'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी

व्हिडीओ

Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
Shiv Sena Name & Symbol Dispute: 'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
Joe Root: नवा गडी, नवं राज्य!
नवा गडी, नवं राज्य! "तुम्हाला बिअर प्यायची असेल तर प्या, पण..." कॅप्टन होताच जो रूट इंग्लंड संघाचा नाइट कर्फ्यू उठवत काय काय म्हणाला?
Embed widget