एक्स्प्लोर

दुकानं, मॉल्समधल्या स्वाईप मशिन्समधूनही दोन हजार काढा

मुंबई : नोटाबंदीनंतर रिझर्व्ह बँकेनं नागरिकांसाठी आणखी एक महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केला आहे. ज्या दुकानांमध्ये स्वाईप मशिन्स उपलब्ध आहेत, त्या ठिकाणी तुम्हाला दोन हजार रुपये काढता येणार आहेत. आरबीआयतर्फे जाहीर करण्यात आलेल्या निर्णयांपैकी नागरिकांच्या दृष्टीने हा महत्त्वाचा निर्णय आहे. त्यामुळे आजपासून कपड्यांची दुकानं, शॉपिंग मॉल्स यासारख्या मोठ्या दुकानांमध्ये तुम्हाला रोख दोन हजार रुपये हाती पडणार आहेत. 30 डिसेंबरपर्यंत कोणतेही ट्रान्जॅक्शन चार्जेस पडणार नाहीत.

गेल्या दहा दिवसातले इतर महत्त्वाचे निर्णय

1. दोन हजार रुपयांपर्यंतच जुन्या नोटा बदलता येणार दोन हजार रुपयांपर्यंतच जुन्या नोटा 30 डिसेंबरपर्यंत फक्त एकदाच बदलता येणार. याचा अर्थ दोन हजारापेक्षा जास्त रकमेच्या हजार-पाचशेच्या नोटा तुमच्याकडे असतील, तर त्या वाया जाणार असा होत नाही. तुम्ही हे पैसे बँकेत तुमच्या खात्यावर जमा करु शकता. त्यानंतर सोयीनुसार एटीएममधून ही रक्कम काढू शकता. वारंवार येणारे ग्राहक टाळण्यासाठी बोटाला शाई लावणार. 2. साडेचार हजार रुपयांच्या मर्यादेचा दुरुपयोग साडेचार हजार रुपयांच्या मर्यादेचा दुरुपयोग असल्याचं निरीक्षण अर्थमंत्री अरुण जेटलींनी नोंदवलं. काळा पैसा पांढरा केला जात होता, त्यामुळे गरजूंना पैसे मिळत नव्हते आणि बँकांसमोरील रांगाही कमी होत नव्हत्या. मात्र नवीन व्यवस्थेमुळे याला चाप बसण्याची आशा आहे. 3. लग्नघरांना सरकारचा दिलासा ज्यांच्या घरी लग्न आहे, त्यांना आता बँक खात्यातून अडीच लाख रुपये काढता येणार आहेत. केंद्रीय अर्थसचिव शक्तिकांत दास यांनी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. लग्नासाठी अडीच लाख रुपये काढता येणार आहे. मात्र यासाठी लग्नपत्रिका आणि स्वयंघोषणापत्र दाखवणं गरजेचं आहे. तसंच घरातील केवळ एकाच व्यक्तीच्या बँक खात्यातून ही रक्कम काढता येणार आहे. 4. शेतकऱ्यांना आठवड्याला 25 हजारांची मुभा शेतकऱ्यांना खतं-बियाणं, शेतीसंबंधिच्या वस्तू खरेदी करण्यासाठी कर्जाच्या रकमेतून आठवड्याला 25 हजार रुपये काढण्याची मुभा देण्यात आली आहे. याशिवाय पीकविम्याचा हफ्ता भरण्याच्या मर्यादेत 15 दिवसांनी वाढ करण्यात आल्याचं शक्तिकांत दास यांनी सांगितलं. 5. पेट्रोल पंपांवरही पैसे काढता येणार देशातील काही पेट्रोल पंपावर 2 हजारांपर्यंतची रक्कम काढता येणार आहे. पहिल्या टप्प्यात अडीच हजार पेट्रोल पंपावर ही सुविधा सुरु करण्यात येईल. पेट्रोल पंपवर 2000 पर्यंत रक्कम काढता येणार आहे. आरबीआय आणि एसबीआय संयुक्तपणे ही मोहीम राबविणार आहे. ज्या पेट्रोल पंपावर स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI)च्या पीओएस (कार्ड स्वाईप मशीन) आहेत तिथेच ही सुविधा असणार आहे. सुरुवातीला 2500 पेट्रोल पंपावर पैसे काढता येणार आहे. 24 नोव्हेंबरपर्यंत पेट्रोल पंपावर 500 आणि 1000 च्या नोटा स्वीकारण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. यामुळे एटीएम बाहेरच्या रांगा काही प्रमाणात कमी होतील. 6. राष्ट्रीय महामार्गांवरील टोलवसुली 24 नोव्हेंबरपर्यंत बंद 24 नोव्हेंबर 2016 च्या मध्यरात्रीपर्यंत देशभरातील राष्ट्रीय महामार्गांवरील टोलवसुली बंद करण्यात आली आहे. केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी याबाबत माहिती दिली.

महत्त्वाच्या बातम्या

Honey Trap : नेत्यांना 'हनी ट्रॅप'मध्ये फसवण्याचा डाव उघड, 'जैश ए मोहम्मद'च्या दहशतवाद्याची गर्लफ्रेंड अर्पिता सरकारला अटक
नेत्यांना 'हनी ट्रॅप'मध्ये फसवण्याचा डाव उघड, 'जैश ए मोहम्मद'च्या दहशतवाद्याची गर्लफ्रेंड अर्पिता सरकारला अटक
Arvind Kejriwal: E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
Ajit Doval Pune : भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
Amit Shah On Ajit Doval Pune: अमित शाहांकडून अजित डोवाल यांचं तोंडभरून कौतुक, पंतप्रधान मोदींनी दिलेला महत्वाचा सल्ला आणि पहिल्या भेटीचा किस्सा सांगितला
अमित शाहांकडून अजित डोवाल यांचं तोंडभरून कौतुक, पंतप्रधान मोदींनी दिलेला महत्वाचा सल्ला आणि पहिल्या भेटीचा किस्सा सांगितला

व्हिडीओ

Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
Arvind Kejriwal: E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
Kaas Pathar Satara : पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
Raj Thackeray and Ameet Satam: राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
Ajit Doval Pune : भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
Raj Thackeray on PM Modi: दुसऱ्यांच्याही आया आहेत हे मोदींनी विसरु नये, भाजपने 12 वर्षात जे पेरलं, त्याच शिव्या वाट्याला आल्या, राज ठाकरेंचा हल्लाबोल
दुसऱ्यांच्याही आया आहेत हे मोदींनी विसरु नये, भाजपने 12 वर्षात जे पेरलं, त्याच शिव्या वाट्याला आल्या, राज ठाकरेंचा हल्लाबोल
Embed widget