एक्स्प्लोर

चांद्रयान 14 दिवसांनी पृथ्वीवर परतणार का? विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर 14 दिवसानंतर काय करणार ?

Chandrayaan-3 mission: चांद्रयान 3 ने बुधवारी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी सॉफ्ट लँडिंग केले.

Chandrayaan-3 mission: चांद्रयान 3 ने बुधवारी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी सॉफ्ट लँडिंग केले. चंद्रावर यान पाठवण्याचे भारताचे तिसरे मिशन यशस्वी ठरले अन् संपूर्ण देशभरातील लोकांना जल्लोष केला. चांद्रयान 3 ने यशस्वी लँडिंग केल्यानंतर विक्रम लँडरमधून प्रज्ञान रोव्हर बाहेर आलं. प्रज्ञान रोव्हर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील माहिती इस्रोला पाठवणार आहे. ही मोहीम 14 दिवसांसाठी चालणार आहे. प्रज्ञान रोव्हर विक्रम लँडरला जी माहिती पाठवेल ती विक्रम लँडर पृथ्वीवर पाठवणार आहे. पण 14 दिवसानंतर आता पुढे काय होणार ?  चांद्रयान पृथ्वीवर परतणार का? हा प्रश्न आता चर्चेत आहे. 

14 दिवसानंतर पुढे काय होणार ?

रोव्हर आणि लँडरपासून 14 दिवस इस्रोला माहिती मिळणार आहे. कारण, या काळातच चंद्रावर सूर्यप्रकाश असेल. त्यानंतर त्या ठिकाणी अंधार (रात्र) पडणार आहे. ही रात्र एका दिवसाची नसून संपूर्ण 14 दिवसांची असेल. इथे रात्री खूप थंडी असेल. विक्रम आणि प्रज्ञान फक्त सूर्यप्रकाशातच काम करू शकत असल्याने 14 दिवसांनी (चंद्रावरील एक दिवस (प्रकाशमान काळ) हा पृथ्वीवरील 14 दिवसांएवढा असतो.) आपलं काम थांबवतील. त्यामुळे 14 दिवसानंतर विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर या दोहोंचं काम थांबणार आहे. पण चंद्रावर जेव्हा परत सूर्य उगवेल त्यावेळी या दोन्हीचं काम पुन्हा सुरु होऊ शकतं.  सूर्य उगवल्यावर विक्रम आणि प्रज्ञान पुन्हा चंद्रावर काम करण्याची शक्यता असल्याचे इस्रोच्या शास्त्रज्ञांनी सांगितले. तसं घडलं तर भारतासाठी आनंदाची बातमी ठरणार आहे. 

चांद्रयान 3 पृथ्वीवर परतणार का ?

चांद्रयान 3 पृथ्वीवर परतणार नाही. विक्रम आणि प्रज्ञान काम करणार नाहीत, पण ते चंद्रावरच राहतील.

चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चांद्रयान-3 चे सॉफ्ट लँडिंग यशस्वी झाले. लँडर चंद्रावर उतरल्यानंतर सुमारे अडीच तासांनी रोव्हर प्रज्ञान विक्रमपासून यशस्वीपणे बाहेर आले. आता प्रज्ञान चंद्राच्या भूमीवर चालत आहे. 6 चाकी रोबोटिक वाहन प्रज्ञान रोव्हर चंद्रावरील माहिती पाठवणार आहे. 

लँडिंगनंतरची प्रक्रिया नेमकी काय ?

चांद्रयान 3 चे तीन भाग आहेत. त्यामधील एक प्रोप्लशन मॉड्यूल, जो लँडरला चंद्राच्या कक्षापर्यंत घेऊन गेला. त्यामधून विक्रम लँडर वेगळा झाला आणि प्रोप्लशन मॉड्यूल चंद्राच्या कक्षामध्ये फिरतोय. त्यामधून दोन भाग वेगळे झाले, त्यामध्ये विक्रम लँडर आणि रोवर प्रज्ञान यांचा समावेश आहे. विक्रम हा लँडर आहे, जो चंद्रावर लँड केलाय, त्यातून आता रोवर वेगळा झाला. आता प्रज्ञान रोवर चंद्रावर फिरेल अन् तेथील डेटा इस्रोला पाठवेल. विक्रमच्या यशस्वी लँडिंगनंतर प्रज्ञान रोवरने आपले काम सुरु केलेय.  

चांद्रयानच्या मोहिमेचं प्रमुख लक्ष्य काय?

भारताच्या चांद्रयाननं इतिहास रचला आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुव्रावर पोहोचणारा भारत पहिला देश ठरला आहे. यासोबतच भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. चंद्रयान 3 चे प्रज्ञान रोवर चंद्रावरील  माती, वातावरणासोबत खनिज याबाबतची माहिती गोळा करुन पाठवेल. दक्षिण ध्रुवावर अशी काही ठिकाणं आहेत, जिथे अब्जावधी वर्षांपासून अंधार आहे, कधीही सूर्यप्रकाश पडलेला नाही. अशा ठिकाणावरुन डेटा गोळा करणे रोवरसाठी ऐतिहासिक असेल. रोवरच्या या कामगिरीमुळे अनेक प्रकराच्या संशोधनाला चालना मिळेल. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील एकत्र केलेली सर्व माहिती रोवर लँडरला पाठवेल आणि लँडर ती भारतीय डीप स्पेस नेटवर्कला पाठवेल. यासोबतच चंद्राच्या पृष्ठभागावर मॅग्नेशियम, अॅल्युमिनियम, सिलिकॉन, पोटॅशियम, कॅल्शियम, टायटॅनियम आणि लोह यांसारख्या घटकांची उपस्थिती शोधण्यात येईल.  चांद्रयान 3 च्या ऐतिहासिक कामगिरीमुळे स्पेस सायन्समध्ये भारताचे मोठे योगदान असेल. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

देशाची राजधानी हादरली! दिल्ली आणि जम्मू काश्मीरसह अनेक राज्यात भूकंपाचे धक्के, घरं सोडून नागरिक रस्त्यावर 
देशाची राजधानी हादरली! दिल्ली आणि जम्मू काश्मीरसह अनेक राज्यात भूकंपाचे धक्के, घरं सोडून नागरिक रस्त्यावर 
नोकरी सोडल्यानंतर किती दिवसात मिळणार तुमचे पैसे? काय सांगतो नवीन कामगार कायद्याचा नियम?
नोकरी सोडल्यानंतर किती दिवसात मिळणार तुमचे पैसे? काय सांगतो नवीन कामगार कायद्याचा नियम?
AAP : योगेंद्र यादव ते स्वाती मालीवाल, आम आदमी पक्षाची स्थापना झाल्यापासून पक्षाची साथ कोणी कोणी सोडली? पुढचा नंबर कोणाचा? 
योगेंद्र यादव ते स्वाती मालीवाल, आम आदमी पक्षाची स्थापना झाल्यापासून पक्षाची साथ कोणी कोणी सोडली? पुढचा नंबर कोणाचा? 
पाकिस्तानमध्ये इंधन दरवाढीचा भडका; पेट्रोल 458 तर डिझेल 520 रुपये लिटर, नागरिकांचा संताप, पंपावर रांगा
पाकिस्तानमध्ये इंधन दरवाढीचा भडका; पेट्रोल 458 तर डिझेल 520 रुपये लिटर, नागरिकांचा संताप, पंपावर रांगा

व्हिडीओ

Baramati Bypolls : बारामतीचा लढा, मविआत तिढा? काँग्रेसच्या भूमिकेमुळे मोठा ट्विस्ट Special Report
Ashok kharat Minister Connection : दमानियांचा कॉल बॉम्ब, कुणाला फुटणार घाम? Special Report
Ashok Kharat Property : खरातची खाती,काळ्या करामती; 130 खात्यांमधून 60 कोटींचे व्यवहार Special Report
BMC School Manache Shlok : मनाचे श्लोक, वादाचे टोक; एमआयएचा विरोध Special Report
Anjali Damania on Rupali Chakankar | रुपाली चाकणकरांचे Ashok Kharat ला 177 कॉल!, दमानियांचा दावा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नाही म्हणजे नाही! इकडं लढाऊ विमाने पडत असल्याने अमेरिकेला धडकी भरली असतानाच तिकडं इराणचा ट्रम्पना आणखी एक गर्भित इशारा; चौफेर कोंडीने लष्करी रसद तोडण्याची तयारी
नाही म्हणजे नाही! इकडं लढाऊ विमाने पडत असल्याने अमेरिकेला धडकी भरली असतानाच तिकडं इराणचा ट्रम्पना आणखी एक गर्भित इशारा; चौफेर कोंडीने लष्करी रसद तोडण्याची तयारी
इराणी लष्कर, एअरफोर्स संपवल्याच्या वल्गना करणाऱ्या ट्रम्प अन् अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात भयावह 'ब्लॅक फ्रायडे'! कुवेतपासून इराणपर्यंत एकाच दिवसात किती विमाने पाडली? त्या पायलटांचं काय झालं??
इराणी लष्कर, एअरफोर्स संपवल्याच्या वल्गना करणाऱ्या ट्रम्प अन् अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात भयावह 'ब्लॅक फ्रायडे'! कुवेतपासून इराणपर्यंत एकाच दिवसात किती विमाने पाडली? त्या पायलटांचं काय झालं??
Nagpur PNG Connection: नागपूरकरांसाठी आनंदवार्ता! बुटीबोरीमध्ये पीएनजी गॅसचा पुरवठा सुरु, उपराजधानीचीही एलपीजी सिलेंडरच्या कटकटीपासून मुक्तता होणार, वाचा A to Z माहिती
नागपूरकरांसाठी आनंदवार्ता! बुटीबोरीमध्ये पीएनजी गॅसचा पुरवठा सुरु, उपराजधानीचीही एलपीजी सिलेंडरच्या कटकटीपासून मुक्तता होणार, वाचा A to Z माहिती
NCP Sunetra Pawar Letter: सुनेत्रा पवारांनी निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्रामुळे पार्थ पवार अडचणीत, नेमकं काय घडलं?
सुनेत्रा पवारांनी निवडणूक आयोगाला पाठवलेल्या 'त्या' पत्रामुळे पार्थ पवार अडचणीत, नेमकं काय घडलं?
Nashik Accident News: रात्रीच्या अंधारात कार खोल विहीरात बुडत गेली, पाणी नाकातोंडात जाऊन सहा लहानग्यांचा करुण अंत, नाशिकमध्ये नेमकं काय घडलं?
रात्रीच्या अंधारात कार खोल विहीरात बुडत गेली, पाणी नाकातोंडात जाऊन सहा लहानग्यांचा करुण अंत, नाशिकमध्ये नेमकं काय घडलं?
Piyush Mishra: दारूच्या नशेत महिलांना अश्लील फोन केले; आईला शिवीगाळ; बॉलीवूड अभिनेत्यांनं सगळंच सांगितलं, म्हणाला..
दारूच्या नशेत महिलांना अश्लील फोन केले; आईला शिवीगाळ; बॉलीवूड अभिनेत्यांनं सगळंच सांगितलं, म्हणाला..
Nashik Accident News : स्नेहसंमेलनाचा आनंद ठरला अखेरचा...; घराची ओढ असलेल्यांचा कारमध्येच गुदमरला श्वास, दिंडोरीत कार विहिरीत कोसळून 9 जणांचा मृत्यू
स्नेहसंमेलनाचा आनंद ठरला अखेरचा...; घराची ओढ असलेल्यांचा कारमध्येच गुदमरला श्वास, दिंडोरीत कार विहिरीत कोसळून 9 जणांचा मृत्यू
Chhatrapati Sambhajinagar news: तुम्ही दिलेल्या जीवनाचे मी सार्थक करु शकलो नाही, आई मला माफ कर; छत्रपती संभाजीनगरमध्ये तरुणाने आयुष्य संपवलं
तुम्ही दिलेल्या जीवनाचे मी सार्थक करु शकलो नाही, आई मला माफ कर; छत्रपती संभाजीनगरमध्ये तरुणाने आयुष्य संपवलं
Embed widget