मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर भाष्य करण्याची रियाची लायकी नाही : बिहारचे पोलीस महासंचालक
या टीमपैकी काही सदस्य तातडीनं मुंबईत दाखल होऊन या प्रकरणातली कागदपत्रं ताब्यात घेतील. या प्रकरणातली केस डायरी, क्राईम सीनवरचे फोटो, ऑटोप्सी रिपोर्ट आणि आत्तापर्यंत घेतलेल्या जबानींची प्रत या सगळ्या गोष्टी मुंबई पोलिसांना या टीमला सादर कराव्या लागणार आहेत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे पुढच्या तपासासाठी सीबीआयची ही टीम दिल्लीतून मुंबईत येतेय. सीबीआयचा तपास हा बिहार पोलिसांच्या एफआयआरवर आधारित असणार आहे.
मागच्या वेळी तपासासाठी आलेले बिहार पोलिस टीमचे अधिकारी विनय तिवारी यांना बीएमसीनं क्वारंन्टाईन केलं होतं. आता मात्र सीबीआयची ही टीम सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर दाखल होतेय, शिवाय तपासात महाराष्ट्र सरकारनं पूर्ण सहकार्य करावं असंही कोर्टानं आपल्या आदेशात म्हटलं आहे. त्यामुळे आता या टीमला महाराष्ट्रात कशा पद्धतीनं वागणूक दिली जाते हे देखील पाहणं महत्वाचं असेल.
अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे गेला आहे. सुप्रीम कोर्टाने 19 ऑगस्ट रोजी हा निकाल दिला. मुंबई पोलिसांनी सीबीआयला संपूर्ण सहकार्य करण्याचा आदेश सुप्रीम कोर्टाने दिला आहे. तसंच गोळा केलेले सर्व पुरावे सीबीआयला सोपवण्याचे निर्देशही मुंबई पोलिसांना दिले आहेत. महाराष्ट्राला सरकारलाही निकालाचं पालन करावं लागेल, असंही कोर्टाने स्पष्ट सांगितलं.
सुप्रीम कोर्टाने म्हटलं होतं की, मुंबई पोलिसांनी या प्रकरणात तपास नाही केवळ चौकशी केली होती. सुप्रीम कोर्टच्या या निकालानंतर महाराष्ट्र सरकार आणि मुंबई पोलिसांना मोठा झटका बसला आहे. सुशांत सिंह राजपूत 14 जून रोजी मुंबईच्या वांद्र्यातील राहत्या घरी आत्महत्या केली होती. बिहारच्या पाटण्यात आपल्याविरोधात दाखल झालेला गुन्हा मुंबई पोलिसांकडे वर्ग करावा, अशी मागणी करत सुशांतची गर्लफ्रेण्ड रिया चक्रवर्तीनेही सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती.
महत्त्वाच्या बातम्या :
- SSR Case SC Verdict | सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
- सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआय करणार, सुप्रीम कोर्टाचा निकाल
- अन्यायाविरुद्धचा विजय, बिहार डीजीपींची प्रतिक्रिया, कुटुंबियांकडूनही निर्णयाचं स्वागत
- सत्यमेव जयते! सुशांत सिंह प्रकरणावर पार्थ पवार यांची प्रतिक्रिया
- SSR Case SC Verdict | सुशांतची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडे म्हणते...