एक्स्प्लोर
सहा गुंडाच्या तावडीतून तिने वाचवले पतीचे प्राण
आबिद अली यांच्या घराबाहेर सहा ते सात जणांच्या जमावाने त्यांच्यावर लाठ्या-काठ्यांनी वार केले.
लखनौ : उत्तर प्रदेशमधील हत्या, दरोडे यासारख्या गुन्ह्यांचं प्रमाण वाढतानाच दिसत आहे. लखनौमध्ये एका पत्रकाराला त्याच्या पत्नीने हल्लेखोरांच्या तावडीतून वाचवलं. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.
लखनौच्या काकोरी भागात हा प्रकार घडला आहे. आबिद अली यांच्या घराबाहेर सहा ते सात जणांच्या जमावाने त्यांच्यावर लाठ्या-काठ्यांनी वार केले. आबिद यांचा जीव घेण्याचा या टोळक्याचा प्रयत्न होता.
पतीचा आरडाओरडा ऐकून आबिद यांच्या पत्नी धावत घराबाहेर आली. पतीचे प्राण वाचवण्यासाठी तिने परवाना असलेल्या बंदुकीतून गुंडांवर गोळीबार केला. पत्नीचं अवसान पाहून धमकी देत गुंडांनी पळ काढला. त्यांच्यावर आबिद यांनीही बंदुकीच्या फैरी झाडल्या. जीवघेण्या हल्ल्यात आबिद यांची मान, पाठ, हात आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली.
आरोपींचा अद्याप सुगावा लागला नसून पोलिस त्यांचा कसून शोध घेत आहेत. पत्रकार आबिद यांच्यावरील हल्ल्याचं कारण स्पष्ट होऊ शकलेलं नाही. गुन्हेगारी वाढली असूनही प्रशासन ढिम्म असल्याने सर्वसामान्यांमध्ये चिड आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बातम्या
नाशिक
महाराष्ट्र
Advertisement