एक्स्प्लोर

तुमचा ईएमआय का कमी होत नाही?

मुंबई : जेव्हा रिझर्व्ह बँक व्याजदरांमध्ये कपात करते. तेव्हा अनेक गृहकर्जधारकांना आशा असते की, त्यांना याचा फायदा होऊन कर्जाचा बोजा कमी होईल. पण, प्रत्यक्षात तसे होत नाही. जेव्हा रिझर्व्ह बँकेकडून व्याजदरात वाढ होते, तेव्हा त्याचा सर्व बोजा बँक आपल्या ग्राहकांवर टाकते. तर याच्या उलट व्याजदरात कपात होते, तेव्हा याचा कसलाही फायदा बँक आपल्या ग्राहकांना देत नाही.   गेल्या दीड वर्षात रिझर्व्ह बँकेने व्याजदरात १.५% कपात केली. यापैकी गृहकर्जातील व्याजदरांमध्ये ०.५% कपात केली. पण याचा फायदा कोणत्याही बँकेने आपल्या ग्राहकांना दिला नाही. त्यामुळेच ईएमआयवर घरे खरेदी केलेल्यांचे कर्ज कमी होताना दिसत नाही.   गेल्या दीड वर्षातील रिझर्व्ह बँकेच्या पत धोरणांचा बारकाईने अभ्यास केल्यास, रिझर्व्ह बँकेने आपल्या रेपो रेटमध्ये पाचवेळा कपात केली. बँकेने आपला रेपो रेट ८ % वरून ६.५% केला. गेल्या पाच वर्षाशी याची तुलना केल्यास, हा व्याजदर सर्वात कमी होता. अनेकवेळा बँकेकडून व्याजदरांच्या कपातीसंदर्भातील माहिती ग्राहकांना दिली जात नाही. शिवाय ज्यांना याची माहिती नसते त्यांना याचा कधीही लाभ मिळत नाही. अनेकजण याची चौकशी करतात, त्यावेळी त्यांना बँकेकडून याची जुजबी माहिती दिली जाते. त्यामुळे अनेक गृहकर्जधारकांच्या तक्रारी असतात की, 'आम्ही व्याजदर कपातीच्या बातम्या वृत्तपत्रांमधून वाचतो. मात्र त्याचा परिणाम आमच्या ईएमआयवर होत नाही.' २०१५ च्या सुरूवातीला रिजर्व्ह बँकेचा रेपो रेट ८ % होता. त्यावेळी एचडीएफसी बँकेचा व्याजदर १० % होता. जानेवारी २०१५ मध्ये रिजर्व्ह बँकेने रेपो रेटमध्ये ०.२५ % कपात केली. त्यावेळी बँकेच्या व्याजदरात कोणताही फरक पडला नाही. त्यानंतर बँकेने मार्च माहिन्यात आपल्या रेपो रेटमध्ये ०.२५ टक्क्यांनी कपात केली. त्यावेळी बँकेने ०.१५ टक्के व्याजदरात कपात केली. सप्टेंबरमध्ये रिजर्व्ह बँकेचा रेपो रेट ६. ७५ होता. त्यावेळी बँकेचा व्याजदर ९.३५ टक्के होता. चालू वर्षीच्या जानेवारीत रिजर्व्ह बँकेने रेपो रेटमध्ये ०.२५ टक्क्यांची कपात केली. त्यावेळी बँकेचा व्याजदर ९.३ % होता. त्यामुळे गेल्या दीड वर्षात रिजर्व्ह बँकेने जेव्हाजेव्हा आपल्या रेपो रेटमध्ये कपातीचा निर्णय घेतला. तेव्हा बँकेने आपल्या ग्राहकांपर्यंत ही माहिती न पोहचवता आपला फायदा बघितला. त्यामुळेच मग बँक ईएमआयधारकांना इतके वेठीस का धरतेय हा प्रश्न उपस्थित होतो. तज्ज्ञांच्या मते, बँकेला गेल्या अनेक वर्षांपासून तोटा सहन करावा लागत आहे. त्यामुळे रेपो रेट कमी होण्याने होणारा नफा बँकेची वित्तीय तुट भरून काढण्यात खर्च होतो. त्यातच कर्जबुडव्यांचे प्रमाणदेखील वाढल्याने त्याचा भुर्दंड नियमाने कर्जाचे हप्ते भरणाऱ्यांना सहन करावा लागतो. दरम्यान, रिजर्व्ह बँकेने आज आपले पत धोरण जाहीर केले. त्यात कोणताही बदल नसल्याने ईएमआयधारकांची ससेहोलपाट सुरूच राहणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live Breaking Marathi News: उधळपट्टी थांबवा, जनतेचा पैसा विकासकामांसाठीच खर्च करा; इनोव्हा गाड्या खरेदी करण्याच्या प्रस्तावावर देवेंद्र फडणवीसांची नाराजी
Maharashtra Live Breaking Marathi News: उधळपट्टी थांबवा, जनतेचा पैसा विकासकामांसाठीच खर्च करा; इनोव्हा गाड्या खरेदी करण्याच्या प्रस्तावावर देवेंद्र फडणवीसांची नाराजी
Bankipur By-election Prashant Kishor: 'बांकीपूरमध्ये आम्ही कुत्र्या मांजराला उभं केलं तरी निवडून येईल..' भाजपला ते वाक्य महागात पडलं, प्रशांत किशोर भक्कम विजयाच्या दिशेनं
'बांकीपूरमध्ये आम्ही कुत्र्या मांजराला उभं केलं तरी निवडून येईल..' भाजपला ते वाक्य महागात पडलं, प्रशांत किशोर भक्कम विजयाच्या दिशेनं
Bankipur By Election Result: नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये भाजप पिछाडीवर, राजदच्या मित्रपक्षाकडून प्रशात किशोर यांना विजयापूर्वीच शुभेच्छा
नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये भाजप पिछाडीवर, प्रशांत किशोर यांना निकालापूर्वीच राजदच्या मित्रपक्षाच्या शुभेच्छा
Vinesh Phogat On Brij Bhushan Sharan Singh: लैंगिक छळाच्या आरोपातून बृजभूषण सिंह यांची निर्दोष मुक्तता; विनेश फोगाट यांची पहिली प्रतिक्रिया, सगळं सांगून टाकलं!
लैंगिक छळाच्या आरोपातून बृजभूषण सिंह यांची निर्दोष मुक्तता; विनेश फोगाट यांची पहिली प्रतिक्रिया, सगळं सांगून टाकलं!

व्हिडीओ

Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bankipur By-election Prashant Kishor: 'बांकीपूरमध्ये आम्ही कुत्र्या मांजराला उभं केलं तरी निवडून येईल..' भाजपला ते वाक्य महागात पडलं, प्रशांत किशोर भक्कम विजयाच्या दिशेनं
'बांकीपूरमध्ये आम्ही कुत्र्या मांजराला उभं केलं तरी निवडून येईल..' भाजपला ते वाक्य महागात पडलं, प्रशांत किशोर भक्कम विजयाच्या दिशेनं
देव तारी त्याला कोण मारी... मिसिंग लिंकजवळ खोल दरीत कोसळली कार; झाडाला अडकल्याने बचावला ड्रायव्हर
देव तारी त्याला कोण मारी... मिसिंग लिंकजवळ खोल दरीत कोसळली कार; झाडाला अडकल्याने बचावला ड्रायव्हर
मुंबईतील SRA कार्यालयात रोहित पवार-आदित्य ठाकरेंची अचानक भेट; दोन अधिकाऱ्यांवर कारवाईची आमदार पवारांची मागणी
मुंबईतील SRA कार्यालयात रोहित पवार-आदित्य ठाकरेंची अचानक भेट; दोन अधिकाऱ्यांवर कारवाईची आमदार पवारांची मागणी
Vinesh Phogat On Brij Bhushan Sharan Singh: लैंगिक छळाच्या आरोपातून बृजभूषण सिंह यांची निर्दोष मुक्तता; विनेश फोगाट यांची पहिली प्रतिक्रिया, सगळं सांगून टाकलं!
लैंगिक छळाच्या आरोपातून बृजभूषण सिंह यांची निर्दोष मुक्तता; विनेश फोगाट यांची पहिली प्रतिक्रिया, सगळं सांगून टाकलं!
Bankipur By Election Result: नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये भाजप पिछाडीवर, राजदच्या मित्रपक्षाकडून प्रशात किशोर यांना विजयापूर्वीच शुभेच्छा
नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये भाजप पिछाडीवर, प्रशांत किशोर यांना निकालापूर्वीच राजदच्या मित्रपक्षाच्या शुभेच्छा
धक्कादायक! रात्रीच्या प्रवासात खासगी ट्रॅव्हलमध्ये महिलेचा दोनवेळा विनयभंग; लाडक्या बहिणीच्या तक्रारीनंतर बस थेट पोलीस ठाण्यात
धक्कादायक! रात्रीच्या प्रवासात खासगी ट्रॅव्हलमध्ये महिलेचा दोनवेळा विनयभंग; लाडक्या बहिणीच्या तक्रारीनंतर बस थेट पोलीस ठाण्यात
Bankipur By-election Prashant Kishor: प्रशांत किशोरांची बांकीपुरात निर्णायक आघाडीकडे वाटचाल, भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्यात तगडा हादरा बसल्याने पक्षासह ऑफिसमध्येही अभुतपूर्व सन्नाटा
प्रशांत किशोरांची बांकीपुरात निर्णायक आघाडीकडे वाटचाल, भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्यात तगडा हादरा बसल्याने पक्षासह ऑफिसमध्येही अभुतपूर्व सन्नाटा
'बिग बॉस मराठी' विनर झाल्यानंतर तन्वी कोलतेचं पहिलं वहिलं अल्बम साँग; नव्या लूकची चाहत्यांना पडलीय भूरळ, PHOTOs
'बिग बॉस मराठी' विनर झाल्यानंतर तन्वी कोलतेचं पहिलं वहिलं अल्बम साँग; नव्या लूकची चाहत्यांना पडलीय भूरळ, PHOTOs
Embed widget