एक्स्प्लोर

सर्वांनाच जुन्या नोटा बदलण्याची मुदत 31 मार्च का नाही? : कोर्ट

नवी दिल्ली : नोटाबंदी लागू केल्यानंतर जुन्या नोटा बदलण्यासाठी दिलेल्या मुदतीचा प्रश्न पुन्हा डोकं वर काढत आहे. फक्त भारताबाहेर असणाऱ्या व्यक्तीच नाही, तर सरसकट सर्वच नागरिकांना पाचशे आणि हजार रुपयांच्या जुन्या नोटा बदलण्याची मुदत 31 मार्चपर्यंत का नाही ठेवली, असा प्रश्न सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला विचारला आहे. केंद्र सरकारला दोन आठवड्यात उत्तर देण्याची नोटीस सुप्रीम कोर्टाने बजावली आहे. सुप्रीम कोर्टात तीन याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. 8 नोव्हेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या संबोधनात 31 मार्चपर्यंत जुन्या नोटा रिझर्व्ह बँकेत जमा करण्यास सांगितलं होतं. त्यानंतर मात्र ही मुदत फक्त भारताबाहेर असलेल्या व्यक्ती किंवा एनआरआयसाठी असल्याचं स्पष्ट केलं, असं याचिकेत म्हटलं आहे. सरकारच्या उत्तरानंतरही याचिकाकर्त्यांचा युक्तिवाद योग्य वाटला, तर नोटा बदलण्यासाठी विशेष परवानगी देण्याबाबत विचार करण्यात येईल. मात्र तसं न झाल्यास जुन्या नोटा बाळगल्याप्रकरणी कारवाई करण्यापासून कोर्ट सरकारला रोखू शकणार नाही, असं सुप्रीम कोर्टाने याचिकाकर्त्यांना सांगितलं. याचिकेत काय ? आपण गर्भवती असल्यामुळे आणि उपचारांसाठी रुग्णालयात दाखल असल्यामुळे 8 नोव्हेंबर ते 30 डिसेंबर या कालावधीत जुन्या नोटा बदलण्यासाठी बँकेत जाऊ न शकल्याचा दावा एका महिलेने केला आहे. दुसऱ्या एका महिलेने आपल्या दिवंगत पतीने साठवून ठेवलेल्या पैशांविषयी त्या कालावधीत माहिती न मिळाल्यामुळे विलंब झाल्याचं म्हटलं आहे. अॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांनी मात्र याचिकाकर्त्यांचा विरोध करताना प्रत्येकाकडे बँकेत पैसे जमा करण्यासाठी खूप कालावधी होता, असं सरकारतर्फे सांगितलं आहे. यावर याचिकाकर्त्यांनी पंतप्रधानांनी 8 नोव्हेंबरला केलेल्या भाषणाचा दाखला दिला. मात्र या भाषणाला कायदेशीर महत्त्व नसून त्यानंतर तातडीने नोटीफिकेशन निघालं होतं, त्यात तारखेबाबत सुस्पष्टता असल्याचं रोहतगींनी अधोरेखित केलं.

महत्त्वाच्या बातम्या

दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयाच्या दारात बुलडोझर फिरवला; बॅरिकेड्स आणि कुंपण हटवलं, इस्लामाबादमधील कारवाईनंतर जोरदार प्रत्युत्तर
दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयाच्या दारात बुलडोझर फिरवला; बॅरिकेड्स आणि कुंपण हटवलं, इस्लामाबादमधील कारवाईनंतर जोरदार प्रत्युत्तर
अवघ्या चार महिन्यांत 10 प्रकरणांमध्ये 22 आरोपींना मृत्युदंडाची शिक्षा, वकील आणि पक्षकार सुद्धा हबकले; न्यायाधीशांकडून 100 प्रलंबित खटले तातडीने काढून घेतले
अवघ्या चार महिन्यांत 10 प्रकरणांमध्ये 22 आरोपींना मृत्युदंडाची शिक्षा, वकील आणि पक्षकार सुद्धा हबकले; न्यायाधीशांकडून 100 प्रलंबित खटले तातडीने काढून घेतले
ऑटोचालकाच्या घरात सापडले 3 कोटी रुपये, दोन दिवस झाले तरी कोणीच केला नाही दावा, नेमके पैसे कोणाचे?  
ऑटोचालकाच्या घरात सापडले 3 कोटी रुपये, दोन दिवस झाले तरी कोणीच केला नाही दावा, नेमके पैसे कोणाचे?  
मुथय्या मुरलीधरन ते वसीम अक्रम! 'असा' पराक्रम करणारे फक्त पाचच गोलंदाज, भारतीय खेळाडूचा समावेश आहे का?
मुथय्या मुरलीधरन ते वसीम अक्रम! 'असा' पराक्रम करणारे फक्त पाचच गोलंदाज, भारतीय खेळाडूचा समावेश आहे का?

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयाच्या दारात बुलडोझर फिरवला; बॅरिकेड्स आणि कुंपण हटवलं, इस्लामाबादमधील कारवाईनंतर जोरदार प्रत्युत्तर
दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयाच्या दारात बुलडोझर फिरवला; बॅरिकेड्स आणि कुंपण हटवलं, इस्लामाबादमधील कारवाईनंतर जोरदार प्रत्युत्तर
Nashik Crime News: मैत्रीत दगाफटका; फिरायला गेले अन् मित्राने महिलेला कारनं चिरडलं, अपघाताचा बनाव रचला पण..., असं फुटलं बिंग, नाशिकमधील घटना
मैत्रीत दगाफटका; फिरायला गेले अन् मित्राने महिलेला कारनं चिरडलं, अपघाताचा बनाव रचला पण..., असं फुटलं बिंग, नाशिकमधील घटना
Harshvardhan Sapkal : थोडी तरी लाज शिल्लक असेल तर सरकारने तातडीनं सुप्रीम कोर्टात जावं; डॉ. नरेंद्र दाभोळकर प्रकरणी हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
थोडी तरी लाज शिल्लक असेल तर सरकारने तातडीनं सुप्रीम कोर्टात जावं; डॉ. नरेंद्र दाभोळकर प्रकरणी हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
15 ते 20 कोटींचा पाऊस पाडण्याचं आमिष, अल्पवयीन मुलीचा वापर; तेलंगणातील भोंदूबाबाला लातूरमधून अटक
15 ते 20 कोटींचा पाऊस पाडण्याचं आमिष, अल्पवयीन मुलीचा वापर; तेलंगणातील भोंदूबाबाला लातूरमधून अटक
Shweta Tiwari on Tukaram Mundhe: 'तुकाराम मुढेंजी तुम्ही कुठं आहात? इकडं लक्ष द्या...' ऑनलाईन डिलीव्हरी घरी पोहोचताच धक्का बसला, श्वेता तिवारीची तक्रार, नेमकं काय घडलं?
'तुकाराम मुढेंजी तुम्ही कुठं आहात? इकडं लक्ष द्या...' ऑनलाईन डिलीव्हरी घरी पोहोचताच धक्का बसला, श्वेता तिवारीची तक्रार, नेमकं काय घडलं?
Ajit Agarkar: निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांचा पगार किती कोटींच्या घरात? पदावर येताच बीसीसीआयने दिली होती तब्बल 300 टक्क्यांची घसघशीत वाढ!
निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांचा पगार किती कोटींच्या घरात? पदावर येताच बीसीसीआयने दिली होती तब्बल 300 टक्क्यांची घसघशीत वाढ!
Pune Crime: राष्ट्रीय संघातील खेळाडूने पुण्यात आयुष्य संपवलं, बीडमधील राष्ट्रीय खो-खो खेळाडू तुषार करांडेचं टोकाचं पाऊल
राष्ट्रीय संघातील खेळाडूने पुण्यात आयुष्य संपवलं, बीडमधील राष्ट्रीय खो-खो खेळाडू तुषार करांडेचं टोकाचं पाऊल
Mumbai Crime News: जुन्या 'त्या' गोष्टीचा मनात राग; सासूनेच रचला दुबई रिटर्न सुनेला संपवण्याचा कट, तीन लाखांची सुपारी दिली, पोलिसांची चक्र फिरली अन्...
जुन्या 'त्या' गोष्टीचा मनात राग; सासूनेच रचला दुबई रिटर्न सुनेला संपवण्याचा कट, तीन लाखांची सुपारी दिली, पोलिसांची चक्र फिरली अन्...
Embed widget