एक्स्प्लोर

"सैन्य चीन सीमेवर विनाशस्त्र का पाठवलं?", राहुल गांधींचा सवाल

भारत-चीन सीमेवर 45 वर्षांनी रक्त सांडलं आणि राजकीय वर्तुळातही त्याचे जोरदार पडसाद उमटले. निवृत्त ले. जनरल एच एस पनाग यांच्या मुलाखतीचा आधार घेत राहुल गांधींनी सरकारवर हल्लाबोल केला.

नवी दिल्ली : चीनच्या मुद्द्यावरुन सरकारवर एकापाठोपाठ एक प्रश्न उपस्थित करणाऱ्या राहुल गांधींनी आज एक गंभीर आरोप सरकारवर केला. आपलं सैन्य चीन सीमेवर विनाशस्त्र का पाठवलं गेलं. हा प्रश्न निवृत्त लष्करी अधिकाऱ्यांच्या मुलाखतीचा हवाला देत राहुल गांधींनी उपस्थित केला. त्यावरुन भाजपनंही जोरदार पलटवार केला आहे.

भारत-चीन सीमेवर 45 वर्षांनी रक्त सांडलं आणि राजकीय वर्तुळातही त्याचे जोरदार पडसाद उमटले. निवृत्त ले. जनरल एच एस पनाग यांच्या मुलाखतीचा आधार घेत राहुल गांधींनी सरकारवर हल्लाबोल केला. सीमेवर आपल्या जवानांना विनाशस्त्र का पाठवलं.

गलवान खोऱ्यात जी घटना घडली, त्यात गोळीबार झाला नाही असं सांगितलं गेलंय. चीननं कसा विश्वासघात केला हे परराष्ट्र मंत्रालयाच्या वक्तव्ययातही समोर आलं. पण मुळात आपल्या जवानांना तिथे विनाशस्त्र का पाठवलं गेलं. त्यांना कुठलंही बँकिंग का दिलं गेलं नव्हतं असा आरोप काँग्रेसनं केलाय. ज्या मुलाखतीच्या आधारे राहुल गांधी यांनी हा आरोप केला.

राहुल गांधींनी हा आरोप केल्यानंतर त्यावर भाजपनंही तातडीनं प्रत्युत्तर दिलं.अशा संकटाच्या काळात राहुल गांधी हे चीनच्या फायद्याची भाषा बोलतायत, मोदींवर प्रश्न उपस्थित करणं म्हणजे देशावरच प्रश्न उपस्थित करणं असं म्हणत संबित पात्रा यांनी हल्लाबोल केला. सीमेवर ही घटना घडल्यानंतर सरकारच्या वतीनं प्रतिक्रिया यायलाही 24 तास उशीर झाला. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी श्रद्धांजली वाहिल्यानंतर त्यावरही राहुल गांधींनी पाच प्रश्न उपस्थित केले होते.

चीनच्या मुद्द्यावर पंतप्रधान मोदींनी उद्या सर्वपक्षीय बैठकही बोलावली आहे. या बैठकीत सरकारची बाजू मांडली जाईल. पण त्याआधीच राजकीय वातावरण तापलंय.त्यामुळे उद्याची बैठक वादळी होणार याची चिन्हं दिसू लागलीयत.

संबंधित बातम्या :

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 नोव्हेंबर 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 नोव्हेंबर 2026 | गुरुवार
RBI चा नवीन नियम माहित आहे का? आता बँक खाते नसतानाही तुम्ही पैसे मिळवू शकता, जाणून घ्या सविस्तर माहिती 
RBI चा नवीन नियम माहित आहे का? आता बँक खाते नसतानाही तुम्ही पैसे मिळवू शकता, जाणून घ्या सविस्तर माहिती 
मदर डेअरीनंतर अमूलचाही मोठा निर्णय, दुधाच्या दरात केली मोठी वाढ, नवीन दर काय?
मदर डेअरीनंतर अमूलचाही मोठा निर्णय, दुधाच्या दरात केली मोठी वाढ, नवीन दर काय?
अर्शदीपची समरीनकडून विकेट; टीम इंडियाच्या गोलंदाजाचा फिल्मीस्टाईल प्रपोज, साखरपुड्यानंतर नवी इनिंग
अर्शदीपची समरीनकडून विकेट; टीम इंडियाच्या गोलंदाजाचा फिल्मीस्टाईल प्रपोज, साखरपुड्यानंतर नवी इनिंग

व्हिडीओ

Hasan Mushrif PC Kolhapur : संजय राऊतांनी आमच्यापक्षात नाक खुपसू नये, हसन मुश्रीफांचा इशारा
NCP Crisis : शरद पवारांच्या राष्ट्रवादीत विलीनीकरणावरून चार वेगवेगळे मतप्रवाह
Omraje Nimbalkar call : आमच्या गावचा रस्ता कधी करता ? खासदार ओमराजेंना चिमुकल्याचा थेट सवाल
Ravindra Dhangekar on Chandrakant Patil:Satej Patil यांच्यावरील टीकेला उत्तर,चंद्रकांत पाटलांवर टीका
Majha Katta Mrudula Dadhe EP 1 : अजरामर गाण्यांमागच्या अफलातून गोष्टी, मृदुला दाढेंसोबत शब्दसुरांची मैफल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Amravati Farmer: अमरावतीत मायक्रो फायनान्सच्या जाचाला कंटाळून शेतकऱ्यानं स्वतःला विहिरीत झोकून दिलं;पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून गंभीर दखल, म्हणाले...
अमरावतीत मायक्रो फायनान्सच्या जाचाला कंटाळून शेतकऱ्यानं स्वतःला विहिरीत झोकून दिलं; पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून गंभीर दखल, म्हणाले...
Nvidia :  एनवीडियाचे सीईओ जेनसेन हुआंग यांचा राजीनामा, चिनी महिलेसोबतचं प्रेमप्रकरण भोवलं, जेनसेन हुआंगच्या अडचणीत वाढ
एनवीडियाचे सीईओ जेनसेन हुआंग यांचा राजीनामा, चिनी महिलेसोबतचं प्रेमप्रकरण भोवलं
Mumbai Police : मुंबई पोलीस दलातील जवानानं जीवन संपवलं, पोलिसानं टोकाचं पाऊल का उचललं? कारण समोर
मुंबई पोलीस दलातील जवानानं जीवन संपवलं, पोलिसानं टोकाचं पाऊल का उचललं? कारण समोर
Nagpur Hotel Fire : नागपूरमधील अनंततारा हॉटेलला आग, शॉर्ट सर्किटनं आग लागली, एका व्यक्तीचा मृत्यू, तीन जण जखमी
नागपूरमधील अनंततारा हॉटेलला आग, शॉर्ट सर्किटनं आग लागली, एका व्यक्तीचा मृत्यू, तीन जण जखमी
NCP Merger : माझा भाऊ गेला तेव्हाच माझ्यासाठी तो विषय संपला,सुप्रिया सुळे यांचं राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चांवर भाष्य
माझा भाऊ गेला तेव्हाच माझ्यासाठी तो विषय संपला, सुप्रिया सुळेंचं विलिनीकरणावर स्पष्ट मत
दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र यायचं ठरलं होतं, 18 जानेवारीला बैठक झालेली; विलिनीकरणाबाबत हर्षवर्धन पाटलांनी सगळं सांगितलं
दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र यायचं ठरलं होतं, 18 जानेवारीला बैठक झालेली; विलिनीकरणाबाबत हर्षवर्धन पाटलांनी सगळं सांगितलं
Gold Rate : सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण, IBJA कडून दर जाहीर, डिसेंबरमध्ये सोनं दीड लाखांचा टप्पा पार करणार, तज्ज्ञांचा अंदाज
सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण, चांदी 3901 रुपयांनी स्वस्त, IBJA कडून दर जाहीर
तहसील कार्यालयात अस्वच्छता, मंत्री गिरीश महाजनांच्या हाती झाडू; दारुच्या रिकाम्या बाटल्या पाहून संताप
तहसील कार्यालयात अस्वच्छता, मंत्री गिरीश महाजनांच्या हाती झाडू; दारुच्या रिकाम्या बाटल्या पाहून संताप
Embed widget