WHO : भारतातील कफ सिरप बनवणाऱ्या कंपनीविरुद्ध डब्ल्यूएचओकडून (WHO) अलर्ट जारी करण्यात आलाय. WHO ने मेडेन फार्मास्युटिकल्स ऑफ इंडियाने बनवलेल्या खोकला आणि सर्दी सिरपवर वैद्यकीय उत्पादन अलर्ट जारी केला आहे. डब्ल्यूएचओने किडनीच्या दुखापतींशी आणि गॅम्बियामधील 66 मुलांच्या मृत्यूवरून हा अलर्ट जारी केलाय. रॉयटर्सने डब्ल्यूएचओच्या हवाल्याने सांगितले की, कंपनी आणि नियामक प्राधिकरणांसोबत पुढील तपास केला जात आहे. 


मेडेन फार्मास्युटिकल्स ऑफ इंडियाने बनवलेल्या चार उत्पादनांपैकी प्रत्येकाच्या नमुन्यांच्या प्रयोगशाळेतील विश्लेषणाने खाक्षी केली की त्यामध्ये डायथिलीन ग्लायकोल आणि इथिलीन ग्लायकोलची अस्वीकार्य मात्रा असल्याचे WHO ने वैद्यकीय उत्पादनाच्या अलर्टमध्ये म्हटले आहे. डब्ल्यूएचओचे महासंचालक डॉ. टेड्रोस अॅधानोम गेब्रेयसस यांनी याबाबत सांगितले की, डब्ल्यूएचओने आज गांबियामध्ये गंभीर मूत्रपिंडाच्या दुखापती आणि मुलांमधील 66 मृत्यूंशी संबंधित असलेल्या चार दूषित औषधांसाठी वैद्यकीय उत्पादन अलर्ट जारी केला आहे. या मुलांच्या मृत्यूने त्यांच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.  






इतर देशांना अलर्ट


"भारतातील मेडेन फार्मास्युटिकल्स लिमिटेडद्वारे खोकला आणि सर्दी सिरप ही चार औषधे तयार करण्यात आली आहेत. WHO भारतातील संबंधित कंपनी आणि नियामक प्राधिकरणांसह पुढील तपास करत आहे. दूषित उत्पादने आतापर्यंत फक्त गॅम्बियामध्ये आढळली आहेत, ती इतर देशांमध्ये वितरित केली गेली असतील. डब्ल्यूएचओ सर्व देशांतील रूग्णांनाचे आणखी नुकसान टाळण्यासाठी ही उत्पादने शोधून ती नष्ट करण्याची शिफारस करतो, असे डब्ल्यूएचओचे महासंचालक डॉ. टेड्रोस अॅधानोम गेब्रेयसस यांनी म्हटले आहे.  


महत्वाच्या बातम्या


Medicine QR Code: औषध बनावट की सुरक्षित? सत्यता पडताळण्यासाठी क्यूआर कोड; लवकरच यंत्रणा आणणार 


कोरोना महामारीचा अंत जवळ आलाय, WHO अध्यक्षांचं मोठं वक्तव्य