Medicine QR Code: बनावट औषधांमुळे अनेक वेळा रुग्णांना शारीरिक समस्या जाणावतात. गेल्या काही दिवसांपासून बनावट औषधांची प्रकरणे समोर येत आहेत. बनावट औषधं ओळखण्यासाठी सध्या कोणतीही यंत्रणा किंवा सुविधा ग्राहकांकडे नाही. मात्र लवकरच औषधांची सत्यता पडताळण्यासाठी क्यूआर कोड ही सुविधा आता येणार आहे. क्यूआर कोड स्कॅन (Medicine QR Code) केल्यानंतर तुम्हाला औषधांची सविस्तर माहिती मिळणार आहे. सुरुवातीला ठराविक औषधांसाठी हा प्रयोग केला जाईल. ज्यात 100 रुपयांहून अधिक किंमतीच्या औषधांचा समावेश असेल. तसंच सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या औषधांसाठी लवकरात लवकर क्यूआर कोड कार्यन्वित केला जाईल. खरं तर अनेक वर्षांपासून या प्रयोगाची अंमलबजावणी प्रतीक्षेत आहे. 


 'ट्रॅक अँड ट्रेस' यंत्रणा आणणार


बनावट आणि निकृष्ट दर्ज्याच्या औषधांचा वापर रोखण्यासाठी आणि औषधांची  सत्यता पडताळण्यासाठी  'ट्रॅक अँड ट्रेस' ही यंत्रणा सुरु करण्याची सरकारची योजना केली आहे. या अंतर्गत, पहिल्या टप्प्यात फार्मास्युटिकल कंपन्या सर्वाधिक विकल्या जाणार्‍या 300 औषधांच्या प्राथमिक उत्पादन पॅकेजिंग लेबलवर बारकोड किंवा QR (क्विक रिस्पॉन्स-QR) कोड लावतील. प्राधमिक उत्पादनांमध्ये बाटल्या, कॅन, जार यांमध्ये विक्री केल्या जाणाऱ्या औषधांचा समावेश होणार आहे.  


बनावट औषधांच्या प्रकरणात वाढ 


हिमाचल प्रदेशातील बड्डीमध्ये ग्लेनमार्कच्या ब्लड प्रेशरच्या बनावट गोळ्यांचा पर्दाफाश झाला होता. तसेच काही दिवसांपूर्वी  तेलंगणा औषध प्राधिकरणाला थायरॉईड औषध थायरोनॉर्मची गुणवत्ता खराब असल्याचे आढळले. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) नुसार, कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये सुमारे 10% वैद्यकीय उत्पादने निकृष्ट किंवा बनावट आहेत. त्यामुळे आता सरकारनं  'ट्रॅक अँड ट्रेस'  ही यंत्रणा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. संपूर्ण फार्मास्युटिकल उद्योगासाठी एकच बारकोड प्रदान करण्यासाठी केंद्रीय डेटाबेस एजन्सी स्थापन करण्यासह अनेक पर्यायांचा अभ्यास केला जात आहे. या यंत्रणेच्या अंमलबजावणीसाठी काही आठवडे लागू शकतात.  'ट्रॅक अँड ट्रेस' या योजनेमुळे आता अनेक रुग्णांना तसेच वृद्धांना  त्यांच्या औषधांची सविस्तर माहिती घरबसल्या क्यूआर कोड स्कॅन करुन मिळवता येणार आहे. 



वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: