Coronavirus pandemic : कोरोना महामारीचा अंत दृष्टीक्षेपात आला आहे. सध्या कोरोनाची जगभरात असलेली स्थिती, याआधी कधीही नव्हती. तीन वर्षांमध्ये पहिल्यांदाच कोरोना रुग्णांचा आलेख इतका घसरल्याचं पाहायला मिळत आहे, असे जागतिक आरोग्य संघटनेचे (WHO) प्रमुख टेड्रोस अॅडनोम गेब्रेयसस यांनी सांगितलं. ते जिनिव्हा येथे साप्ताहिक पत्रकार परिषदेत बोलत होते. कोरोना महामारी अद्याप संपलेली नाही. पण सध्याच्या परिस्थितीत त्याचा अंत दृष्टीक्षेपात दिसतोय. कारण, जगभरातील सध्याची कोरोनाची स्थिती आधीपेक्षा चांगली आहे. पण भविष्यात कोरोनाचे नवे व्हेरियंट आपल्यावर धोका वाढू शकतो, असे टेड्रोस अॅडनोम गेब्रेयसस म्हणाले.
जगभरात कोरोना महामारीमुळे 60 ते 65 लाख लोकांचा मृत्यू झालाय. तीन वर्षांपासून जगभरात कोरोना महामारीनं धुमाकुळ घातलाय. पण सध्याची जगभरातील कोरोनाची स्थिती आधीपेक्षा चांगली आहे. मार्च 2020 नंतर पहिल्यांदाच गेल्या आठवड्यात सर्वात कमी मृत्यूची नोंद झाली आहे. कोरोना मृत्यूमध्ये तब्बल 22 टक्क्यांनी घट आली आहे. त्यामुळे कोरोना महामारीचा शेवट दृष्टीक्षेपात दिसतोय. दरम्यान, जगभरात आतापर्यंत 616,154,218 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. चीनमधून उदयास आलेल्या या व्हायरसमुळे 6,525,964 जणांचा मृत्यू झालाय. दिलासादायक बाब म्हणजे, जगभरात आतापर्यंत 595,318,378 जणांनी कोरोनावर मात केली आहे. मागील काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठी घट पाहायला मिळत आहे. तसचे कोरोना संक्रमणाची स्थितीही गंभीर वाटत नाही.
टेड्रोस अॅडनोम गेब्रेयसस म्हणाले म्हणाले की, मॅरेथॉनमध्ये धावणारे खेळाडू विजयाची रेषा दिसल्यानंतर आणखी वेगानं धावतात. थांबत नाहीत.. पूर्ण ताकदीनं धावतात. आपल्यालाही त्याचप्रमाणे आता थांबयाचं नाही. कोरोनाच्या शेवटाची रेषा आपल्याला दिसतेय. विजयासाठी सर्वांना प्रयत्न करायचे आहेत. कोरोना अद्याप संपलेला नाही, त्याचा अंत दृष्टीक्षेपात आहे. त्यामुळे सर्वांनी प्रयत्न करायला हवा. जगभरातील सर्व देशांनी सध्याच्या परिस्थितीचा फायदा घ्यायला हवा. सध्याच्या परिस्थितीचा फायदा करुन घेतला नाही, तर नवीन व्हेरियंट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे मृत्यूही होऊ शकतात. त्यामुळे कोरोना महामारीचा शेवट दिसत आहे, सर्वांनी त्यासाठी प्रयत्न करायला हवेत.
दरम्यान, कोरोना महामारीचा उदया चीनमध्ये 2019 च्या शेवटला झाला होता. त्यानंतर जानेवारी 2020 मध्ये जागतिक आणीबाणी घोषित करण्यात आली. कोरोना महामारीमुळे जगभरात 60 ते 65 लाख लोकांचा मृत्यू झालाय. तसेच अनेक देशांची आरोग्य व्यवस्था ढासळली होती. कोरोना महामारीमुळे जागात आर्थिक मंदीचं सावटही आलं होतं.