एक्स्प्लोर

West Bengal : धगधगतं बंगाल! हत्या, गोळीबारानंतर आता हावडामध्ये बॉम्ब फोडला, भाजपचे दोन कार्यकर्ते जखमी

West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालानंतर राजकीय हिंसाचार वाढला असून हावड्यात भाजप कार्यकर्त्यांवर बॉम्बहल्ला करण्यात आला. या घटनेत दोन कार्यकर्ते जखमी झाले आहेत.

West Bengal Violence : पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राजकीय वातावरण अधिकच तापलं आहे. भाजप नेते शुभेंदू अधिकारी यांच्या खासगी सहायकाच्या हत्येनंतर आता हावड्यात बॉम्बहल्ल्याची घटना समोर आली आहे. टीएमसी समर्थकांकडून देशी बॉम्ब फेकण्यात आल्याचा आरोप भाजपने केला असून या हल्ल्यात भाजपचे दोन कार्यकर्ते जखमी झाले आहेत. जखमी कार्यकर्त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर परिसरात मोठा तणाव निर्माण झाला आहे.

West Bengal News : हावड्यात भाजप-टीएमसी कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष

गुरुवारी हावड्यातील शिबपूर भागातील चौराबस्ती परिसरात भाजप आणि तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार संघर्ष झाल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर कथितरित्या बॉम्बफेक करण्यात आल्याची माहिती आहे. घटनेनंतर मोठ्या प्रमाणात पोलीस आणि केंद्रीय सुरक्षा दल घटनास्थळी दाखल झाले.

या हिंसक घटनेमुळे परिसरातील सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणल्याचा दावा केला असून हल्ल्यामागील कारणांचा तपास सुरू आहे.

Howrah Political Clash : पोलिसांचा तपास सुरू

हावडा सिटी पोलीस आयुक्त अखिलेश चतुर्वेदी यांनी या घटनेला राजकीय संघर्ष असल्याचं म्हटलं आहे. “शिबपूरच्या चौराबस्ती भागात राजकीय संघर्ष झाला असून त्यात एक व्यक्ती जखमी झाली आहे. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. या घटनेत सहभागी असलेल्या सर्वांना लवकरच अटक केली जाईल,” असं त्यांनी सांगितलं.

दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर सातत्याने हिंसक घटनांच्या बातम्या समोर येत आहेत. भाजप आणि टीएमसी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत असून राज्यातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Bengal Political Tension : बंगालमध्ये राजकीय वाद तापला 

निवडणुकीच्या निकालानंतर पश्चिम बंगालमध्ये अनेक भागांत तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. शुभेंदू अधिकारी यांचे पीए चंद्रनाथ रथ यांच्या हत्येनंतर आता हावड्यातील बॉम्बहल्ल्यामुळे राजकीय संघर्ष आणखी तीव्र झाल्याचं चित्र आहे.

ही बातमी वाचा:

महत्त्वाच्या बातम्या

शेतकऱ्यांसाठी तमिळनाडू सरकारचा मोठा निर्णय, उसाला प्रति टन 4 हजार रुपयांचा दर जाहीर, महाराष्ट्रात किती? 
शेतकऱ्यांसाठी तमिळनाडू सरकारचा मोठा निर्णय, उसाला प्रति टन 4 हजार रुपयांचा दर जाहीर, महाराष्ट्रात किती? 
Bar Council : बार काऊन्सिलनं निर्णय फिरवला, सरन्यायाधीशांना विरोध करणाऱ्या हैदराबाद येथील कायदा पदवीधर विद्यार्थ्यांच्या नोंदणीवरील स्थगिती मागे
बार काऊन्सिलनं निर्णय बदलला, सरन्यायाधीशांना विरोध विद्यार्थ्यांना दिलासा, कायदा पदवीधरांच्या वकील म्हणून नोंदणीचा मार्ग मोकळा 
बांधकाम सुरु असलेल्या बोगद्यात अचानक शिरलं पाणी आणि मलबा, ढिगाऱ्याखाली 18 कामगार अडकले, बाचवकार्य सुरु
बांधकाम सुरु असलेल्या बोगद्यात अचानक शिरलं पाणी आणि मलबा, ढिगाऱ्याखाली 18 कामगार अडकले, बाचवकार्य सुरु
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 

व्हिडीओ

Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
BAN vs AUS : बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका,  पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला 
बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला
Bar Council : बार काऊन्सिलनं निर्णय फिरवला, सरन्यायाधीशांना विरोध करणाऱ्या हैदराबाद येथील कायदा पदवीधर विद्यार्थ्यांच्या नोंदणीवरील स्थगिती मागे
बार काऊन्सिलनं निर्णय बदलला, सरन्यायाधीशांना विरोध विद्यार्थ्यांना दिलासा, कायदा पदवीधरांच्या वकील म्हणून नोंदणीचा मार्ग मोकळा 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
Embed widget