एक्स्प्लोर

Mukul Roy Died: माजी रेल्वे मंत्री, तृणमूल काँग्रेसचे संस्थापक मुकुल रॉय यांचे निधन; तृणमूल काँग्रेस - भाजपच्या राजकारणाला आकार देणारा बंगाली 'चाणक्य' हरपला

Mukul Roy: 1998 मध्ये तृणमूल काँग्रेसच्या स्थापनेत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती आणि ते ममता बॅनर्जी यांचे अत्यंत विश्वासू सहकारी मानले जात.

Mukul Roy Died: माजी रेल्वे मंत्री आणि तृणमूल काँग्रेसचे (TMC) संस्थापक सदस्य मुकुल रॉय यांचे वयाच्या 69 व्या वर्षी निधन झाले. मुकुल रॉय यांचे आज (23 फेब्रुवारी) पहाटे दीड वाजता वाजता कोलकातामधील अपोलो रुग्णालयात हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते गेल्या काही वर्षांपासून स्मृतिभ्रंश (Dementia) आणि इतर अनेक आरोग्य समस्यांशी झुंज देत होते. निधनापूर्वी काही दिवस ते कोमात होते. त्यांना अन्ननलिकेद्वारे द्रव आहार दिला जात होता.

बंगाली 'चाणक्य' हरपल्याची भावना

मुकुल रॉय यांच्या संघटनात्मक कौशल्यामुळे त्यांना 'बंगालच्या राजकारणाचे चाणक्य' म्हणून ओळखले जात असे. 1998 मध्ये तृणमूल काँग्रेसच्या स्थापनेत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती आणि ते ममता बॅनर्जी यांचे अत्यंत विश्वासू सहकारी मानले जात. यूपीए-2 (UPA II) सरकारच्या काळात त्यांनी जहाजबांधणी राज्यमंत्री आणि मार्च ते सप्टेंबर 2012 दरम्यान केंद्रीय रेल्वे मंत्री म्हणून काम पाहिले. 2011 मध्ये पश्चिम बंगालमधील 34 वर्षांची डाव्यांची सत्ता संपवून तृणमूल काँग्रेसला सत्तेत आणण्यामध्ये त्यांचा मोलाचा वाटा होता.

2017 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला 

तृणमुलच्या स्थापनेपासून सोबत असलेल्या मुकुल रॉय यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशी मतभेद झाल्यानंतर 2017 मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत बंगालमध्ये भाजपला 18 जागा जिंकून देण्यात मुख्य रणनीतीकार म्हणून काम केले. 2021 ची विधानसभा निवडणूक त्यांनी कृष्णनगर मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर जिंकली होती. जून 2021 मध्ये त्यांनी पुन्हा तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मात्र, पक्षबदल विरोधी कायद्याचे उल्लंघन केल्यामुळे 2025 मध्ये कलकत्ता उच्च न्यायालयाने त्यांची आमदारकी रद्द केली होती.

मुकुल रॉय यांचा राजकीय प्रवास हा अत्यंत चढ-उतारांचा राहिला, त्यांनी पश्चिम बंगालमधील राजकारणाला एक नवी दिशा दिली होती.

इतर महत्वाच्या बातम्या

जून 2022 पासून एबीपी माझा डिजिटल टीममध्ये असून गेल्या चार वर्षांपासून डिजिटल मीडियामध्ये कार्यरत. यापूर्वी दैनिक पुढारी, सकाळ, ईटीव्ही मराठी अशा संस्थामध्ये कामाचा अनुभव. समाजकारण, राजकारण तसेच मध्य पूर्वेतील विविध विषयांवर गेल्या आठ वर्षांपासून सातत्याने लिखाण.  
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अक्षर पटेलने ते दोन अफलातून कॅच कसे पकडले? मनात नेमकं काय चाललं होतं? 'बापू'चा व्हिडीओ व्हायरल
अक्षर पटेलने ते दोन अफलातून कॅच कसे पकडले? मनात नेमकं काय चाललं होतं? 'बापू'चा व्हिडीओ व्हायरल
UPSC Result : भाजप नेत्याचा मुलगा UPSC परीक्षेत देशात तिसरा, आठ वर्षांच्या मेहनतीला फळ
भाजप नेत्याचा मुलगा UPSC परीक्षेत देशात तिसरा, आठ वर्षांच्या मेहनतीला फळ
अमेरिकेची रशियन तेल घेण्यास 30 दिवसांची परवानगी; राहुल गांधींचा ससंदेतील शब्द खरा ठरल्याची चर्चा; म्हणाले, 'हे देशाचं 'धोरण' नाही, ते तडजोड करणाऱ्या व्यक्तीच्या शोषणाचा परिणाम'
अमेरिकेची रशियन तेल घेण्यास 30 दिवसांची परवानगी; राहुल गांधींचा ससंदेतील शब्द खरा ठरल्याची चर्चा; म्हणाले, 'हे देशाचं 'धोरण' नाही, ते तडजोड करणाऱ्या व्यक्तीच्या शोषणाचा परिणाम'
Karnataka Social Media Ban : 16 वर्षाखालील मुलांच्या सोशल मीडिया वापरावर बंदीचा प्रस्ताव, कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय
16 वर्षाखालील मुलांच्या सोशल मीडिया वापरावर बंदीचा प्रस्ताव, कर्नाटकचं मोठं पाऊल
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Donald Trump on Iran : बलाढ्य अमेरिकेवर इराण भारी? Special Report
Mojtaba Khamenei Iran :  मोजतबा खामेनींच्या नावाला अमेरिकेचा विरोध Special Report
Gas Shortage India : शिगेला युद्धज्वर; भारत 'गॅस'वर Special Report
Amravati SSC Exam : पेपर लिहिला घरात, कोण जाणार तुरुंगात? Special Report
Shetkari KarjMafi : कर्जमाफी मिळणार, कधी, कशी आणि किती? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chana Price Crisis : हमीभाव 5,875 मात्र अकोल्यात हरभऱ्याची 4,800 ला खरेदी; शेतकऱ्यांची ‘मातीमोल’ विक्री
हमीभाव 5,875 मात्र अकोल्यात हरभऱ्याची 4,800 ला खरेदी; शेतकऱ्यांची ‘मातीमोल’ विक्री
NCP Merger : दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा शेवटचा प्रयत्न अपयशी, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा नो रिस्पॉन्स, अखेर शरद पवार मविआचे उमेदवार बनले
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा शेवटचा प्रयत्नही फसला, अखेर शरद पवार मविआचे उमेदवार बनले, इनसाईड स्टोरी समोर
Team India : जिंकण्यासाठी अंधश्रद्धा? टीम इंडियाने अहमदाबादचं हॉटेल अन् ड्रेसिंग रुम बदलली; 'मोदी स्टेडियम'वरच्या पराभवाची आठवण पुसण्यासाठी निर्णय? 
जिंकण्यासाठी अंधश्रद्धा? टीम इंडियाने अहमदाबादचं हॉटेल अन् ड्रेसिंग रुम बदलली; 'मोदी स्टेडियम'वरच्या पराभवाची आठवण पुसण्यासाठी निर्णय? 
'सात बारा कोरा, कोरा ,कोरा म्हणत टाहो फोडून मते घेतली, मात्र दोन लाखांपर्यंतची तकलादू कर्जमाफी देत शेतकऱ्यांचा विश्वासघात केला, अटी आणि शर्तींमुळे..' ; राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल
'सात बारा कोरा, कोरा ,कोरा म्हणत टाहो फोडून मते घेतली, मात्र दोन लाखांपर्यंतची तकलादू कर्जमाफी देत शेतकऱ्यांचा विश्वासघात केला, अटी आणि शर्तींमुळे..' ; राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल
IND vs NZ : टी 20 वर्ल्ड कपच्या फायनलसाठी भारतीय संघात बदल? वरुण चक्रवर्तीला बाहेरचा रस्ता? कोणाला संधी मिळणार? 
टी 20 वर्ल्ड कपच्या फायनलसाठी भारतीय संघात बदल? वरुण चक्रवर्तीला बाहेरचा रस्ता? कोणाला संधी मिळणार? 
Eknath Shinde : लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? देवेंद्र फडणवीसांसमोरचं एकनाथ शिंदे म्हणाले...
लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? देवेंद्र फडणवीसांसमोरचं एकनाथ शिंदे म्हणाले...
Maharashtra Budget 2026:कोणतीही चालू योजना बंद केली जाणार नाही; देशातील पहिली 1 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याचे उद्दिष्ट महाराष्ट्र लवकरच पूर्ण करेल; मुख्यमंत्र्यांची ग्वाही
कोणतीही चालू योजना बंद केली जाणार नाही; देशातील पहिली 1 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याचे उद्दिष्ट महाराष्ट्र लवकरच पूर्ण करेल; मुख्यमंत्र्यांची ग्वाही
BMC : मनसेच्या यशवंत किल्लेदारांसाठी ठाकरेंच्या उमेदवाराची माघार, सहा प्रभाग समित्यांच्या निवडणुका बिनविरोध 
मनसेच्या यशवंत किल्लेदारांसाठी ठाकरेंच्या उमेदवाराची माघार, सहा प्रभाग समित्यांच्या निवडणुका बिनविरोध 
Embed widget