कोलकाता : आरजी कर वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील घटनेनंतर पश्चिम बंगालमधील कनिष्ठ डॉक्टरांनी कामबंद आंदोलन केले होते. गेल्या कित्येक दिवसांपासून हे आंदोलन चालूच होते. डॉक्टरांच्या या भूमिकेमुळे कोलकात्यातील वैद्यकीय सेवा कोलमडली होती. दरम्यान, डॉक्टरांनी हे आंदोलन मागे घ्यावे यासाठी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी मोठा निर्णय घेतला आहे. त्यांनी कोलकात्याच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्याला तसेच दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांना पदावरून हटवले आहे. तसेच डॉक्टरांच्या जवळपास सर्वच मागण्या मान्य केल्या आहेत. 


आंदोलन मागे घेतल्याची घोषणा केलेली नाही


डॉक्टरांनी आपले हे कामबंद आदोंलन मागे घ्यावे, यासाठी ममता बॅनर्जी यांच्याकडून प्रयत्न चालू होते. मात्र डॉक्टर आपल्या मागण्यांवर ठाम होते. दरम्यान, आता ममता बॅनर्जी यांनी कनिष्ठ डॉक्टरांच्या जवळपास 99 टक्के मागण्या मान्य केल्या आहेत. तसेच राज्यातील दोन आरोग्य अधिकाऱ्यांना तसेच कोलकात्याच्या पोलीस आयुक्तांना त्यांच्या पदावरून हटवण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय घेतला असला तरी अद्याप डॉक्टरांनी आपले हा आंदोलन मागे घेतल्याची घोषणा केलेली नाही. 


...तोपर्यंत आंदोलन मागे नाही


सोमवारी रात्री डॉक्टरांच्या प्रतिनिधींशी बैठक झाल्यानंतर ममता बॅनर्जी यांनी लोकांना संबोधित केले. तसेच डॉक्टरांच्या सर्व मागण्या मान्य करणे शक्य नाही. मात्र दोन आरोग्य अधिकारी आणि पोलीस आयुक्तांवर कारवाई करत असल्याचे त्यांनी सांगितले. तर दुसरीकडे जोपर्यंत या अधिकाऱ्यांना पूर्णपणे त्यांच्या पदावरून हटवले जात नाही, तोपर्यंत आम्ही आमचे आंदोलन मागे घेणार नाही, अशी भूमिका कनिष्ठ डॉक्टरांनी घेतली.   


कनिष्ठ डॉक्टरांची भूमिका काय? 


"आम्ही सध्या स्वास्थ भवन येथे आंदोलन करत आहोत. आम्ही आता वैद्यकीय विद्यार्थी, नर्सिंग विद्यार्थी तसेच या आंदोलनात सहभागी असलेल्या सर्व घटकांशी आम्ही चर्चा करू. या चर्चेनंतर आम्ही भविष्यात हे आंदोलन चालू ठेवावे की नाही, हे ठरवू. याबाबत आम्ही मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना अगोदरच माहिती दिलेली आहे," असे आंदोलक डॉक्टर अनिकेत रॉय यांनी सांगितले.


हेही वाचा :


Chhatrapati Sambhaji nagar: डिअर अहो, बाय! यू आर फ्री बर्ड नाऊ... काळजाचं पाणी करणारी 7 पानी चिठ्ठी, पतीच्या छळाला कंटाळून डॉक्टर पत्नीने आयुष्य संपवलं


अनोखा योगायोग! एकच गाव, एकच वर्ग, एकच बेंच आणि एकाच कॉलेजला मिळाला प्रवेश, आता एकाच वेळी होणार डॉक्टर, वडिलांच्या मैत्रीनंतर मुलांचींही नाळ घट्ट


Kolkata Rape Case: कोलकाता डॉक्टर बलात्कार-हत्या प्रकरणातील आरोपी तुरुंगातील चपाती-भाजी खाऊन वैतागला; अंडी आणि चाऊमीनची केली मागणी अन्...