PM Narendra Modi Birthday : पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी (17 सप्टेंबर) त्यांचा 73 वा वाढदिवस साजरा करणार आहेत. गुजरातमधील सुरतमध्ये लोक मोठ्या थाटामाटात तो साजरा करण्याची तयारी करत आहेत. या खास प्रसंगी सुरतमधील अनेक व्यावसायिकांनी 100% पर्यंत सूट आणि मोफत सेवा देण्याची घोषणा केली आहे. 


10 ते 100 टक्के सवलत


भाजप नेते पूर्णेश मोदी म्हणाले की, त्यांच्या विधानसभा मतदारसंघातील अनेक स्थानिक व्यापारी पंतप्रधान मोदींचा वाढदिवस साजरा करण्यासाठी 10 टक्के ते 100 टक्के सवलत देतील. ज्यामध्ये दागिने, हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, दवाखाने आणि भाजी मंडई यांचा या सवलतींमध्ये समाविष्ट केला जाईल.


पूर्णेश मोदी पुढे म्हणाले, "माझ्या विधानसभा मतदारसंघात दरवर्षी आम्ही पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त लोकांच्या कल्याणासाठी काम करतो. यावेळी 2500 व्यापारी 10% ते 100% पर्यंत सवलत देत आहेत. 110 ऑटो-रिक्षा त्या दिवशी 100% सवलत देतील. आम्ही हे दरवर्षी करतो, परंतु कोणती सवलत द्यायची, किती सवलत द्यायची? हा दुकानदारचा निर्णय आहे






सोमवारपासून ऑटोही फ्री...


पीएम मोदींच्या वाढदिवसाबाबत सुरतमधील ऑटो युनियनचे अध्यक्ष राजू भंडारी म्हणाले की, 'आम्ही हा सेवा दिवस म्हणून साजरा करू, जिथे ऑटोचालक मोफत राईड देत आहेत. नरेंद्र मोदींच्या वाढदिवसाच्या एक दिवस अगोदर म्हणजेच सोमवार, 16 सप्टेंबरपासून याची सुरुवात होणार आहे.


पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या वाढदिवशी 'सुभद्रा योजना' सुरू करण्यासाठी ओडिशाचा दौरा करणार आहेत. भाजप खासदार संबित पात्रा म्हणाले होते की, निवडणूक प्रचारादरम्यान पीएम मोदींनी ओडिशात 'मोदीची हमी' दिली होती, ज्यामध्ये त्यांनी आश्वासन दिले होते की भाजपचे सरकार स्थापन झाल्यास प्रत्येक महिलेला पाच वर्षांत 50,000 रुपये मिळतील. ही प्रक्रिया 17 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. यामध्ये सुमारे 1 कोटी 30 लाख महिलांना सुभद्रा योजनेतून 5 हजार रुपयांचा पहिला हप्ता मिळणार आहे. हा पहिला हप्ता पंतप्रधान मोदी जारी करणार आहेत.


हे ही वाचा -


IND vs KOR : भारताने दक्षिण कोरियाला पाजले पराभवाचे पाणी; थाटात गाठली अंतिम फेरी, फायनलमध्ये चीनशी भिडणार