नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) दिल्लीतील (Delhi) एका कार्यक्रमात संबोधित करत असताना त्यांच्या समोर एका व्यक्तीला भोवळ (Person Collapsed) आली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी क्षणाचाही विलंब न करता, लगेचच त्यांच्या वैयक्तिक डॉक्टरांच्या टीमला संबंधित व्यक्तीला तपासण्यास आणि त्याकडे लक्ष देण्यास सांगितलं.
भरकार्यक्रमात पंतप्रधानांसमोरच एका व्यक्तीला आली भोवळ
पंतप्रधान जमावाला संबोधित करत असताना त्यांच्या समोर एका व्यक्तीला चक्कर आली आणि ती व्यक्ती खाली कोसळली. ही घटना स्टेजवर उभ्या असणाऱ्या पंतप्रधानांच्या लक्षात येताच, त्यांनी आपलं भाषण थांबवून डॉक्टरांना त्या व्यक्तीकडे जाऊन त्याला तपासण्याचे आदेश दिले.
पंतप्रधानांनी त्यांच्या वैयक्तिक डॉक्टरांच्या पथकाला आदेश देऊन त्या व्यक्तीला तपासण्यास सांगितलं. यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की, ''माझी डॉक्टरांची त्यांच्यापर्यंत पोहोचा आणि त्यांना तपासा. माझ्यासोबत जे डॉक्टर आहेत, त्यांनी या व्यक्तीला तपासा. त्यांचा हात पकडन घेऊन जा. त्यांना एका ठिकाणी बसवा.''
नेमकं काय घडलं पाहा व्हिडीओ :
G20 शिखर परिषदेसाठी नागरिकांनी मदत करण्याचं आवाहन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्लीतील कार्यक्रमात संबोधन केलं. पुढील महिन्यात दिल्लीत अनेक जागतिक नेत्यांच्या उपस्थितीमुळे नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागू शकतो, त्यामुळे आगामी G20 शिखर परिषद यशस्वी होण्यासाठी नागरिकांनी मदत करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.
नागरिकांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त
नवी दिल्लीमध्ये 9 ते 10 सप्टेंबर या कालावधीत जी 20 परिषद आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेत 30 हून अधिक देशांचे प्रमुख आणि युरोपियन युनियन आणि आमंत्रित अतिथी देश आणि 14 आंतरराष्ट्रीय संस्थांचे प्रमुख उपस्थित राहण्याची शक्यता आहे. पंतप्रधान मोदी यांनी आगामी जी 20 शिखर परिषदेच्या व्यवस्थेमुळे नागरिकांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल आधीच दिलगिरी व्यक्त केली असून नागरिकांना मदत करण्याचं आवाहन केलं आहे.
जी-20 शिखर परिषद काळात वाहतूक नियमांमध्ये बदल
यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की, "5 सप्टेंबर ते 15 सप्टेंबरपर्यंत नागरिकांची मोठी गैरसोय होणार आहे आणि त्याबद्दल मी आधीच दिलगिरी व्यक्त करतो. रहदारीचे नियम बदलले जातील, तुम्हाला अनेक ठिकाणी जाण्यापासून रोखले जाईल पण काही गोष्टी आवश्यक आहेत".
महत्वाच्या इतर बातम्या :