बंगळूरु : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी इस्रोच्या (ISRO) शास्रज्ञांची भेट घेतल्यानंतर इस्रोने पंतप्रधानांचे आभार मानले आहेत. भारताची महत्त्वकांक्षी मोहीम असलेल्या चांद्रयान -3 (Chandrayan 3) चे सॉफ्ट लँडींग यशस्वीरित्या चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर करण्यात आले. त्याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचा दक्षिण आफ्रिका आणि ग्रीसचा दौरा आटोपल्यानंतर थेट बंगळूरु गाठलं. त्यानंतर त्यांनी बंगळूरुमध्ये इस्रोच्या शास्रज्ञांची भेट घेतली. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी इस्रोचं अगदी तोंडभरुन कौतूक केलं आहे.
पंतप्रधान मोदींनी केले होते ट्वीट
पंतप्रधान मोदी यांनी इस्रोच्या शास्रज्ञांची भेट घेतल्याची ट्वीट करत माहिती दिली. यावेळी त्यांनी म्हटलं की, बंगळुरुमध्ये मी शास्रज्ञांशी संवाद साधला. चांद्रयान-3 चं यश हे भारतासाच्या अंतराळ क्षेत्रामधील एक ऐतिहासिक क्षण होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी चांद्रयान-3 विषयी सविस्तर माहिती देखील जाणून घेतली.
इस्रोनं मानले पंतप्रधान मोदींचे आभार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ट्वीट करत इस्रोने आभार मानले आहेत. यावेळी बोलताना इस्रोने म्हटलं आहे की, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार. पंतप्रधान मोदी हे ब्रिक्स परिषदेसाठी दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर गेले होते. त्यानंतर ते एकदिवसीय ग्रीसच्या दौऱ्यावर देखील गेले होते. ग्रीसवरुन पंतप्रधानांनी थेट बंगळूरु गाठलं.
मोहिम फत्ते झाल्याबद्दल दिल्या शुभेच्छा
इस्रोच्या कमांड सेंटरवर इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ यांनी पंतप्रधान मोदींचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यानंतर पंतप्रधान मोदींनी इस्रोच्या प्रमुखांची पाठ देखील थोपटली. तसेच यावेळी त्यांनी मोहीम फत्ते झाल्याबद्दल पंतप्रधानांनी शुभेच्छा देखील दिल्या आणि शास्रज्ञांसोबत फोटो देखील काढला. पंतप्रधान मोदींनी देशवासियांशी देखील संवाद साधला. यावेळी पंतप्रधान मोदींनी काही महत्त्वाच्या घोषणा देखील केल्या. यापुढे 23 ऑगस्ट हा दिन राष्ट्रीय अवकाश दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे. तसेच चांद्रयान-2 ज्या जागी क्रॅश झालं त्या जागेला तिरंगा असं नाव देण्यात आलं आहे. तर चांद्रयान-3 ज्या ठिकाणी लँड झालं त्या ठिकाणाला 'शिवशक्ती' हे नाव देण्यात आलं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
PM MODI : 'तुमच्या कार्याला, धैर्याला सलाम'; पंतप्रधान मोदींनी घेतली इस्रोच्या शास्रज्ञांची भेट