Vistara Airline Offer: नवीन वर्षाच्या सुरुवातीस देशातील अनेक विमान कंपनींनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी भन्नाट ऑफर आणल्या आहेत. या ऑफर अंतर्गत ग्राहकांना कमी पैशांत विमानातून प्रवास करता येणार आहे. स्पाईसजेट आणि इंडिगो यांच्यानंतर आता विस्तारा एअरलाईन्सही विमान तिकिटांवर मोठी ऑफर दिली आहे. येत्या काही दिवसांत कंपनीच्या स्थापनेला 7 वर्षे पूर्ण होतील. आपल्या 7 व्या वर्धापन दिनानिमित्त विस्तारा एअरलाईन्सनं आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी नवीन भाडेही जाहीर केलंय.


आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी विस्तारानं जाहीर केलेल्या नव्या दरानुसार, इकॉनॉमी क्लाससाठी देशांतर्गत विमान प्रवासाचं भाडं 977 रुपयांपासून तर, 2 हजार 677 रुपये इतकं आहे. तर, प्रीमिअम इकॉनॉमी आणि बिझनेस क्लाससाठी हे भाडे 9 हजार 777 रुपयेत इतकं आहे. प्रवाशांना 21 जानेवारी ते 30 सिप्टेंबरपर्यंत या ऑफर अंतर्गत विमानातून प्रवास करता येणार आहे. परंतु, ही ऑफर केवळ 48 तासांकरीता उपलब्ध असणार आहे. या वेळेतच ग्राहकांना विमान तिकिटांची बुकींग करावी लागणार आहे. ही ऑफर 6 जानेवारीच्या मध्यरात्री सुरु झाली असून आज (7 जानेवारी) रात्री 12 वाजेपर्यंत असणार आहे.


विस्ताराच्या 7 व्या वर्धापन दिनाच्या ऑफरचा लाभ घेण्यासाठी कंपनीच्या www.airvistara.com या वेबसाइटवरून तिकीट बुक करता येणार आहे. याशिवाय, विस्ताराच्या मोबाइल अॅपवरूनही तिकीट बुक करू करता येऊ शकते. विस्ताराचे मोबाईल अॅप आयओएस आणि अॅन्ड्रॉईडवर उपलब्ध आहे. एवढेच नाही तर विस्ताराच्या विमानतळ तिकीट कार्यालये (एटीओ), कॉल सेंटर्स, ऑनलाइन ट्रॅव्हल एजन्सी आणि इतर ट्रॅव्हल एजन्सीद्वारे देखील बुक करू शकता.


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha