Bulli Bai App Case : 'बुली बाई' अ‍ॅप प्रकरणात पोलिसांनी चौथ्या आरोपीला उत्तराखंडमधून अटक करण्यात केली आहे. या संदर्भात माहिती देताना मुंबई पोलिसांनी मोठा खुलासा केला आहे. पोलिसांनी म्हटले आहे की, ट्विटरने जर योग्य वेळी माहिती पुरवली असती तर, आरोपी नीरज बिश्नोईला आधीच अटक झाली असती. सूत्रांनी सांगितले की, मुंबई पोलिसांनी श्वेता सिंग, विशाल कुमार झा आणि मयंक रावल या तिघांना अटक केली होती. चौकशीमुळे तपास पुढे जाऊ शकतो, परंतु मुंबई पोलीस तेथे पोहोचेपर्यंत दिल्ली पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.


मुंबई पोलिसांच्या सूत्रांनी सांगितले की, जेव्हा गुन्हा दाखल झाला तेव्हाच म्हणजेच 2 जानेवारीला पोलिसांनी ट्विटरवर @Giyu44 या वापरकर्त्याबद्दल माहिती मागितली होती, परंतु ट्विटरने ही माहिती मुंबई पोलिसांना पुरवली नाही. त्यामुळे मुंबई पोलीस आरोपी नीरज बिश्नोईपर्यंत पोहोचण्याआधीच नीरजला दिल्ली पोलिसांनी अटक केली. 


आरोपी नीरज बिश्नोई @giyu44 नावाचे ट्विटर हँडल चालवायचा आणि ट्विटरने त्याची माहिती पोलिसांना दिली असती तर, आरोपी खूप आधी तुरुंगात गेले असते. मुंबई पोलिसांच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, ट्विटरची महिला सुरक्षेबाबत अतिशय कडक मार्गदर्शक तत्त्वे आहेत आणि ते तपास यंत्रणांना सहकार्य करतात, मात्र या प्रकरणी सुमारे 10 वेळा मुंबई पोलिसांनी ट्विटरकडून माहिती मागितली, मात्र ट्विटरने ती माहिती पोलिसांना शेअर केली नाही. पोलीस ट्विटरच्या तक्रार अधिकाऱ्याच्या संपर्कात होते पण काहीही उपयोग झाला नाही.


'बुली बाई' अ‍ॅप प्रकरणात पोलिसांनी चौथ्या आरोपीला अटक केली आहे. उत्तराखंडमधून एका 21 वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे. बुली बाई अ‍ॅप प्रकरणी उत्तराखंडमधील मयंक रावल (21), श्वेता सिंह अटक करण्यात आली आहे. तर अभियांत्रिकीचा विद्यार्थी विशाल कुमार झा (21) याला सोमवारी बंगळुरू येथून अटक करण्यात आली. आता उत्तराखंडमधूनच आणखी एका तरुणाला अटक करण्यात आली आहे.


महत्त्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha