Virender Sehwag on Politics : भारताचा माजी सलामी फलंदाज विरेंद्र सेहवागच्या ट्वीटची सध्या जोरदार चर्चा सुरु झाली आहे. एका चाहत्यांनी विरेंद्र सेहवागला भन्नाट असा रिप्लाय केला होता. गौतम गंभीरच्या आधी तू खासदार झाला असतास, असे मला नेहमी वाटतेय. असे एका चाहत्याने विरेंद्र सेहवागला सांगितले. त्यावर विरेंद्र सेहवागने दिलेल्या उत्तराची जोरदार चर्चा सुरु आहे. विरेंद्र सेहवाग याने एकप्रकारे गौतम गंभीर आणि इतर काही खासदारांना अप्रत्यक्ष टोला लगावला आहे. पाहूयात, नेमकं काय प्रकरण आहे... ?
झाले असं की, देशभरात आणि भारत आणि इंडिया नावावरुन चर्चा सुरु आहे. देशाच्या राष्ट्रपतींनी त्यांच्या अधिकृत राजपत्रावर प्रेसिडेंट ऑफ इंडिया ऐवजी प्रेसिडेंट ऑफ भारत असा उल्लेख केला. त्यावरुन प्रतिक्रियांची एकच रांग लागली. त्यामध्ये विरेंद्र सेहवाग यानेही उडी घेतली. विश्वचषकासाठी भारतीय संघाची निवड झाली. बीसीसीआयच्या ट्वीटला रिट्विट करत सेहवाग याने "भारतीय संघाच्या जर्सीवर टीम इंडिया नव्हे तर भारत लिहिलेले असायला हवे" असे ट्वीट केले होते. सेहवागचे हे ट्वीट वाऱ्यासारखे व्हायरल झाले. विरेंद्र सेहवागच्या ट्वीटला रिट्विट करत Siddarth Pai या ट्विटर युजर्सने "गौतम गंभीरच्या आधी तू खासदार झाला असतास, असे मला नेहमी वाटतेय." असे ट्वीट केले. त्याला विरेंद्र सेहवागने दिलेले उत्तर सध्या चर्चेचा विषय ठरलाय
Siddarth Pai याला उत्तर देताना विरेंद्र सेहवाग याने आपल्याला राजकारणात रस नसल्याचे स्पष्ट केले. यावेळी त्याने कलाकार आणि खेळाडू जे खासदार झाले, त्यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला. मला अर्धवेळ खासदार झालेले पटणारे नाही.. असा टोला सेहवाग याने लगावला. विरेंद्र सेहवाग याचे हे ट्वीट चर्चेत आहे.
सेहवाग नेमकं काय म्हणाला ?
राजकारणात मला थोडासाही रस नाही. देशातील प्रमुख दोन पक्षांनी मागील दोन्ही निवडणुकीत मला विचारणा केली होती. कलाकारांनी अथवा खेळाडूंनी राजकारणा प्रवेश करु नये, असं माझं मत आहे. कारण, अंहकार आणि सत्तेच्या लालसेपोटी त्यांच्याकडे लोकांसाठी वेळच काढता येत नाही. पण काही जण याला अपवाद आहेत, पण बहुतेक फक्त पीआर करतात. मला क्रिकेट आणि समालोचन करायलाच आवडेल. पार्ट टाइम खासदार होणं मला पटणारे नाही.
आणखी वाचा :
Bharat or India Issue: टीम इंडिया नव्हे जर्सीवर भारत हवे, विरेंद्र सेहवागच्या ट्वीटची चर्ची