Virendra Sehwag On India Name: देशाच्या राष्ट्रपतींनी त्यांच्या अधिकृत राजपत्रावर प्रथमच प्रेसिडेंट ऑफ इंडिया ऐवजी प्रेसिडेंट ऑफ भारत असा उल्लेख केला.  त्यावरुन प्रतिक्रियांची एकच रांग लागली. सर्वसामान्य लोकांपासून ते राजकीय कलाकारांच्या प्रतिक्रियेत आता क्रीडा क्षेत्राचीही भर पडली आहे. भारताचा माजी विस्फोटक फलंदाज विरेंद्र सेहवाग यानेही भारत आणि इंडिया या वादात उडी घेतली आहे. टीम इंडिया नव्हे जर्सीवर भारत असे नाव असायला हवे, असे ट्वीट विरेंद्र सेहवाग याने केलेय. सेहवागच्या ट्वीटची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. सेहवाग याने या ट्वीटमध्ये जय शाह यांनाही टॅग केलेय. 


विश्वचषकासाठी आज भारतीय संघातील 15 शिलेदारांच्या नावाची घोषणा झाली. बीसीसीआयने केलेल्या ट्वीटला रिप्लाय करत सेहवाग याने आपले मत मांडलेय. सोशल मीडियावर भारत विरुद्ध इंडिया असा सोशल मीडिया ट्रेंड झालाय. विश्वचषकात आपण विराट कोहली, रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह आणि रविंद्र जाडेजासाठी चीअर्स करणार आहोत. जर्सीवर इंडिया नव्हे तर भारत लिहिलेले असायला हवे, असे सेहवागने आपल्या ट्वीटमध्ये म्हटलेय. 


टीम इंडिया नव्हे टीम भारत


विश्वचषकात आपण विराट कोहली, रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह आणि रविंद्र जाडेजासाठी चीअर्स करणार आहोत. भारतीय संघाच्या जर्सीवर टीम इंडिया नव्हे तर भारत लिहिलेले असायला हवे. कारण, आपल्या हृदयात भारत आहे. खेळाडूंच्या जर्सीवर भारत लिहिलेले असायला हवे, असे ट्वीट विरेंद्र सेहवाग याने केलेय. 






विरेंद्र सेहवाग याचे ट्वीट चर्चेचा विषय ठरत आहे. सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाले असून नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया येत आहे. सेहवागचे ट्वीटवर अनेकांनी कमेंट्स दिल्या आहेत. काहींनी सकारात्मक तर काहींनी विरोध दर्शवला आहे.






विश्वचषकासाठी भारताचा संघ -


वनडे विश्वचषकासाठी भारताच्या 15 शिलेदारांची निवड झाली. चीफ सिलेक्टर अजित आगरकर आणि कर्णधार रोहित शऱ्मा यांनी पत्रकार परिषदेत 15 खेळाडूंची माहिती दिली. विश्वचषकासाठी निवडण्यात आलेल्या टीम इंडियाच्या कॉम्बिनेशनबद्दल सध्या चर्चा सुरु आहे. भारतीय संघात 5 स्पेशालिस्ट फलंदाज, चार अष्टपैलू, दोन विकेटकिपर, तीन स्पेशालिस्ट वेगवान गोलंदाज आणि एक फिरकी गोलंदाज निवडला आहे.  


रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल (विकेटकिपर), श्रेयस अय्यर, हार्दिक पांड्या, रविंद्र जाडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शामी, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, इशान किशन (विकेटकिपर), अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, सूर्यकुमार यादव