मुंबई: आंतरराष्ट्रीय जी 20 देशांची परिषद यंदा भारतात होत असून भारत सरकारने त्यासंबंधित एक मोठा निर्णय घेतला आहे. या पुढे भारतीय राष्ट्रपतींना प्रेसिडेंट ऑफ इंडिया असं न म्हणता प्रेसिडेंट ऑफ भारत (President Of Bharat) म्हणण्यात येईल. भारत देशाला इंडिया (India) असं म्हणण्याला या आधीही अनेक संघटनांकडून विरोध होत होता. इंडिया या नावाला भारतीय जनता पक्षाकडूनही विरोध होता. भारताला आंतरराष्ट्रीय स्तरावर इंडिया या नावाने ओळखले जाते. या नावाचा इतिहासही तसाच मोठा आहे. तसेच प्राचीन काळापासून भारताला वेगवेगळ्या अशा सात नावांनी ( 7 Names Of India In history)  ओळखलं जायचं. 


भारतीय राज्यघटनेच्या पहिल्याच कलमामध्ये इंडिया दॅट इज भारत (India, that is Bharat) म्हटलं आहे. म्हणजे भारताची आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख इंडिया असल्याने या दोन्ही नावांना मान्यता दिली आहे. त्यामुळे इंग्रजीमध्ये इंडिया आणि भारतीय भाषांमध्ये भारत असं नाव आपण स्वीकारलं आहे. 


काय आहे भारताच्या सात नावांचा इतिहास? 


प्राचीन काळापासून आतापर्यंत भारत देशाला वेगवेगळ्या अशा सात नावांनी ओळखलं जायचं. ती नावं खालीलप्रमाणे, 


जम्बूद्वीप (Jambu Dwip)


प्राचीन काळात भारताला जम्बूद्वीप या नावाने ओळखलं जायचं. हा शब्द दोन नावांपासून तयार झाला आहे, जम्बू आणि द्वीप. जम्बू म्हणजे जांबूळ आणि द्वीप म्हणजे भूमी. म्हणजे जांभळांच्या वृक्षाची भूमी अशी भारताची ओळख होती. 


आर्यावर्त (Aryavarta)


ऋगवेदामध्ये भारतीय उपखंडाला आर्यावर्त असं म्हटलं जायचं. अनेक पुराणामध्ये या नावाचा उल्लेख आढळतोय. प्राचीन काळात आर्यन लोक इराणवरून भारतीय उपखंडात आली आणि त्यांनी या ठिकाणी आपली वस्ती निर्माण केली. त्यामुळे ते राहत असलेल्या भूमीला आर्यावर्त असं म्हटलं जायचं. महाभारतामध्येही या अनेकदा या नावाचा उल्लेख आढळतो. 


भारत-खंड (Bharat Khand)


जम्बूद्वीप या नावासोबत भारताला प्राचीन काळी भारत खंडही म्हटलं जायचं. यामध्ये अफगाणिस्तानपासून ते बांग्लादेशपर्यंतच्या भूमीचा समावेश होता. 


भारत या भारतवर्ष (Bharata or Bharatvarsh)


सध्या आपल्या देशाला भारत हे नाव पडलं आहे ते प्राचीन काळातल्या भरत राजावरून असं सांगितलं जातंय. दुष्यंत आणि शंकुतला यांचा पुत्र चक्रवर्ती सम्राट भरत होता. त्याच्या नावावरून उत्तर भारतात राहणाऱ्या समूहाला भारत असं म्हटलं गेलं आणि नंतर त्यांच्या वस्तीला भारत असं म्हटलं गेलं. काही पुराणात असं म्हटलं आहे की ऋषभदेवचा पुत्र भरत याच्या नावावरून आपल्या देशाला भारत असं नाव पडलं. भारत किंवा भारत म्हणजे संपूर्ण भारतीय उपखंड अशी ओळख होती. 


हिंदुस्तान (Hindustan)


हिंदू या शब्दाची उत्पती ही सिंधू (Sindhu) या नावापासून झाली. सिंधू नदीच्या काठी राहणारे लोक हे सिंधू. पण अरबी लोकांना सिंधू हे नाव म्हणता येत नव्हतं, त्यामुळे त्याचा अपभ्रंश होऊन ते हिंदू (Hindu) असं झालं. मग पुढे हिंदू हेच नाव प्रचलित झालं आणि हिंदू ज्या ठिकाणी राहतात ती भूमी म्हणजे हिंदुस्तान. हिंदुस्तान हे नाव मुघलांच्या काळात प्रचलित झालं. हिंदू धर्मिय लोक बहुसंख्येने राहत असल्यामुळे मुघल या देशाला हिंदुस्तान असं म्हणायचे. 


History Of India Name : भारताला इंडिया हे नाव कसं पडलं? 


ब्रिटिशांच्या काळात भारताला इंडिया असं म्हटलं जायचं. प्राचीन हडप्पा-मोहेंजोदडो संस्कृती ही पाश्चिमात्य देशांमध्ये इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन (Indus Valley Civilization) म्हणून ओळखली जायचं. सिंधू नदीला पाश्चिमात्य लोक इंडस रिव्हर म्हणायचे. त्यामुळे या संस्कृतीला त्यांनी इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन म्हटलं. त्यावरून या देशाला लॅटिन भाषेमध्ये इंडे (Inde) असं म्हटलं गेलं. 


ब्रिटिशांकडून इंडे या नाव नंतर बोलता बोलता इंडिया असं म्हटलं जायचं आणि नंतर हेच नाव प्रचलित झालं. 


आता इंग्रजीमध्ये असलेल्या इंडिया या नावामध्ये बदल केला जाऊ शकतो असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. इंडिया हे नाव भारताच्या गॅझेटवरून कायमचं हद्दपार करून या देशाला फक्त भारत या नावाने आंतरराष्ट्रीय ओळख मिळवण्यासाठी प्रयत्न केला जाऊ शकतो. 


ही बातमी वाचा: