Viral Video : कोण आहे झोमॅटोचा व्हायरल डिलिव्हरी बॉय? ज्याच्या स्माईलवर नेटकरीही घायाळ
इंटरनेट सेन्सेशन बनलेला झोमॅटोचा फूड डिलीवर बॉय इंटरनेट सेन्सेशन बनला कसा बनला? त्याचा व्हायरल होणारा व्हिडीओ कसा व्हायरल झाला?

Viral Video : सध्या झोमॅटोचा एक फूड डिलीवर बॉय इंटरनेट सेन्सेशन बनला आहे. या झोमॅटो डिलीवरी बॉयचा व्हिडीओ नेटकरी मोठ्या प्रमाणावर शेअर करत आहेत. या डिलीवरी बॉयच्या स्माइलवर नेटकरी घायाळ झाले आहेत. त्याच्या या स्माइलवर सोशल मीडिया यूजर्स वेगवेगळ्या प्रतिक्रीयाही देत आहेत. फूड डिलीवरी बॉयचं नाव सोनू आहे. सोनूच्या एका स्माइलने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. त्याच्यावर अनेक मीम्सही व्हायरल होत आहेत.
View this post on InstagramA smile can win a million hearts, kyun @zomatoIN? Bus #SmileDekeDekho. #ZomatoBoy #sonukismile
मीडिया रिपोर्टनुसार, दानिश नावाच्या एका 'टिकटॉक' यूजरने सोनूचा सर्वात पहिला व्हिडीओ रेकॉर्ड करून सोशल मीडियावर शेअर केला होता. त्यानंतर पाहता पाहता झोमॅटो डिलीवरी बॉय असलेल्या सोनूचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला. सोनूची स्माइल स्टाइल आणि निरागसतेवर सगळे नेटकरी फिदाच झाले. त्यानंतर LAY'S ने आपल्या पॅकेट कव्हरवर सोनूचा फोटोही लावला आहे.
this is now a happy rider fan account
— Zomato India (@ZomatoIN) February 28, 2020
झोमॅटोने आपल्या ट्विटर हॅन्डलचा डिपी बदलला आहे. शुक्रवारी झोमॅटो डिलीवरी बॉयने आपल्या डिलीवरी बॉयचे हसतानाचा फोटो पोस्ट केला आहे. ट्विटर हॅन्डलवर डीपी म्हणून डिलीवर बॉयचा फोटो लावण्यासोबतच त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, 'आता हे एका हॅप्पी रायडरचं फॅन अकाउंट आहे.'
— राष्ट्र सेवक (@frankmartynn) February 28, 2020
टिकटॉकवर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये दानिश आणि सोनूमधील संवाद रेकॉर्ड करण्यात आला आहे. सोनूला दानिश त्याला मिळणारे पैसे आणि कामाचे तास यांबाबत विचारत आहे. त्याला उत्तरं देताना सोनू अजिबात न वैतागता, हसत-खेळत उत्तरं देत आहे. सोनू सांगतो की, '12 तास काम केल्यानंतर इन्सेटिव्हसह 350 रूपये मिळतात.
View this post on Instagram
जेवणाबाबत विचारल्यावर सोनू सांगतो की, 'झोमॅटोची जी ऑर्डर कॅन्सल होते, तेच त्याचं जेवण असतं. कंपनीबाबत काही तक्रार आहे का? याबाबत विचारल्यावर सोनू हसतच उत्तर देतो की, 'कंपनीकडून पैसे आणि जेवणं दोन्ही गोष्टी वेळेवर मिळतात.'
दरम्यान, इंटरनेट सेन्सेशन बनलेला सोनूचे मीम्सही इंटरनेटवर प्रचंड व्हायल होत आहेत. तसेच सोनूच्या स्माइल पाहून अनेकजण खरचं खूश होत आहेत.























