Who Is Tulsi Gowda: राष्ट्रपती भवनात सोमवारी पद्म पुरस्कारांचं (Padma Awards 2021) वितरण करण्यात आलं. राष्ट्रपती रामनाथ कोविंद (Ram Nath Kovind) यांच्या हस्ते 2020 च्या पद्म पुरस्कारांनी 119 जणांना सन्मानित करण्यात आलंय. दरम्यान, कर्नाटकातील पर्यावरणतज्ज्ञ तुलसी गौडा यांनाही पद्मश्री पुरस्काराने (Padma Shri

Award) सन्मानित करण्यात आलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्रिमंडळातील वरिष्ठ मंत्र्यांनी तुलसी गौडा यांचा फोटो शेअर केलाय. या फोटोत मोदी- शाह तुलसी गौडा यांना नमस्कार करताना दिसत आहेत. यानंतर सोशल मीडियावर तुलसी गौडा आहेत तरी कोण? अशा चर्चांना उधाण आलंय. 

 

तुलसी गौडा कोण आहेत?

 

कर्नाटकातील होनाली गावातील तुळशी गौडा हलक्की आदिवासी समाजाशी संबंधित आहेत. हा समाज वनस्पती आणि औषधी वनस्पतींचे पुरेशा ज्ञानासाठी ओळखला जातो. तुलसी गौडा या दोन वर्षांच्या असतानाच त्यांच्या वडिलांचं निधन झालं. त्या बालपणापासून त्यांच्या आईसोबत जवळच्या नर्सरीत काम करायला सुरुवात केली. त्या कधीही शाळेत गेल्या नाहीत. त्यांचं लग्नही खूप लवकर झालं. त्यांनी 60 वर्षांहून अधिक काळ पर्यावरणासाठी काम केलंय. त्यांनी आतापर्यंत 30 हजारांहून अधिक रोपे लावली आहेत. त्या सध्या वनविभागाच्या नर्सरीची काळजी घेत आहेत.

 

राष्ट्रपती कार्यालयाचं ट्वीट-

 

"राष्ट्रपती कोविंद यांनी सामाजिक कार्यासाठी श्रीमती तुलसी गौडा यांना पद्मश्री प्रदान केलं. त्या कर्नाटकातील एक पर्यावरणवादी आहेत. ज्यांनी 30,000 हून अधिक रोपं लावली आहेत. त्या गेल्या 6 दशकांपासून पर्यावरण संवर्धन कार्यात सहभागी आहेत," भारताच्या राष्ट्रपती कार्यालयावरून ट्वीट करण्यात आलंय

 

त्यांनी 30 वर्षांहून अधिक काळ सरकारी नर्सरीत काम केलंय. त्यानंतर त्यांना कायमस्वरूपी नोकरीची ऑफर देण्यात आली. या ठिकाणी 15 वर्ष नोकरी केल्यानंतर वयाच्या 70 व्या वर्षी त्या निवृत्त झाल्या.

 

हे देखील वाचा-