Coronavirus Cases Today : देशात कोरोना महामारीची परिस्थिती थोड्याप्रमाणात सुधारत असल्याचं चित्र आहे. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, मागील 24 तासांत देशात 10 हजार 126 नव्या रुग्णांची भर पडली आहे. जवळपास नऊ महिन्यानंतर ही सर्वात कमी रुग्णवाढ आहे. यासह देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 1,40,638 इतकी झाली आहे. 263 दिवसानंतर ही सर्वात कमी सक्रिय रुग्णांची संख्या आहे. मागील 24 तासांत देशात 332 जणांचा मृत्यू झालाय. देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 3,43,77,113 इतकी झाली आहे. तर मृताची संख्या 4,61,389  इतकी झाली आहे.  


लागोपाठ 32 दिवसानंतर 20 हजारांपेक्षा कमी रुग्ण –
मागील 32 दिवसांपासून देशातील नव्या रुग्णाची वाढ 20 हजारांपेक्षा कमी आहे. तर 135 दिवसांपासून 50 हजारांपेक्षा कमी रुग्णांची वाढ झाली आहे. 


रिकव्हरी रेट 98.25 -
मागील 24 तासांत 11,982 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या वाढून 3,37,75,086 इतकी झाली आहे. भारताच्या रिकव्हरी रेटमध्येही वाढ झाली आहे. देशाचा रिकव्हरी रेट 98.25 टक्के इतका झालाय.  


कोरोनाचा विळखा सैल होतोय –
कोरोना महामारीचा विळखा सैल होत असल्याचं चित्र आहे. मागील 46 दिवसांत साप्ताहिक आणि 36 दिवसांपासून दररोजचा कोरोना पॉझिटिव्हिटी रेट दोन टक्केंपेक्षा कमी आहे. आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, सध्याचा भारताचा आठवड्याचा पॉझिटिव्हिटी 1.25 टक्के आहे. तर दिवसाचा पॉझिटिव्हिटी रेट 0.93 टक्के इतका आहे. 


लसीकरणाला वेग – 
गेल्या काही दिवसांपासून देशात कोरोना प्रतिबंधक लसीकऱणाला वेग आलाय. देशानं नुकताच 100 कोटी लसीच्या डोसचा आकडा पूर्ण केलाय. मागील 24 तासांत देशात 59,08,440 लसीचे डोस देण्यात आले आहेत. सकाळी सात वाजेपर्यंत देशात  1,09,08,16,356 लसीचे डोस देण्यात आले आहेत.  


राज्यातील स्थिती काय?
कोरोनाबाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत घट पाहायला मिळत आहे. राज्यात 24 तासांत 751 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात 15 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर 1555  रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 64 लाख 60  हजार 663 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.62 टक्के आहे.  राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे. राज्यात सध्या 13 हजार 649  रुग्णांवर उपचार सुरु आहेत. सध्या राज्यात 1,38,179 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 865  व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6, 33, 02, 489 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे.