Padma Awards: केंद्र सरकार (Central Government) तेलंगणातील (Telangana) जनतेकडे दुर्लक्ष करत असून त्यांना पद्म पुरस्कार देत नसल्याचा आरोप तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव (K Chandrashekhar Rao) यांनी आज केलाय. "केंद्र सरकार आमच्या राज्यातील जनतेला पद्म पुरस्कार देत नाही. पद्म पुरस्कारासाठी त्यांचा हेतू स्पष्ट दिसत आहे. केंद्र सरकार आमच्या राज्यातील जनतेला हा सन्मान देत नाही. आमच्या लोकांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जातंय", असं  के चंद्रशेखर राव यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितलंय.


दरम्यान, भाजप सरकारवर घणाघाती आरोप करताना के चंद्रशेखर म्हणाले की, "ज्यावेळी मी भाजपला पाठिंबा देत नाही, तेव्हा मला देशद्रोही म्हटलं जातं. केंद्र सरकार आणि भाजपच्या विरोधात बोलणारे देशद्रोही ठरतात, त्यांना उपबन नक्षल म्हणतात", असेही त्यांनी म्हटलंय. तसेच त्यांनी केंद्राकडे राज्यातील शेतकऱ्यांचे खरीप पीक खरेदी करण्याची मागणी केलीय. आमची मागणी मान्य न झाल्यास तेलंगणा राष्ट्र समिती 12 नोव्हेंबरला राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघात धरणे आंदोलन पुकारणार, असाही त्यांनी इशारा दिलाय. याशिवाय, के चंद्रशेखर यांनी नोकरी आणि रोजगारबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करीत केंद्र सरकारवर टीका केलीय. केंद्र सरकारने 2 कोटी जणांना नोकरी देण्याचे आश्वासन दिलं होतं. मात्र, हाही जुमला ठरल्याचे त्यांनी म्हटलंय.


एएनआयचे ट्वीट- 



देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज राष्ट्रपती भवनात 141 जणांना पद्म पुरस्काराने सन्मानित केलंय. ज्यामध्ये 7 सेलिब्रिटींना पद्मविभूषण, 10 जणांना पद्मभूषण आणि 102 जणांना पद्मश्रीने सन्मानित करण्यात आले आहे. यात अभिनेत्री कंगना रणौत, गायक अदनान सामी, दिवंगत गायक एसपी बालसुब्रमण्यम, अभिनेत्री सरिता जोशी यांचा समावेश होता. तर मंगळवारी होणाऱ्या कार्यक्रमात 2021 साठी निवडण्यात आलेल्या मान्यवरांना पद्म पुरस्कार दिले जाणार आहेत.


हे देखील वाचा-